कोब्रा आणि कावळ्याची पंचतंत्र गोष्ट | Panchtantra story of cobra and crow in marathi
Table of Contents
मित्रानो आज आम्ही तुमच्या साठी एक पंचतंत्र गोष्ट घेऊन येत आहोत जे लहान मुलांचे ज्ञान वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे
एकेकाळी खूप मोठ्या राज्याजवळ एक लहानसे जंगल होते. जंगलात एक मोठे झाड होते ज्यामध्ये दोन पती आणि पत्नी कावळे त्यांच्या घरट्यात राहत होते. त्याच झाडाच्या खोडामध्ये एक मोठा कोब्रा साप राहत होता.
त्या सापामुळे ते दोन्ही कावळे खूप त्रासले होते कारण जेव्हा जेव्हा त्यांचे मुले कावळ्यांच्या अंड्यातून बाहेर पडत तेव्हा तो साप त्यांना खाऊन टाकायचा आणि ते दोन्ही कावळे काहीच करू शकत नव्हते. त्यांच्या अंड्याना वाचविण्याकरिता त्यांना काहीच करता येत नव्हते कारण साप खूपच शक्तिशाली आणि ते कावळे खूपच कमकुवत होते.
वारंवार सापाने त्यांचे अंडे खाल्याने दोन्ही कावळे अस्वस्थ झाले आणि ते एका कोल्ह्याला जाऊन भेटले. दोन्ही कावळ्यांनी त्यांची कहाणी रडत कोल्ह्याला सांगितली आणि त्या सापाला पळवून लावण्यासाठी एक मार्ग विचारला. कोल्ह्याने उत्तर दिले – “कावळ्यानो काळजी करू नका, माझी एक योजना आहे जेणेकरुन त्या कोबरा पासून आपली सुटका होईल .”
हे ऐकून कावळ्यांना थोडी शांतता मिळाली आणि ते कोल्ह्याला घाईघाईने विचारू लागले – हे खरंच होईल का मित्रा ? आम्हाला शक्य तितक्या लवकर तो मार्ग सांग जेणेकरून आम्ही त्या सापाला पळवून लावू.
कोल्ह्याने त्यांना ती योजना सांगितली आणि म्हणाले – जवळच्या राज्यात जा आणि कोणत्याही धनवान व्यक्तीच्या घरी जा आणि त्यांच्याघरून एक मौल्यवान वस्तू आणा. ती वस्तू घरवाल्याना दाखवताना ती घेऊन या आणि सापाच्या बिलामध्ये टाकून द्या
हे ऐकताच एका कावळाने राज्याच्या दिशेने पळ काढला. जेव्हा तो राज्यात पोहचला तेव्हा त्याने पाहिले की एक राजकन्या तलावामध्ये आंघोळ करीत आहे आणि तिचे सैनिक पाण्याबाहेर तिच्या दागिन्यांवर नजर ठेवून आहेत.
त्याच वेळी, कावळ्याने त्याच्या चोचीत त्या दागिन्यांपैकी एका सुंदर हार घेतले आणि सैनिकांना दाखवत त्यांचा समोरून उडण्यास सुरवात केली. जेव्हा सैनिकांनी पाहिले की एक कावळा राजकन्येचा हार घेऊन उडत आहे , तेव्हा त्यांनी त्या कावळ्याचा पाठलाग सुरु केला.
सैनिकांनी आरामात त्याचा पाठलाग करावा म्हणून कावळा हळूहळू उडत होता. त्या झाडावर जेव्हा तो त्याच्या घरी पोचला तेव्हा त्याने तो हार सापाच्या बिळामध्ये सैनिकांच्या समोर टाकून दिला आणि तो पळून दुसर्या झाडावर बसला.
मग त्या सर्व सैनिकांनी त्या बिलातील लाकडाच्या सहाय्याने तो हार काढण्याचा प्रयत्न करू लागले. बाहेरील आवाज ऐकून झोपलेला साप उठला आणि काय चालले आहे ते पाहण्यासाठी बाहेर गेला. जेव्हा सैनिकांनी साप पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि भाल्या आणि चाकूच्या साहाय्याने त्याला ठार मारले.
कथेतून शिकवन
शत्रू कितीही ताकदवान असला तरी आपण त्याला युक्तीच्या शक्तीने हरवू शकतो.
शक्तीपेक्षा युक्ती नेहमी श्रेष्ठ असते.
हे पण वाचा:- राजा आणि मूर्ख माकड पंचतंत्र गोष्ट
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला कोब्रा आणि कावळ्याची पंचतंत्र गोष्ट | Panchtantra story of cobra and crow in marathi हि गोष्ट नक्कीच आवडली असेल जर काही तक्रार असतील तर आम्हा खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद