Steve jobs Biography in Marathi | स्टिव्ह जॉब्स यांची संपूर्ण माहिती

Steve jobs Biography in Marathi | स्टिव्ह जॉब्स यांची संपूर्ण माहिती:-  आज या जगात मोबाईल, iphone आणि टॅबलेट वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला स्टिव्ह जॉब्स माहित नसेल हे अशक्यच आहे.स्टिव्ह जॉब्स ज्यांनी अँपल हि कंपनी सुरु केली ती आज जगातली सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक बनलेली आहे. स्टिव्ह जॉब्स यांनी विपरीत परिस्थितीचा सामना करून जे मोठं कार्य करून दाखवलं आहे ते एक सामान्य माणूस स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही.जेव्हा त्यांनी अँपल कंपनी ची सुरुवात केली होती तेव्हा कोणालाच वाटत नव्हतं कि हि पुढे जाऊन जगातली सर्वात मोठी कंपनी बनेल. अँपल कंपनीने बनवलेली उत्पादनांना आज जगात सर्वात जास्त मागणी आहे त्याच पूर्ण श्रेय स्टिव्ह जॉब्स यानाच जातं.चला तर मग तुम्हाला आज स्टिव्ह जॉब्स यांचं पूर्ण जीवनाचं परिचय करून देत आहो.

वाचा स्टिव्ह जॉब्स यांचे प्रेरणादायी विचार


Essay on Steve jobs in marathi Language | स्टिव्ह जॉब्स निबंध


Steve jobs Biography in Marathi

नाव (Name)स्टिव्ह पॉल जॉब्स
जन्म(Birth)24 फेब्रुवारी 1955
जन्म स्थानसेंट फ्रांसिस्को, कैलिफोर्निया
आई वडिलांचे नाव (दत्तक घेतलेले )पॉल जॉब्स
क्लारा जॉब्स
आई वडिलांचे नावयुवान शिबल
अब्दुल फतेह
पत्नी
लोरिन पॉवेल
किर्स्टन ब्रेन्नन
मुलंलिसा ब्रेन्नन
रीड जॉब्स
एरिन जॉब्स
ईव जॉब्स
मृत्यु (Death)5 ओक्टोम्बर 2011 (कैलीफोर्निया)

Parents Of steve jobs| स्टिव्ह जॉब्स यांचे आई वडील

स्टिव्ह जॉब्स (Steve Jobs) यांच्या जीवनाबद्दल सांगायच्या पहिले त्यांच्या आई वडिलाबद्दल माहिती करून घेऊ.स्टिव्ह जॉब्स यांच्या आई च नाव युवान शिबल होतं आणि तिचा जर्मनी च्या ग्रामीण भागातल्या परिवारात जन्म झाला होता.युवान यांच्या वडिलांचे नाव आर्थर शिबल होते व ते ग्रीक च्या बाहेरील प्रदेशात शेती करत होते व आपले पोट भरत होते.आर्थर शेबल हा एक कठोर पुरुष होता जो कॅथोलिक उपासनेचा आदर करीत होता, परंतु मुलगी युआन आपल्या वडिलांपेक्षा वेगळी होती. कॅथोलिक धर्माव्यतिरिक्त तिला इतर समाजांवर देखील प्रेम होते. तिच्या वडिलांनी लहानपणापासूनच त्याचा विरोध केला होता. कॅथलिक श्रद्धेची उपासना करण्या साठी त्यांचे वडील तिच्यावर जोर जबरदस्ती करत होते. त्यामुळे तिच्या मनात आपल्या वडिलांविषयी लहानपणापासून एक चीड निर्माण झाली होती.

जेव्हा युआन यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि महाविद्यालयात पोहचल्या तेव्हा तिचा अब्दुल फतेह जंदाली या सीरियन मुला सोबत संपर्क झाला. दोघांचेही विचार सारखे असल्यामुळे ते दोघेही चांगले मित्र बनले. त्यांची मैत्री हळू हळू प्रेमात बदलली. अब्दुल फतेह यांचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला होता पण ते पण युवानसारख्या सर्व धर्मांचा आदर करत होते. या कारणांमुळे या दोघांमध्ये जवळीक वाढत होती.अब्दुल फतेह यांचे कुटुंब श्रीमंत कुटुंब होते, ज्यांच्या वडिलांनी तेल रिफायनरीमध्ये काम करून खूप पैसे कमावले होते. हळू हळू त्यांचे प्रेम वाढत गेले आणि त्या गर्भवती राहिल्या.त्यानंतर ताबडतोब तिने हे अब्दुल फतेहला सांगितले.

अब्दुल फतेह यांनी लग्नाचे आश्वासन दिले.परंतु युआनच्या वडिलांनी हे लग्न नाकारले कारण तो कट्टर कॅथोलिक होता आणि आपल्या धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्मात लग्न करयाला त्याचा विरोध होता.आता वडिलांच्या दबावाखाली युआनने लग्नाचा निर्णय बदलला. पण त्यावेळी गर्भपात करणे इतके सोपे नसल्यामुळे युआन गर्भपात न करता मुलाला जन्म देण्याचे ठरवते आणि ती त्या मुलाला पॉल जॉब्स आणि क्लारा जॉब्स दंपतीला दत्तक देते आणि अश्या तर्हेने मुलाचं नाव पडतं स्टिव्ह पॉल जॉब्स जो पुढे जाऊन अँपल कंपनीचा संस्थापक बनतो.

Childhood Of steve jobs in Marathi| स्टिव्ह जॉब्स यांचे बालपण

पॉल आणि क्लारा नोकर्‍या स्वीकारल्यानंतर 1961 मध्ये कॅलिफोर्नियाच्या माउंटन व्ह्यू येथे जातात. येथे स्टिव्ह जॉब्स चा अभ्यास सुरू होतो. येथे त्याचे वडील पॉल यांनी उपजीविका करण्यासाठी गॅरेज उघडले. स्टिव्ह जॉब्सला लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत खेळायला खूप आवडायचे, ते आधी इलेक्ट्रॉनिक वस्तू तोडत आणि जोडत असत.

स्टिव्ह जॉब्स (Steve Jobs) चे वडील पॉल जॉब्सला डिझाईनिंग आणि मेकॅनिकलचेही चांगले ज्ञान होते. जेव्हा जेव्हा स्टीव्हला वेळ मिळायांचा तेव्हा तो वडिलांसोबत गॅरेजवर येत असे. तेथे तो आपल्या वडिलांची कामे अगदी जवळून पाहत असे. स्टीव्हच्या बालपणाची आवड यांत्रिकीपेक्षा इलेक्ट्रॉनिक्समध्ये होती. तो वडिलांसोबत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या जुन्या विक्रेत्याकडे जायचा आणि त्याला आवडीचे भाग शोधायचा. यातून, इलेक्ट्रॉनिकचा कोणता पार्ट कोठे वापरला जातो व त्या पार्ट चा उपयोग कसा होते याचे पूर्ण माहिती त्यांना लहानपणीच समजली.

स्टीव्ह चांगला विद्यार्थी होता, पण शाळेत जायला त्याला आवडत नव्हते.स्टीव्हला त्याच्या वयाच्या मुलांशी मैत्री करण्यात त्रास होत होता , तो नेहमी वर्गात एकटाच बसून राहायचा. वयाच्या 13 व्या वर्षी, तो व्होज्नियाकला भेटला, वोझ्नियाकसुद्धा स्टीव्हसारखे स्मार्ट होते, त्यांना पण इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत खेळायला आवडायचे.लवकरच दोघे जिवलग मित्र झाले.

Education Of steve jobs| स्टिव्ह जॉब्स यांचे शिक्षण

हायस्कूल पूर्ण झाल्यानंतर स्टीव्हची ओरेगॉनमधील रीड कॉलेजमध्ये प्रवेश झाला. हे खूप महागडे महाविद्यालय होते, ज्यांची फी पॉल आणि क्लारा यांनी खूप कष्टाने जमा केली होती. आपल्या मुलाच्या चांगल्या शिक्षणासाठी त्यांनी आपल्या जीवनाची संपूर्ण गुंतवणूक केली. येथेच जॉब्सला क्रिस्टन ब्रेनन भेटली पुढे जाऊन तो तिच्यासोबत लग्न करतो. काही दिवसातच स्टीव्हला समजले की तो या महाविद्यालयात येऊन आपल्या पालकांचा पैसा वाया घालवित आहे, येथे राहिल्यास भविष्यात त्याचा कोणताही फायदा होणार नाही. यामुळे त्याने कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला,क्रिस्टन ब्रेननही त्यांच्या या निर्णयामध्ये त्यांच्या पाठीशी उभी होती. स्टीव्ह आता दररोज कॉलेजला जात नसत, तो त्याच वर्गात जायचा ज्या वर्गात त्याला आवड होती. त्यांना कॅलिग्राफी विषयामध्ये आवड होती त्यामुळे त्यांनी कॅलिग्राफी वर्गात शिक्षण घेतले.

त्यावेळी स्टीव्हकडे पैसे नव्हते, तो आपल्या मित्राच्या खोलीत खालीच झोपायचा. अन्नासाठी कोकची बाटली विकून तो पैसे मिळवत असे. यासह ते दर रविवारी हरे कृष्ण मंदिरात जात असत, तेथे त्यांना विनामूल्य भोजन मिळायचे.

History Of apple Company in Marathi| अँपल कंपनी चा इतिहास

जॉब आणि वोझ्नियाक पुन्हा चांगले मित्र बनले आणि एकत्र काम करण्यास सुरवात केली. त्या दोघांनाही संगणकात खूप रस होता. वोज्नियाकला स्वतःचा संगणक बनवायचा होता, वोझ्नियाक हा खुप हुशार होता. त्यांना इलेक्ट्रॉनिक्सची चांगली माहिती होती, म्हणून त्याने एक वैयक्तिक संगणक तयार केला. हे पाहून स्टिव्ह जॉब्स खूप खूष झाले आणि त्यांनी ठरविले कि ते दोघे मिळून एक संगणक बनविणारी कंपनी उघडतील आणि संगणक तयार करतील आणि विकतील.1976 मध्ये जॉब आणि वोज्नियाक यांनी जॉब्सच्या गॅरेजमध्ये संगणकांवर काम सुरू केले.

Steve jobs Biography in Marathi
Image source:-Flickr

त्यांनी एक कंपनी उघडली आणि त्यास ‘Apple‘ अँपल नाव दिले. यावेळी जॉब्स फक्त 21 वर्षांचा होता. apple अँपल कंपनीच्या पहिल्या संगणकाचे नाव Apple 1 हे होते.काही वेळा नंतर, वोझ्नियाक याने Apple 2 वर कार्य करण्यास सुरु केले . ते तयार झाल्यानंतर, ते काही गुंतवणूकदारांसमोर ठेवण्यात आले आणि जॉब्ज आणि वोझ्नियाक यांनी गुंतवणूकदारास बर्‍याच ठिकाणी गुंतवणूकीसाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला.खूप साऱ्या गुंतवणूकदारांनी अँपल कंपनी मध्ये आपले पैसे गुंतवले.

Apple 2 लोकांना खूप आवडले . ही कंपनी खूप लवकर वाढू लागली, 1980 पर्यंत ही एक नामांकित कंपनी बनली. 10 वर्षात Apple कंपनीचे 2 अब्ज पैसे कमावले आणि 4 हजार लोक त्यात काम करू लागले.

मोठी कंपनी बनल्यानंतर Apple कंपनीने आपली तिसरी आवृत्ती Apple 3 आणि त्यानंतर लिसा लाँच केली. लिसा स्टीव्ह आणि ब्रेनन यांच्या मुलीचे नाव आहे, लिसा चा जन्म 1978 मध्ये झाला होता. Apple (अप्पलच्या) च्या नवीन आवृत्त्या फ्लॉप झाल्या, त्या यशस्वी झाल्या नाहीत.स्टिव्ह जॉब्स वर खूप दडपण आले त्यामुळे स्टीव्हने मॅकिंटोश बनवण्यासाठी आपली सर्व मेहनत आणि सर्व ऊर्जा झोकून दिली. १९८४ मध्ये लिसावर आधारित सुपर बाउल निर्माण केले , याला मॅकिन्टोश सोबत लाँच केले गेले. याला खुप मोठ्या प्रमाणात यश आणि प्रसिद्धी मिळाली .

आता Apple आयबीएमच्या सहकार्याने वैयक्तिक संगणक तयार करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आणि कंपनीवर अधिक संगणक बनवण्याचा दबाव वाढला. या संगणकाची संकल्पना कधीही लपलेली नव्हती, यामुळे इतर बर्‍याच कंपन्यांनीही त्याचा अवलंब केला. या इतर कंपन्यांचे संगणक मॅकिंटोश आणि Apple पेक्षा खूपच स्वस्त होते, ज्यामुळे Apple कंपनीचे नुकसान होऊ लागले. यासाठी स्टीव्हला जबाबदार धरण्यात येऊ लागले  आणि त्याच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकू लागले. शेवटी 17 september 1985 ला स्टिव्ह ने  apple कंपनीचा राजीनामा दिला.

Steve jobs Next company| स्टिव्ह जॉब्स ची नेक्स्ट कंपनी

Steve jobs Biography in Marathi

Apple मधून बाहेर पडल्यानंतर स्टीव्हला आता काय करावे हे समजत नव्हते. स्टीव्ह जॉब्स च्या म्हणण्यानुसार, त्याच्या आयुष्यातील ती एक अवघड वेळ होती, त्याला वाटत होते कि आपण आता हरलेलो आहे आता आपण काहीच करू नाही शकणार. परंतु या विचारांच्या दरम्यान, त्याला वाटले की आपले काम आपल्या हातातून गेले आहे, परंतु आपली क्षमता अद्याप आपल्याकडेच आहे. Apple कसे बनवायचे हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. स्टीव्हने पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. या संधीचा फायदा घेऊन त्याने विचार केला की आता आपण मुक्त आहोत, आपल्या इच्छेनुसार आणि कोणच्यापण दबावाला बळी न पडता आपण आपलं काम करू शकतो आणि त्यांनी नवीन कंपनी ची स्थापना केली.

त्या कंपनी च नाव होतं नेक्स्ट(Next) कंपनी. जॉब्सने नेक्स्ट कॉम्प्युटर नावाची कंपनी उघडली, यासाठी त्याला रोझ पेरोट हा मोठा गुंतवणूकदार म्हणून मिळाला. नेक्स्ट (Next ) चे प्रथम उत्पादन high एन्ड पर्सनल कॉम्पुटर होते. 12 ऑक्टोबर 1988 रोजी, नेक्स्ट कॉम्प्यूटर एका मोठ्या कार्यक्रमात लाँच झाला. नेक्स्टचे पहिले वर्कस्टेशन 1990 मध्ये आले, जे खूप महाग होते. नेक्स्ट हा apple व लिसा प्रमाणे तांत्रिकदृष्ट्या पुढे होते, परंतु महाग असल्याने बरेच लोक ते विकत घेऊ शकले नाहीत, ज्यामुळे नेक्स्टलाही तोटा सहन करावा लागला. थोड्या वेळाने स्टीव्हला लक्षात आले आणि त्याने नेक्स्ट कंपनीला सॉफ्टवेअर कंपनीमध्ये रूपांतरित केले,
त्यानंतर नेक्स्ट कंपनी खूप यशस्वी झाली. वेब ऑब्जेक्ट ,वेब अँप्लिकेशन साठी फ्रेमवर्क तयार करुन विक्री करू लागली

Steve jobs Pixar Movie company| स्टिव्ह जॉब्स ची पिक्सर कंपनी

नेक्स्ट कंपनी यशस्वी झाल्यानंतर 1986 मध्ये स्टीव्हने 10 दशलक्ष अमेरिकन डॉलर्समध्ये एक ग्राफिक्स कंपनी विकत घेतली. त्याने त्याचे नाव पिक्सर ठेवले. सुरुवातीला कंपनीने 3 डी ग्राफिक्स सॉफ्टवेअर बनवून विकले. 1991 मध्ये, डिस्नेकडून ऑफर आली आणि पूर्ण लांबीचा चित्रपट करण्यास सांगितले गेले. डिस्नेशी भागीदारी केल्यानंतर पिक्सरने टॉय स्टोरी हा पहिला चित्रपट बनविला. ज्याला बरेच यश मिळाले. यानंतर पिक्सरने फाईंडिंग नेमो, मॉन्स्टर, कार्स, वॉलले आणि सब हा चित्रपट बनविला. स्टिव्ह जॉब्स याने पिक्सरच्या माध्यमातून खूप पैसे कमावले.पिक्सर कंपनी सुध्दा खूप यशस्वी झाली.

