Akbar Birbal Stories in Marathi-अकबर बिरबल कथा:- मित्रानो तुमच्यासाठी येथे आम्ही अकबर बिरबल च्या कथा Akbar Birbal Stories in Marathi घेऊन आलो आहोत. आम्हाला आशा आहे कि तुम्हाला या नक्कीच आवडतील
मूर्ख प्रश्न
Table of Contents
एकदा दरबार चालू असताना बादशहाच्या मनात एक विचार आला. त्याने दरबालातील सर्व कामे बाजूला ठेऊन बिरबलला विचारले, बिरबल एखाद्या नालायक माणसाशी गाठ पडली तर काय करावे? बिरबल खूप कामात होता. कामाच्या वेळी बादशाहाने असा विचित्र प्रश्न विचारलेले बिरबलला आवडले नाही. परंतु काहीही न बोलता त्याला गप्प बसून आपले कामही करता येण्या सारखे नव्हते. “महाराज आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ह्याच वेळी मिळेल.
बिरबल दरबारातील आपल काम उरकून घरी गेला आणि आपल्या एका मित्राला घरी बोलवलं. तो म्हणाला उद्या तू माझ्या बरोबर बादशहाच्या दरबारात ये. बादशहा तुला प्रश्न विचारतील तू काही बोलू नकोस. बादशहाने कितीही प्रयत्न केले तरी तू तोंड उघडू नकोस. घरी आल्यावर मी तुला इनाम देईन.
दुसऱ्या दिवशी मित्राला घेऊन बिरबल बादशहाच्या दरबारात गेला. बादशहाला मुजरा करून तो म्हणाला महाराज आपल्या कालच्या प्रश्नाच उत्तर माझा हा मित्र देईन. विचारा त्याला प्रश्न.
बादशाहने त्याला प्रश्न विचारला एखादया नालायक माणसाशी गाठ पडली तर शहाण्या माणसाने काय करावे? बिरबलचा मित्र काही न बोलता चुळबुळ करत राहिला. बादशहाने आपला प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला. परंतु बिरबलचा मित्र गप्पच.
शेवटी बादशहा चिडला तो बिरबलाला म्हणाला, काय मूर्ख पणा चालवला आहे. तुझा मित्र तर काहीच बोलत नाही. बिरबल नम्र पणे म्हणाला महाराज , माझ्या मित्राने आपल उत्तर दिले आहे. नालायक माणसाबरोबर गाठ पडली तर गप्प राहावे. बादशहाला उत्तर मिळाले. परंतु बिरबलने आपलयाला नालायक ठरविल्या मुळे तो मनातून खजील झाला.
Akbar Birbal Stories in Marathi
बिरबलाची खिचडी
थंडीचे दिवस होते. सम्राट अकबराने एके दिवशी एक अजब घोषणा केली. त्याच्या राजवाड्यासमोरच्या जलकुंडात रात्रभर कुणी उभा राहिल्यास त्याला शंभर सुवर्ण मुद्रा देण्यात येतील, अशी दवंडी पिटवली जाते. ती ऐकून एक गरीब माणूस ते साहस करायला तयार होतो. तो रात्रभर त्या जलकुंडात काकडत उभा राहतो. सकाळी अकबर येतो, तेव्हाही तो आपल्या जागेवर उभा असतो. पण अकबराची नजर जलकुंडाजवळ ठेवलेल्या एका छोट्याश्या दिव्याकडे जाते.
अकबर विचारतो, दिवा रात्रभर तेवत होता का? सेवक, होय म्हणतो. रात्रभर दिवा तेवत राहिल्याने जलकुंडात उभा राहणार्या माणसास उब मिळाल्याचे अनुमान अकबर काढतो.आणि शंभर सुवर्ण मुद्रांचे बक्षीस देता येणार नसल्याचे बजावतो. तो गरीब माणूस बिचारी दु:खी होतो. त्याला वाटते की आता बिरबलच आपल्याला न्याय देईल. तो बिरबलाकडे जाऊन संपूर्ण घटना सांगतो. बिरबल त्याला म्हणतो, ‘तू आता घरी जा. मी बघतो काय करायचे ते.’
अकबर बिरबल कथा
दुसर्या दिवशी दरबार भरतो. रोज वेळेवर येणारा बिरबल आज आला नाही, म्हणून अकबर सेवकामार्फत बोलाविणे पाठवितो. सेवक जाऊन परत येतो व बिरवल खिचडी शिजवत असल्याचे सांगतो. बिरबल खिचडी शिजल्यानंतरच येणार असल्याने राजा दरबाराच्या कामास सुरवात करतो. दुपार झाल्यावरही बिरबल न आल्याने राजा सेवकाला पाठवितो. दूसरा सेवकही बिरबलाची खिचडी झालीच नसल्याचे सांगतो.
