हट्ट || अकबर बिरबल कथा

एकदा काय झाले बिरबलाला दरबारामध्ये यायला उशीर झाला. बिरबल दरबारामध्ये आल्यानंतर अकबर बादशहाने त्याला विचारले बिरबल तू तर इतका शिस्तीचा आज तुला उशीर कसा काय झाला दरबारामध्ये यायला?

तेव्हा बिरबल म्हणाला. खाविंद, काय करू माझा मुलगा हट्टच धरून बसला, काहीही केलं तरी मला सोडायलाच तयात होईना. कशी तरी त्याची समजूत काढून धावत दौडत इथे आलो आहे. आता तुम्हाला काय सांगणार मुलाचा हट्ट.

त्यावर अकबर बादशहा हसला आणि म्हणाला बिरबल स्वतःला तू तर इतका हुशार समजतोस मग सध्या छोट्या मुलाची समजूत काढता नाही का येत तुला? यावर बिरबल म्हणाला तुम्ही समजता इतके सोपे इतके काम नाही आहे हे. मुलाची समजूत काढणं महा कर्म कठीण. पण बादशहा हे मानायलाच तयार न्हवता. तेव्हा बिरबल, बादशहाला म्हणाला. खाविंद, आपण एक काम करूया. पुढच्या काही घटकांसाठी तुम्ही व्हा माझे वडील व मी होतो तुमचा मूलगा आणि आपण खोटं खोटं च नाटक करू आणि मी काही तरी हट्ट करेन आणि तुम्ही माझा हट्ट पुरवा. एक मात्र अट आहे मला मारायचे नाही किव्हा मारायची धमकी सुद्धा द्यायची नाही आहे का मंजूर?

अकबर म्हणाला, फारच सोपी गोष्ट आहे. अशा रीतीने त्यांचं ते नाटक सुरु झाले.

नाटक सुरु होताच बिरबल मोठे भोकाड पसरून खाली बसला आणि अगदी लहान मुलांसारखे रडायला लागला …. आणि रडत रडत म्हणाला मला आताच्या आता ऊस पाहिजे. त्यावर बादशहा ने बाजासिंगला ऊस आणायला सांगितले. बाजासिंग धावत धावत गेला आणि एक मोठा ऊस घेऊन आला. तो ऊस बिरबलाला म्हणजे त्या मुलाला देऊन बादशहा म्हणाला हा घे ऊस आता बस तो कुरतडत दिवसभर. त्यावर बिरबलाने पुन्हा भोकाड पसरले व बोलला मला नको पूर्ण ऊस, मला नको पूर्ण ऊस, मला त्याचे तुकडे करून द्या. बादशहा म्हणाला खंडोजी या उसाचे तुकडे कर आणि लगेच या मुलाला दे.

लगेच मग त्या नोकराने त्या उसाचे तुकडे केले आणि ते तुकडे छोट्या मुलाच्या म्हणजे बिरबलाच्या समोर आणले. पण त्या उसाचे तुकडे पाहून बिरबलाने पुन्हा भोकाड पसरले आणि बोलू लागला मला तुकडे नको मला पूर्ण ऊस पाहिजे. आता मात्र बादशहाला राग यायला लागला आणि म्हणाला अरे आता तर तू उसाचे तुकडे करायला सांगितलेस आणि पुन्हा आता तुला ऊस हवाय? हे नक्की काय चालाय तुझं. हे ऐकून बिरबल अजून जोराने रडू लागला आणि म्हणाला तुम्ही माझ्यावर रागावलात. मला ऊस च पाहिजे मला पूर्ण च ऊस पाहिजे. बादशहा आता मात्र मेटाकुटीला आला होता त्याने पुन्हा बाजासिंग ला बोलावले. जा रे बाजासिंग, अजून एक आख्खा ऊस घेऊन ये याच्या साठी. झालं, ते वाक्य ऐकले ना ऐकलेच तेवढ्यात बिरबल पुन्हा रडू लागला. मला दुसरा ऊस नको मला हेच तुकडे जोडून त्याचा पूर्ण ऊस करून द्या. आता मात्र अकबराचा तोल सुटला आणि म्हणाला अरे काय चालवले आहेस बिरबल. पहिले अखंड उसाचे तुकडे करायला सांगतोस मग पुन्हा त्या तुकड्यांचे अखंड ऊस करायला सांगतोस. काय आहे कि नाही तुला आता जर गप्प नाही बसलास तर तुला चांगलाच मार देईन.

हे शब्द ऐकले आणि बिरबल उभा राहिला आणि म्हणाला बघितलात खाविंद तुम्ही अगदी दोन घटकताच मुलाला मारायला उठलात आणि मुलाला मारायचे नाही असे आपले ठरले होते. आता तुम्हाला समजले का लहान मुलाची समजूत काढणे किती कठीण आहे.

या सगळ्या प्रकाराने बादशहा इतका मेटाकुटीला आला होता कि त्याने लगेच बिरबलाचे म्हणणे मान्य केले आणि म्हणाला हो रे बाबा बिरबल आता मला कळले कि होत लहान मुलाची समजून काढणे म्हणजे. चाल हरकत नाही आज तू उशिरा आलास चल आता आपल्या दरबाराचे काम सुरु कर.

अशा रीतीने बिरबलाने आपले बोलण बादशहाला पटवून दिले.

 

Leave a Comment