Top 5 Short Stories In Marathi || Short Marathi Katha

Top 5 Short Stories In Marathi || Short Marathi Katha :-तुम्हाला पण Moral Stories आणि Short Marathi Katha वाचायला आवडतात का? चला तर मग आज आपण  Short Stories In Marathi पाहणार आहोत.

Top 5 Short Stories In Marathi कथेचं नाव – फुटलेला माठ

एका गावात एक माळी राहत होता. त्याच्या बागेत खूप सारी फुलझाडे भरलेली असायची. पण त्या फुलझाडांना पाणी देण्यासाठी त्याला दूरच्या नदीवर जावे लागायचे. तो रोज सकाळी उठून नदीवर जायचा. पाणी आणण्यासाठी त्याच्याकडे एक कावड होती. त्या कावडीच्या दोन्ही बाजूंना एक एक माठ त्याने बांधलेला होता. ती कावड खांद्यावर लटकवून तो रोज पाणी आणायचा आणि फुलांना टाकायचा.

त्या दोन वाट्यांपैकी एक माठ थोडासा फुटलेला होता आणि दुसरा माठ अगदी व्यवस्थित होता. माळी जेव्हा पाणी आणायचा त्यावेळी फुटलेल्या माठातून वाटेत पाणी सांडायचे त्यामुळे माळी दीड माठच पाणी आणू शकायचा.

असे बरेच दिवस गेले. चांगल्या माठाला आपण खूपच चांगले असल्याचा अभिमान होता. तर फुटलेल्या माठाला नेहमी वाईट वाटत असेल. फुटलेला माठ विचार करायचा की माझ्यातल्या कमतरतेमुळे माळी मला पूर्ण म्हणून नेऊ शकत नाही. माझ्यामुळे माळ्याची कष्ट वाया जातात.

एक दिवस न राहून फुटलेल्या माठाने माळीला विचारले, “माळी दादा, मला तुमची क्षमा मागायची आहे.”

माळी म्हणाला, “कशासाठी माझ्या फुटलेल्या माठा ?”

फुटलेला माठ म्हणाला, “माळी दादा, मी एका ठिकाणाहून फुटलेलो आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून मी तुम्हाला फक्त अर्धेच पाणी देतो आहे. माझ्यामुळे तुमची निम्मी मेहनत वाया जाते आहे. म्हणून मला क्षमा करा.”

माळीला फुटलेल्या माठाचे म्हणणे ऐकून दुःख वाटले. तो त्या माठाला म्हणाला, “मित्र तुझ्यामुळे बोलण्यामुळं मला बरे वाटले. पण माझी मेहनत वाया गेलेली नाही.”

फुटलेला माठ म्हणाला, “ती कशी काय?”

माळी म्हणाला, “याचे उत्तर आपण त्या वाटेने पुन्हा जाऊ तेव्हा तुला मिळेल.”

असे म्हणून माळी पाणी घेऊन घरी निघाला.

वाटेत त्याने फुटलेल्या माठाला सांगितले, “मित्रा, आपण ज्या वाटेने जातो आहोत त्या वाटेवर खाली पहा.”

उठलेल्या माठाने खाली बघितले. खाली अनेक रंगांची फुले होती.

माळी म्हणाला, “मित्रा, तुझ्या बाजूने आहेस त्या बाजूने मी अनेक रंगबीरंगी फुलांची बिया पेरल्या होत्या. आणि रोज येताना तुझ्यातून जे पाणी सांडायचे ते पाणी या बीजांना मिळायची. म्हणूनच अशी सुंदर फुले आज उमलून आलेली आहेत.”

चांगल्या माठाच्या पाण्यामुळे फक्त बागेतली फुले फुलतात आणि मलाच आनंद देतात. तुझ्या पाण्यामुळे वाटेवरून जाणाऱ्या प्रत्येकाला आनंद मिळतो. त्यामुळे मित्रा माझी कष्ट वाया गेलेली नाहीत. आणि तुझ्या फुटकेपणा ही काही कमतरता नाही.”