अकबराला आश्चर्य वाटते. दरबार संपतो तरी बिरबल येत नाही म्हणून अकबरच त्याच्या घरी जातो. तेथे गेल्यानंतर पाहतो तो काय. बिरबलाने छोटी चूल पेटवून बर्याच उंचीवर एका मडक्यात खिचडी शिजायला ठेवलेली असते. अकबर हसतो आणि म्हणतो, अरे बिरबल तू एवढा हुशार आणि चतुर. मग तुला एवढे समजत नाही, की खिचडी आणि विस्तवात एवढे अंतर असेल तर ती तापेल कशी?तेव्हा बिरबल म्हणतो, ‘क्षमा असावी महाराज, दूरच्या दिव्याची उब घेऊन एखादा माणूस रात्रभर कडाक्याच्या थंडीत उभा राहू शकतो, मग याच न्यायाने खिचडी शिजायला काय हरकत आहे? राजाच्या चूक लक्षात येते. रात्रभर पाण्यात उभा राहणारया माणसाला तो तातडीने बोलावणे पाठवून शंभर सुवर्ण मुद्रांचे बक्षीस देतो.
विचित्र परीक्षा
बऱ्याच दिवसानंतर बादशाहाला आपल्या सरदारांची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली. त्याने आपल्या सरदारांना मांजरीची गोजिरवाणी पिल्ल दिली. तो म्हणाला आज पासून बरोबर सहा महिन्यांनी हि पिल्ल घेऊन दरबारात यायच आहे. ज्याचे मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशाह कडून मोठ बक्षीस दिल जाईल.
प्रत्येक सरदार आपलयाला मिळालेल्या मांजराचे पिल्लू घेऊन घरी गेले. घरातल्या माणसांना त्यांनी बादशाहाने ठेवलेल्या बक्षीसाबद्दल सांगितले. मांजराला चांगली मिठाई व दुध खाऊ पिऊ घाला अशी घरतल्या माणसांना सूचना दिली.
प्रत्येक सरदाराच्या घरी मांजरांचा खुराक चालू झाला. हळू हळू मांजराच्या अंगावर तेज येऊ लागल. ती चांगली गुबगुबीत दिसू लागली. मात्र बिरबलान आपलयाला मिळालेल्या मांजराला असा खुराक दिला नाही. घरातल्या साध्या अन्नावर त्याला वाढववील. उंदीर पकडायला शिकवलं. बिरबलाचे मांजर उंदीर पकडण्यात तरबेज झाले. मात्र ते हडकुळे राहिले.
अकबर बादशहाने एक चांगला दिवस ठरवून सर्व सरदारांना आपआपली मांजर दरबारात घेऊन यायला सांगितले. प्रत्येक जन आपआपली मांजर घेऊन दरबारात आला. अकबरान सर्व मांजरा वरून नजर फिरवली. बिरबलाच्या हातातील हडकुळे मांजर पाहून बादशाहाला हसू आले. आपले हसू दाबीत बादशहा म्हणाला “बिरबल सर्व सरदारांची मांजर गुबगुबीत दिसत असताना तुझे मांजर हडकुळे का?”
अकबर बिरबल कथा
बिरबल आपल्या मांजरी वरून हात फिरवत म्हणाला, “खाविंद आपण मांजराची परीक्षा तर घ्या.” उंदीर पकडन हे मांजराचे काम आहे. त्यात ते पटाईत असायला हवे. बादशाहने मान हलवली आणि नोकराला दरबारात उंदीर सोडायला सांगितले. पंधरा वीस उंदीर दरबारात धाऊ लागले. प्रत्येक सरदाराने त्या दिशेने आपली मांजर सोडली. बिरबलाच्या मांजराने तर बिरबलाच्या हातातून उडी मारली. ते उंदराच्या मागे सुसाट धावत सुटले. त्याने दोन तीन उंदीर मारले देखील. इतर गलेलठ्ठ मांजरे फक्त आपल्या गोंडेदार शेपट्या फुगवून तशाच जागेवर बसून पाहून लागली. त्यांनी फक्त आपल्या मिशा फेंदारल्या होत्या आणि अंग फुगविले होते. सरदार त्यांना पुढे ढकलत होते. परंतु जागेवरून हलण्याची त्यांची तयारी नव्हती.
बादशहाने बिरबलच्या मांजराला श्रेष्ठ ठरवून बिरबलाला भल मोठ बक्षीस दिल.
अकबर बिरबल कथा- हा नोकर चोर आहे
एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली आहे. माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातील एकजणही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.
बिरबल त्या व्यापार्याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठ्या आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.
दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसर्या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या.
