एकदा दोन बायका एका लहान मुलावरून भांडत होत्या. “मीच या मुलाची खरी आई आहे ,”👩👩👦
असे त्या दोघेही सांगत होत्या. त्या दोघींना न्यायाधीशासमोर आणले गेले.
👩🏼👸🏽
त्या दोन्ही बायकांचे म्हणणे न्यायधीशाने लक्षपूर्वक ऐकले. खरी आई नक्की कोणती , हे ठरवणे खरोखरच अवघड होते.
न्यायाधीशाने खूप विचार 😴 केला. अखेर त्याला एक युक्ती सुचली . त्याने सेवकाला आज्ञा केली, “या 🙇मुलाचे दोन भाग करा आणि प्रत्येकीला एक-एक भाग द्या”.
न्यायाधीशाची ही आज्ञा ऐकताच त्यांतील एका बाईने👩🏼 हंबरडा फोडून म्हणले , ” नको, नको. न्यायाधीश महाराज दया करा.
या🙇 मुलाला त्या बाईजवळच 👸🏽 राहु द्या. मी मुलावरचा 🙇 माझा 👩🏼 हक्क सोडते.”
दुसरी बाई 👸🏽 माञ काहीही बोलली नाही.
चतुर न्यायाधीशाने खरी आई कोण हे ओळखले.
मुलाचे तुकडे होण्याऐववजी मुलावरचा हक्क सोडायला जी बाई तयार होती , तिलाच👩🏼 न्यायाधीशाने ते मूल🙇 दिले. दुसऱ्या बाईला 👸🏽 माञ तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली.
तात्पर्यः 👉 सत्याचा नेहमी विजय होतो .