मग तो माळी चांगल्या माठाला म्हणाला, “मित्र, कोणाच्याही कमतरतेकडे न बघता त्याच्या चांगल्या गुणांकडे बघितले पाहिजे.”

निष्कर्ष

आपल्याकडे कोणतीही कमतरता असली तरी त्याकडे न बघता आपल्याकडे असलेल्या चांगल्या गुणांकडे बघावे. आपल्या कमतरतेमुळे आपण स्वतःला कमी लेखू नये. आपली कमतरता आपली ताकद बनवू शकते.

Short Marathi Katha कथेचं नाव – प्रयत्न

एकदा एक माणूस रस्त्याने जात होता. त्याला रस्त्याच्या कडेला एक हत्ती दिसला. त्याला पाहून तो अचानक थांबला कारण हत्तीच्या पुढच्या पायात एक साधी दोरी बांधलेली त्याने पाहिली. त्याला खूप आश्चर्य वाटले की हत्ती सारखा महाकाळ प्राणी लोखंडी साखळदंडा ऐवजी फक्त एका छोट्या दोरीने बांधलेला आहे. तर असं दिसत होतं की हत्ती बंधन तोडून पाहिजे तेव्हा जाऊ शकला असता पण तो तसं करत नव्हता.

माणसाला काही केल्या कळत नव्हतं की हत्ती का पळून जात नाही. म्हणून त्यांनी जवळच उभ्या असलेल्या माणसाला विचारलं.

“इतक्या साध्या दोरीने बांधलेला हा हत्ती दोरी तोडून पळून जाण्याचा प्रयत्न पण करत नाहीये. असं कसं शक्य आहे.

दुसरा माणूस: “लहानपणापासून हा हत्ती या दोरीनेच बांधलेला आहे. तो जेव्हा लहान होता तेव्हा त्यांच्या दोरीचे बंधन तोडण्याची ताकद नव्हती. सुरुवातीला त्याने बरेच प्रयत्न केले पण दोरी त्याच्याने मग वारंवार येणाऱ्या अपयशामुळे हळूहळू त्याला खात्री झाली की आपण ती दोन्ही तोडू शकत नाही आणि मग मोठा झाल्यावरही त्याचा तो विश्वास आहे. त्यामुळे तो आता ही दोरी एका झटक्यात तोडू शकत असूनही कधीही ती त्याचा प्रयत्न करत नाही.”

माणूस आश्चर्यचकित झाला. एवढा शक्तिशाली हत्ती त्याच्या बंधन तोडू शकत नाही कारण त्याला ते तो करू शकत नाही यावर विश्वास होता.

निष्कर्ष:

आपल्या आयुष्यातही असेच अनेक वेळा होते. आपण काहीतरी करू शकतो यावर विश्वास ठेवला नाही तर आपण ते कधीच करू शकत नाही. आपण आपल्या स्वतःच्या कल्पना आणि विश्वासांमुळे स्वतःला अडकवून ठेवतो.

आपण आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि प्रयत्न करायला घाबरू नये. प्रयत्न केल्याशिवाय आपण कधीच यशस्वी होऊ शकत नाही.

Short Marathi Katha कथेचं नाव – जिंकणारा घोडा

तुफान हा अरबी जातीचा उंच आणि शानदार घोडा होता. तो अजून फक्त एक वर्षाचा होता. तो त्याच्या वडिलांसोबत रोज शर्यतीच्या ट्रॅकवर जायचा. तुफानच्या वडिलांचे नाव होते राजा आणि तो एक उत्तम पळणारा घोडा होता. तो त्याच्या मालकाला नेहमीच पहिल्या क्रमांकाला जिंकून आणायचा.

तुफानला सुद्धा आपल्या वडिलांसारखं सर्वोत्तम पळणारा घोडा बनण्याची इच्छा होती. पण उंच उंच अडथळ्यांना बघून त्याचं मन उदास होऊन जायचं. याला वाटायचं आपण आपल्या वडिलांसारखं सर्वोत्तम कधीच करू शकणार नाही.