त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, ‘हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले.’ शेवटी त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापार्याचे दागिने परत केले.
विहिरीचे लग्न
एकदा बादशहा आणि बिरबल मध्ये खूप कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात बादशहा बिरबलाला म्हणाला तू राजधानी सोडून चालता हो. तुझी मला मुळीच गरज नाही.
बिरबल अतिशय स्वाभिमानी होता. तो ताबडतोब राजधानी सोडून निघून गेला आणि एका गावात वेश बदलून राहू लागला.
बरेच दिवस उलटून गेले तरी बिरबल राजधानी मध्ये परतला नाही. बादशाहला मात्र सारखी त्याची उणीव भासे, त्याची कामे अडून राहू लागली आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे बादशाहला त्याच्या शिवाय करमत नव्हते. अन्न गोड लागत नव्हते. बादशाहाने अनेक प्रकारे बिरबलाचा शोध घेतला. परंतु बिरबल सापडत नव्हता.
बिरबलाला कसे शोधून काढावे यावर बादशाहने खूप विचार केला. बादशाहने बिरबलाच्या सहवासात बरेच दिवस घालवले होते. त्यामुळे बादशाहालाही त्याला शोधून काढण्याची युक्ती सुचली. त्याने प्रत्येक गावात दवंडी पिटली. राजवाड्यातील विहिरीचे लग्न करावयाचे आहे.
लग्न समारंभ थाटात होणार आहे. तरी प्रत्येक गावाच्या लोकांनी आपआपल्या विहिरीसह उपस्थित रहावे. जे उपस्थित राहणार नाही त्यांना जबरदस्त दंड केला जाईल. सर्व लोक चिंतेत पडले कुणालाच काही सुचेना.
बिरबल ज्या गावात राहत होता त्या गावातले लोकहि चिंतेत पडले होते. गावच्या पुढारींना या समस्येला कसे तोंड द्यावे समजत नव्हते. ठिकठिकाणी चर्चा सुरु झाल्या लोकांची मते घेतली जाऊ लागली. अशाच एका सभेला शेतकऱ्याचा वेश घेतलेला बिरबल हजर होता. त्याने गावकरींना जाण्याची युक्ती सांगितली.
गावकरी खुश झाले. एक दिवस गावातील पाच-सहा प्रमुख पुढारी उंची वस्त्रे घालून दिल्लीला गेले. दरबारात बादशहा पुढे हात जोडून ते म्हणाले, “खाविंद आपल्या आज्ञेप्रमाणे आणि निमंत्रण स्वीकारून आपल्या राजवाड्यातील विहिरीच्या लग्नाला आमच्या गावाच्या झाडून सर्व विहिरींना घेवून आम्ही हजर झालो आहोत.”
आमच्या गावच्या विहिरी वेशी बाहेर थांबल्या आहेत. तेव्हा आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे राजधानीतील काही प्रमुख विहिरींना त्यांचे स्वागत करण्यासाठी वेशी पर्यंत पाठवावे. त्याचे बोलणे ऐकून बादशहा जोरात हसला आणि ओरडला, बिरबल सापडला!
बादशहा म्हणाला, अजून पर्यंत एकही गावाचे लोक राजधानीत आले नाही. तुम्हीच प्रथम हजर झाला. तुम्हाला हि युक्ती कोणी सांगितली?
“एका शेतकऱ्याने महाराज!”, गावकऱ्यांनी नम्र पने उत्तर दिले. तो शेतकरीच माझा बिरबल आहे. बादशाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ताबडतोब त्याने माणसांबरोबर लवाजम्यासहित काझीला पाठवले. बिरबलला राजधानीत सन्मानाने आणण्याचा हुकुम दिला.
बिरबल बादशाच्या महालात आला आणि त्याने बिरबलाला मिठी मारली.
हे पण वाचा
तीन काम पंचतंत्र कथा
हत्ती आणि ससा पंचतंत्र कथा
अकबर बिरबल कथा- पाच मूर्ख
अकबर बिरबल सभेत बसून गोष्टी करत होते. तेव्हाचं अकबर म्हणाला मला या राज्यातील 5 मूर्ख शोधून दाखवं. राजाचा आदेश ऐकून बिरबलाने शोध सुरू केला. एका महिन्यानंतर बिरबल दोन लोकांना घेऊन परतला तर अकबर म्हणाला, मी तर तुला 5 मूर्ख आण्यासाठी सांगितले होते आणि तू फक्त दोनचं घेऊन आला.
पहिला मूर्ख: यावर बिरबल म्हणाला, सम्राट! हा पहिला मूर्ख आहे. मी याला बैलगाडीवर बसून जड बॅगचं ओझं डोक्यावर घेताना पाहिले. कारण विचारल्यावर हा म्हणाला की बैलाला जास्त ओझं नको म्हणून मी ते डोक्यावर घेतलं आहे. या प्रकारे हा पहिला मूर्ख आहे.
