Elon Musk Information In Marathi || एलोन मस्क मराठी माहिती

Elon Musk Information In Marathi:-स्पेस एक्स आणि टेस्ला कंपनी चे संस्थापक एलोन मस्क 8 जानेवारी 2021 ला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. त्यांची एकूण संपत्ती 185 बिलियन डॉलर (1 खब्ज 85 अरब अमेरिकी डॉलर) पेक्षा जास्त आहे.

आजच्या या लेखात आम्ही तुमच्या साठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांचा जीवन परिचय घेऊ आलो आहोत. या लेखात Elon Musk Information In Marathi देण्यात आली आहे. ही माहिती तुम्हाला नक्कीच प्रेरित करील. तर चला सुरू करुया…

Elon Musk Information In Marathi || एलोन मस्क मराठी माहिती

जन्म आणि बालपण


मस्क यांचा जन्म 28 जून 1971 ला दक्षिण आफ्रिकेतील प्रिंटोरिया, त्रासवाल येथे झाला. सध्याच्या काळात ते एक प्रसिद्ध अमेरिकी उद्योजक आणि व्यापारी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव एरोल मस्क होते. एरोल मस्क दक्षिण आफ्रिकेत इलेक्ट्रोमेकॅनिकल इंजिनिअर, पायलट आणि नाविक होते.

एलोन मस्क 10 वर्षाचे असताना त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. यानंतर ते आपल्या वडिलांसोबत राहू लागले व आपले शिक्षण प्राप्त करू लागले.

एलोन मस्क यांचे शिक्षण


मस्क जेव्हा मात्र 12 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी ग्रॅज्युएशन ची अनेक पुस्तके वाचून टाकली. त्यांचा आवडता विषय कॉम्प्युटर होता. पुस्तकांच्या मदतीने ते कॉम्प्युटर आणि प्रोग्रामिंग शिकले. प्रोग्रामिंग च्या मदतीने त्यांनी एक गेम बनवला. आपल्या या गेम ला त्यांनी ‘ब्लास्ट’ नाव दिले. या गेम ला त्यांनी एका अमेरिकी कंपनीला 500$ मध्ये विकला. या उदाहरणावरुन लक्षात येते की एलोन मस्क लहानपणापासून कुशाग्र होते.

तरुण वयात एलोन मस्क यांची संयुक्त राष्ट्र अमेरिका मध्ये जाण्याची इच्छा झाली. 17 वर्षाचे असताना एलोन मस्क यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला. ज्यामुळे ते आपल्या मुलाला वेळ देऊ शकत नव्हते. 1989 मध्ये ते आपले घर सोडून कॅनडा मध्ये त्यांच्या आईच्या नातेवाईकाकडे राहू लागले. पैश्याच्या कमतरतेमुळे ते कमी पगारावर काम करू लागले.

1995 साली एलोन मस्क यांना अमेरिका जाण्याची संधी प्राप्त झाली. त्यांनी स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटी, अमेरिका मध्ये एडमिशन घेतले. येथे त्यांनी इंटरनेट बद्दल माहिती प्राप्त केली.

पहिली कंपनी Zip 2


एलोन मस्क अमेरिकेत असताना त्यांनी आपल्या एका भावासोबत मिळून 1995 मध्ये आपली पहिली कंपनी zip 2 सुरू केली. या कंपनीतील त्यांचे शेअर 7 टक्के होते. ही कंपनी एका वर्तमानपत्राला शहराबद्दल माहिती सांगण्याचे काम करीत असे. 1999 मध्ये Compaq कंपनी ने या कंपनीला खरेदी केली. त्यावेळी एलोन मस्क यांना 22 मिलियन डॉलर प्राप्त झाले.

X.com ची सुरूवात


1999 साली त्यांनी आपली दुसरी कंपनी x.com सुरू केली. या कंपनीचे काम ऑनलाईन पैश्यांची देवाणघेवाण करणे होते. त्याकाळात कॉनफिनिटी नावाची एक कंपनी देखील हेच काम करीत असे. X. Com आणि कॉनफिनिटी दोघांच्या एकत्रीकरणाने PAYPAL नावाची एक नवीन कंपनी सुरू करण्यात आली.

नंतरच्या काळात एलोन मस्क यांनी paypal ला विकण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्या काळात eBay नावाच्या एका कंपनीने PayPal ला 165 मिलियन अमेरिकन डॉलर मध्ये विकत घेतले.

Space x च्या यशाची कहाणी


लागोपाठ मिळालेल्या यशामुळे एलोन मस्क यांच्याकडे चांगला पैसा जमा झाला होता. त्यांना स्पेस (रॉकेट) विषयी आवड होती.

ते सर्वात आधी 2003 साली 3 ICBM रॉकेट घेण्यासाठी रशिया गेले. परंतु तेथे त्यांना हे रॉकेट 8 मिलियन डॉलर मध्ये मिळत होते.

तेव्हा त्यांनी विचार केला की 8 मिलियन डॉलर येथे वाया घालवण्यापेक्षा मी स्वतः एक रॉकेट तयार करेल. आणि यांनतर त्यांनी spacex ही कंपनी सुरू केली. परंतु या कंपनीचे पहिले रॉकेट अयशस्वी झाले.

यांनतर त्यांनी जुन्या रॉकेटच्या भागांपासून आणखी एक नवे रॉकेट बनवले. परंतु या वेळीही त्यांचे रॉकेट हा अयशस्वी झाले. यांनतर तिसऱ्यांदा जेव्हा त्यांनी रॉकेट बनवले तेव्हा त्यांना यश प्राप्त झाले. एलोन मस्क सर्वात कमी किमतीत अंतरिक्षयान बनवणारे व्यक्ती होते.

आज एलन मस्क आणि spacex द्वारे बनवण्यात आलेले रॉकेट अमेरिकी कंपनी नासा देखील वापरते.

एलोन मस्क आणि टेस्ला


टेसला एक प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक वाहने बनवणारी कंपनी आहे. या कंपनीचे नाव नेहमी एलोन मस्क यांच्या नावासोबत घेतले जाते. टेस्ला कंपनी ची सुरुवात एलोन मस्क यांनी केली नव्हती. 2004 साली त्यांनी पहिल्यांदा तेसला मोटर मध्ये पैसे लावले.

मस्क हे दूरदृष्टी असणारे व्यक्ती आहेत. त्यांना माहीत होते की येणाऱ्या काळात लोक इलेक्ट्रिक वाहनांना अधिक पसंत करतील. कारण इलेक्ट्रिक वाहने कमी खर्चिक आणि प्रदूषण रहित असतात.

मस्क यांच्या कंपनीतील प्रवेशानंतर टेस्ला ची वाहने बाजारात मोठ्या प्रमाणात विकू लागले. आज टेस्ला कंपनी ची वाहने संपूर्ण जगभरात बनवली आणि विकली जातात. आज टेस्ला ने ड्रायव्हर रहित AI कार देखील बनवली आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कौन आहे?
एलोन मस्क

एलोन मस्क (elon musk) नुकतेच 8 जानेवारी 2021 ला जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत जेफ बेजोस यांना मागे टाकत प्रथम क्रमांकावर आले आहेत.

त्यांची एकूण कमाई 184 बिलियन अमेरिकी डॉलर पेक्षा जास्त आहे. मित्रांनो तुम्हाला Elon Musk information in Marathi कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद…


Leave a Comment