एक दिवस तुफान ट्रॅक जवळ उदासपणे उभा होता. तेवढ्यात तिथे त्याचे वडील राजा आले. तुफानला उदास वाहून राजाने त्याला विचारलं, “काय तुफान, आज तू उदास का दिसतोयस?”

तुफान पूर्णपणे म्हणाला, “बाबा काही नाही. मी आज तुमच्यासारखं इथे येऊन उडी मारण्याचा प्रयत्न करत होतो. पण मी उडी न मारता तोंडावरच पडलो. मला वाटतं मी तुमच्यासारखा कधीच होऊ शकणार नाही.”

राजाला तुफानच्या उदासीचे कारण कळलं. पण तो त्याला तेव्हा काहीच न बोलता तबेल्यात घेऊन गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी राजा तुफानला घेऊन एका दुसऱ्या मैदानावर गेला. तिथे एक छोटासा दगड होता. त्या दगडाकडे बघत राजा तुफानला म्हणाला, “आता या दगडावरून उडी मारून दाखवा.”

तुफान म्हणाला, “बाबा हे काय हा तर छोटासा दगड आहे. याला तर मी सहज पार करेल. मला मोठ्या अडथळ्यांवरून उड्या मारायचे आहेत.”

राजा म्हणाला, “तुफान, तू कर तर खरं. मी सांगतो फक्त तेवढं कर.”

तुफानी आपल्या वडिलांचे म्हणणे ऐकलं आणि त्याने त्या दगडावरून उड्या मारल्या. तो दिवस तसाच निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सुद्धा राजाने तुफानला त्याच दगडावरून पुन्हा उड्या मारायला सांगितल्या. तुफानही आपल्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे केलं. आठवड्याभरा नंतर राजाने तुफानला पहिल्या दगडापेक्षा आणखी थोडा मोठा दगड दाखवला आणि म्हणाला, “आता या दगडावरून उडी मार.”

काही दिवस तुफानने त्या दगडावरून सुद्धा उड्या मारल्या. राजा अशाच प्रकारे थोड्या थोड्या दिवसांनी दगडांची उंची वाढवत गेला आणि तुफान सुद्धा त्या उंच दगडांवरून सहज उड्या मारू लागला.

मग एक दिवस राजा तुफानला शर्यतीच्या ट्रॅकवर घेऊन आला आणि राजा तुफानला म्हणाला, “तुफान, आता तू ज्या अडथळ्यावरून तोंडावर पडला होतास त्याच अडथळ्यावरून उडी मारून दाखवा.”

तुफानला आता मोठ्या अडथळ्यांवरून उडी मारण्याची सवय झाली होती. त्याने ते शर्यतीतल्या अडथळ्याकडे पाहिलं. तुफान आत्मविश्वासाने पळू लागला. अडथळा जवळ येताच त्यांनी अडथळ्यावरून दमदार उडी मारली आणि तुफान क्षणात अडथळ्याच्या पार जाऊन पोहोचला.

तुफानला खूप आनंद झाला. त्याच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आणि मग भविष्यात सुद्धा तुफान एक नावांत जिंकणारा घोडा म्हणून प्रसिद्ध झाला.

निष्कर्ष:

या गोष्टीचा तात्पर्य असं की एखादी लक्ष प्राप्त करायचं असेल तर त्याची सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींपासून गेली पाहिजे म्हणजे यश सोपं होतं.

Short Marathi Katha कथेचं नाव – गरीब शेतकरी आणि लालची शेतकरी

एक गरीब शेतकरी होता त्याच्याकडे थोडीच जमीन होती. कमी जमीन असल्यामुळे त्याचा फक्त रोजच्या गरजा भागत असत. त्यामुळे तो नेहमी दुःखी राहायचा. त्याला वाटायचं आपल्याकडे खूप जमीन असावी. मला भरपूर जमीन मिळाली तर मी खूप श्रीमंत होईन, लोक माझे कौतुक करतील, माझ्या कुटुंबाची काळजी घेऊन चांगले जीवन जगू शकेन, असे त्याला वाटायचे.

पण त्याच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तो काहीही करत नव्हता. तो फक्त देवाला जास्त जमीन मागत राहायचा. जास्त जमिनीचा त्याला खूप हव्यास लागला होता.

देवानेही एक दिवस त्याला दर्शन द्यायचे ठरवले.

एक दिवस तो शेतकरी सकाळी जागा झाला. डोळे उघडताच त्याला समोर देवाचे दर्शन झाले. त्याला खूप आनंद झाला. आता आपली इच्छा पूर्ण होणार असं त्याला वाटू लागले.

त्याने नमस्कार करून देवाला विनंती केली, “देवा, मला खूप सारी जमीन मिळू दे.”

देव म्हणाले, “ठीक आहे, तू आता पळायला सुरुवात कर. सूर्यास्त होईपर्यंत तू जेवढ्या जमिनीपर्यंत जाऊन पुन्हा इथे येऊन पोहोचशील तेवढी जमीन तुझी होईल.”

असे बोलून देव दृश्य झाला.

शेतकऱ्याला खूप आनंद झाला आणि देवाने सांगितल्याप्रमाणे पळायला सुरुवात केली.

पळत पळत तो खूप लांबपर्यंत पोहोचला. पण जास्त जमीन मिळवायची त्याची हव्यास काही सुटत नव्हता. म्हणून तो आणखी पुढे पळू लागला. त्याला वाटलं, सूर्यास्ताला अजून खूप वेळ आहे. आपण सहज घरी परत पोहोचू. म्हणून तो आणखी पुढे पळू लागला.

पण आता तो खूप थकला होता. तो इतका थकला, इतका थकला की तिथे पोहोचल्याबरोबर त्याला चक्कर येऊ लागले. तो धाडकन खाली पडला. त्याला आपण आता मारणार असं वाटू लागलं. त्याचं कुटुंब त्याच्या डोळ्यासमोर आलं. त्याची छोटीशी जमीन त्याला आठवू लागली. त्याला त्याच्या लोभीपणाचा तिरस्कार वाटू लागला. तो पश्चातापाने रडू लागला.

एवढ्या वेळी तिथे देव प्रकट झाला. देवाने त्याला विचारलं, “काय, आता तुला अजून जमीन हवी आहे का?”

तेव्हा शेतकरी म्हणाला, “देवा, मला क्षमा करा. यापुढे मी खूप कष्ट करेन आणि स्वतःच्या जीवावर जमीन घेईन.”

हे ऐकून देवाला खूप प्रसन्न वाटलं. देव अदृश्य झाला.


हे पण वाचा
अकबर बिरबल मराठी कथा
पंचतंत्र मराठी कथा
दोन सापांची पंचतंत्र कथा
हत्ती आणि सशाची पंचतंत्र कथा
राजा आणि मूर्ख माकड पंचतंत्र कथा
व्यापारी आणि उंट


निष्कर्ष:

या गोष्टीचा तात्पर्य असं की, अति हव्यास हा विनाशालाच आमंत्रण देतो. जास्त हव्यास करू नका. लोभीपणा करू नका आणि समाधानी रहा.

Short Stories In Marathi

Short Stories In Marathi कथेचं नाव – श्रमाचे फळ

एका गावात दोन मित्र राहत होते, एक शामलाल आणि दुसरा रामलाल. दोघांची खूप घट्ट मैत्री होती. शामलाल हा खूप धार्मिक माणूस होता, तो नेहमी देवाच्या भक्तीमध्ये मग्न असायचा आणि देवाच्या भरवशावर राहायचा. तर रामलाल मात्र खूप मेहनती होता.

एकदा दोघं मित्रांनी जमीन विकत घेऊन शेती करण्याचा विचार केला. दोन्ही मित्रांनी शेत विकत घेतले. रामलाल रात्रंदिवस शेतात काम करायचा आणि शामलाल मात्र मंदिरात बसून देवाकडे चांगले पीक येण्यासाठी प्रार्थना करायचा. अशाप्रकारे वेळ निघून गेला आणि काही दिवसांनी पीक पिकले. पीक काढणीनंतर त्यांनी बाजारात जाऊन विकली. त्याची त्यांना चांगले पैसे मिळाले.

तेव्हा रामलाल म्हणाला, “यात माझा अधिक वाटा आहे, कारण मी शेताला खत आणि पाणी देऊन रात्रंदिवस मेहनत घेऊन पिके घेतली आहेत.” पण हे ऐकून शामलाला मात्र राग आला. तो म्हणाला, “मला मला आणखी पैसे मिळाले पाहिजेत, कारण मी माझ्या शेतात चांगले पीक येण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे आणि देवाच्या इच्छेशिवाय कोणीही काहीही करू शकत नाही.”

यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. ते प्रकरण गावाच्या सरपंचांपर्यंत पोहोचले. गावाचे सरपंचांनी सर्व हकीकत ऐकून निर्णय घेतला. सरपंचांनी दोन्ही मित्रांना तांदळाची पोती दिली. त्या तांदळामध्ये छोटे छोटे खडे मिसळले होते. सरपंच म्हणाले, “सकाळपर्यंत मला या तांदळाच्या पोती मधून तांदूळ आणि खडे वेगळे करून आणा. मग मी सकाळी ठरवेल की पिकासाठी कोणाला जास्त पैसे द्यायचे.”

दोघेही आपापली तांदळाची पोती घेऊन घरी गेले. रामलालने तांदळाची पोती उघडली आणि त्यातून खडे वेगळे करायला सुरुवात केली. शामलाल मात्र तांदळाची पोती घेऊन मंदिरात गेला आणि तांदळाचे खडे वेगळे करण्यासाठी देवाला प्रार्थना करू लागला. तो म्हणाला, “देवा, माझ्या तांदळातले खडे वेगळे करून दे.” असं म्हणून शामलाल घरी निघून गेला.

दुसरा दिवस उगवला. दोघेही दुसऱ्या दिवशी सकाळी सरपंचाकडे आले. रामलालने रात्रभर जागरण करून तांदळातली खडे वेगळे केले होते. ते पाहून सरपंचांना खूप आनंद झाला. शामलालने मात्र त्याची पोते देवळातून आणून सरपंचांसमोर ठेवले आणि तो सरपंचांना म्हणाला, “तुम्ही पोते उघडून बघा. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. या तांदळाच्या पोत्यातून सगळे खडे निघाले असतील.”

पण जेव्हा सरपंचांनी तांदळाचे पोते उघडले तेव्हा तांदळात सगळे खडे जशीच्या तसे दिसले. ते पाहून सरपंच शामलाला म्हणाले, “शामलाल, जेव्हा आपण श्रम करतो, देव सुद्धा तेव्हाच आपल्याला मदत करतो. हे समजावून सांगून सरपंचांनी पिकाची जास्तीत जास्त रक्कम रामलालला दिली. त्यानंतर मात्र शामलालनेही रामलाल सोबत शेतात श्रम करायला सुरुवात केली. त्यांच्या शेतात आणखी चांगले पीक आले.

निष्कर्ष:

या गोष्टीचा तात्पर्य असा की, आपण कधीही देवावर पूर्णपणे विसंबून राहू नये. कारण आपण जेव्हा आपले बाजूने कठोर परिश्रम करतो, तेव्हाच देव आपल्याला मदत करतो.

मित्रांनो हि  Top 5 Short Stories In Marathi  || मराठी कथा (Short Marathi Katha )जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद
इतर मराठी कथा वाचण्यासाठी येथे क्लीक करा : मराठी कथा

 

Leave a Comment