Steve jobs Back in company| स्टिव्ह जॉब्स ची Apple कंपनी मध्ये वापसी

1996 मध्ये Apple ने जाहीर केले की ती नेक्स्ट कंपनी $ 427 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी करणार आहे. हा करार फेब्रुवारी 1997 मध्ये अंतिम झाला आणि यासह जॉब्स Apple कंपनी मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून परत आले. Apple या वेळी खूप संघर्ष करत होती, apple कंपनी ला नवीन कल्पनांची आवश्यकता होती, जी त्यास पुन्हा उंचावर नेईल. स्टीव्ह आता Apple संचालक पदी काम करीत होते, आता कंपनीने बरीच नवीन उत्पादने बाजारात आणली. यावेळी आयपॉड म्युझिक प्लेयर, आयट्यून्स म्युझिक सॉफ्टवेअर लॉन्च करण्यात आले.

Steve jobs Biography in Marathi
Image source:-Flickr

दोन्ही उत्पादने खूप यशस्वी झाली आणि Apple (अँपल) ची एक नवीन चांगली प्रतिमा जगासमोर आली. 2007 मध्ये अँपल ने आपला पहिला मोबाइल फोन बाजारात आला, ज्याने मोबाइल जगात क्रांती आणली आणि हा फोन एका रात्रीमध्ये विकला गेला. स्टीव्ह आता एक स्टार झाला होता आणि त्याचे नाव 2000 च्या दशकाच्या नव्या शोधामध्ये जोडले गेले.

Steve jobs Death| स्टिव्ह जॉब्स यांचा मृत्यू

ऑक्टोबर 2003 मध्ये स्टीव्हला कॅन्सरसारख्या भयंकर आजाराचे निदान झाले. त्याला स्वादुपिंडाचा कर्करोग होता. स्टीव्हची जुलै 2004 मध्ये पहिली शस्त्रक्रिया झाली होती, ज्यामध्ये त्याचा ट्यूमर यशस्वीरित्या काढून टाकण्यात आला होता. यावेळी जॉब्स वैद्यकीय रजेवर होते, त्याच्या अनुपस्थितीत टीम कुक Apple चे काम सांभाळत होता.

स्टीव्हने तब्येत चांगली नसताना सुध्दा 2009 पर्यंत काम केले. 2009 मध्ये त्यांची प्रकृती खूपच खालावली आणि एप्रिल 2009 मध्ये त्यांचे यकृत प्रत्यारोपण ऑपरेशन करावे लागले . 17 जानेवारी 2011 रोजी, स्टीव्ह Apple मध्ये परत आले आणि त्याने पुन्हा काम सुरू केले. स्टिव्ह जॉब्स च्या शरीराने अजूनही त्याला हे करण्याची परवानगी दिली नाही, परंतु स्टीव्हला त्याचा कामावर खूप प्रेम होते. आणि ते आपल्या कामाला आरोग्यापेक्षा जास्त महत्वाचे स्थान द्यायचे.

24 ऑगस्ट 2011 रोजी जॉब्सने Apple कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून राजीनामा जाहीर केला. त्यांनी आपला राजीनामा अँपल च्या बोर्डस ऑफ मेंबर्स कडे दिला आणि त्याच्यासोबतच त्यांनी पुढील सीईओसाठी टीम कूकचे नाव दिले.

5 ऑक्टोबर 2011 रोजी स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांचे कॅलिफोर्नियामधील पालो ऑल्टो येथे निधन झाले.

Steve jobs Biography in Marathi स्टिव्ह जॉब्स यांची संपूर्ण माहिती:-

“Think Different ” हा स्टीव्हचा मूळ मंत्र होता.  या शब्दाच्या खोलीसह त्याने उद्योग बदलले आणि business मॉडेल ला एक नवीन परिभाषा दिली. त्यांचा नेहमी असा विश्वास होता की जर आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आपण कोणाचीही वाट न पाहता एकटेच चालणे शिकले पाहिजे.

 

STAY HUNGRY STAY FOOLISH

मित्रानो तुमच्याकडे जर स्टिव्ह जॉब्स याच्या विषयी अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Steve jobs Biography in Marathi article मध्ये upadate करू
Steve jobs Biography in Marathi हि पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या मित्रमंडळी मध्ये share करायला विसरू नका.

1 thought on “Steve jobs Biography in Marathi | स्टिव्ह जॉब्स यांची संपूर्ण माहिती”

Leave a Comment