दुसरा मूर्ख: हा दुसरा मूर्ख जो आपल्या म्हशीला गवत खिलवण्यासाठी गच्चीवर घेऊन जातो. कारण विचारल्यावर म्हणाला की गच्चीवर गवत उगते म्हणून मी म्हशीला वरती नेतो. हा माणूस गच्चीवरील गवत कापून फेकू शकत नाही आणि म्हशीला वर घेऊन जातो म्हणजेच की हा दुसरा मूर्ख आहेत.
तिसरा मूर्ख: सम्राट! आपल्या राज्यात इतके काम आहे, पूर्ण राज्याची नीती मला संभालायची आहे. असे असूनही मी या मूर्खांना शोधण्यासाठी एक महिना वाया घालवला म्हणून तिसरा मूर्ख मीच आहे.
चौथा मूर्ख: सम्राट! पूर्ण राज्याची जबाबदारी आपल्यावर आहे. सुपीक डोके असणार्यांकडून आपण कामाची अपेक्षा ठेवू शकतो आणि मूर्ख लोकं आमच्यासाठी मुळीच कामाचे नाही तरीही आपण मूर्खांच्या शोधात आहे या अर्थी आपण चौथे मूर्ख आहात.
पाचवा मूर्ख: सम्राट! आता मी सांगू इच्छित आहोत की सगळ्यांना इतके काम आहेत. आपआपल्या नोकरी-धंध्यातील इतके महत्त्वाचे काम सोडून जो हा किस्सा वाचत आहे आणि पाचवा मूर्ख कोण हे माहीत करण्यासाठी अजून ही वाचतोय तोच पाचवा मूर्ख आहेत.
जे होत ते चांगल्यासाठीच
Akbar Birbal Stories in Marathi:- एकदा अकबर आणि बिरबल शिकरीला जात असतात, तलवार काढताना अकबर चा अंगठा कापला जातो… अकबरला खूप त्रास होतो, तो ओरडायला लागतो… तो शिपायांना वैद्य घेऊन या म्हणून म्हणून… शहरात पाठवतो… तेवढ्यात बिरबल त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, ”महाराज…शांत व्हा…जे होतं ते चांगल्यासाठीच होतं…”
अकबर ला राग येतो…तो जास्तच चिडतो…आणि शिकयांना सांगतो ” जा बिरबल ला घेऊन जा…रात्रभर उलटं टांगून ठेवा….आणि सकाळी-सकाळी फाशी द्या ” सर्व शिपाई तिथून निघून जातात….अकबर एकटाच जंगलात असतो….तो एकटाच पुढे शिकार करायला जातो…!!
पुढे काही आदिवासी त्याला पकडून घेऊन जातात, आणि त्याला डांबून ठेवतात.. अकबर ची बळी ते देणार असतात…त्यासाठीची विधी करण्यात आदिवासी मग्न होतात…तितक्यात एका आदिवासी ची नजर अकबर च्या तुटलेल्या अंगठ्याकडे जातो व तो ओरडून सर्वांना सांगतो ,” हा अशुद्ध आहे…आपण याची बळी नाही देऊशकत… याचा अंगठा तुटलेला आहे…
आदिवासी अकबर ला सोडून देतात…आणि त्याला बिरबल चं बोलणं आठवतं,’ जे होतं ते चांगल्यासाठीच होतं..’ तो धावत पळत त्याच्या महलात येतो, बिरबल ला फाशी होणारच असते तितक्यात तो तिथे जाऊन बिरबलला घट्ट मिठी मरतो आणि सर्व हकीकत सांगतो….आणि म्हणतो, ” मला माफ कर….तुझ्यामुळे मी वाचलो…आणि बघ माझ्यामुळे तुझी काय हालत झाली….”
” बिरबल हसतो आणि म्हणतो, ”नाही महाराज….जे होते ते चांगल्यासाठीच होता…” अकबर स्तब्ध होतो आणी विचारतो असं कसं…तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला…चांगलं कसं झालं??? त्यावर बिरबल म्हणतो, ” महाराज…मी जर तुमच्यासोबत शिकरीला आलो आसतो तर त्यांनी माझा बळी दिला असता…..म्हणून म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं….
तात्पर्य: मित्रांनो, आयुष्यात असे क्षण येतील जेंव्हा तुम्ही खचून जाणार, पण लक्षात ठेवा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं….कदाचित पुढे त्याचा ऊपयोग तुमच्या चांगल्यासाठी होईल…!!!
मित्रांनो हि अकबर बिरबल कथा-Akbar Birbal Stories in Marathi जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद