shivaji maharaj Information in marathi || शिवाजी महाराजांची संपुर्ण माहिती:- हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात.शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते.त्यांनी तत्त्ववेत्त्यांच्या शिकवणीतून स्फूर्ती घेतली होती. वैयक्तिक महत्वाकांक्षेतून केवळ स्वतःसाठी राज्य स्थापन करण्याची त्यांना इच्छा नव्हती.शिवाजी महाराज हे स्वतः धर्मनिष्ठ हिंदू होते तसेच इतर धर्म विषयी त्यांची भावना साहिस्नूतेची होती.शिवाजी महाराज एक थोर सेनानी होते .चला तर मग आपण वाचूया शिवाजी महाराजांची संपुर्ण माहिती.
प्रौढ प्रताप पुरंदर . . .
क्षत्रीय कुलावंतस् . . .
सिंहासनाधिश्वर . . . .
महाराजाधिराज . . . .
श्री छत्रपती शिवाजी महाराज !!!
shivaji maharaj history in marathi|| शिवाजी महाराजांची संपुर्ण माहिती
Table of Contents
नाव ( Name ) | शिवाजी महाराज भोसले (Shivaji Maharaj) |
जन्म ( Birth ) | 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी (शिव जयंती ) |
राज्याभिषेक ( Rajyabhishek ) | 6 जुन 1674 रायगढ़ |
आईचे नाव ( Mother name ) | जिजाबाई शहाजी भोसले |
वडिलांचे नाव ( Father name ) | शहाजीराजे मालोजी भोसले |
शिवाजी महाराज्यांच्या पत्नीचे नाव ( Wife name ) | सईबाई निंबाळकर |
मुलांची नावे( son's name ) | छत्रपती राजाराम भोसले छत्रपती संभाजी भोसले |
मुलींची नावे (Doughters name) | अंबिकाबाई महाडिक कमलाबाई दिपाबाई राणुबाई पाटकर सखुबाई राजकुंवरबाई |
मृत्यू (Death ) | 3 एप्रिल 1680 रायगढ़ |
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०), मराठी साम्राज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता , सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला.शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य यांच्या बलाढ्य स्थानिक सरदार, किल्लेदार यांच्या अत्याचार आणि अन्यायापासून शिवाजी महाराज यांनी जनतेची सुटका केली. सामन्यांचे स्वराज्य स्थापन करत एक उत्तम शासनाचे एक उदाहरण त्यांनी भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज इतिहास (shivaji maharaj history in marathi ) सोनेरी अक्षरात लिहिला गेला आहे.
शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाच्या होता. त्या काळी सर्वत्र राजेशाह्यांच्या अंमल असे.बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असत ;पण त्या काळातीही असे काही राजे होऊन गेले कि ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. उत्तरेतील मुघल सम्राट अकबर ,दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराव हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहे.त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचे नावही गौरवाने इतिहासात घेतले जाते.
19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर जवळ शिवनेरी गडावर राजमाता जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले.असे मानले जाते कि शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.त्यांच्या जन्माच्या तारखेवर वादविवाद होते परंतु महाराष्ट्र सरकारने 2001 साली इतिहासकारांची समिती बनवून संशोधन करत १९ फेब्रुवारी 1630 हि तारीख शिवाजी महाराजांची जन्मतारीख मानून जाहीर केली. शिवरायांची पहिली सहा वर्षे फार धावपळीचे गेली पण या धावपळीत जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले.त्यांना रामाच्या नि कृष्णाच्या ,भीमाच्या नि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत.संत न्याणेश्वर ,नामदेव,एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत .शूरवीरांच्या गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले आणि त्यांचे दुसरे गुरु दादोजी यांनी त्यांना युद्धकौशल्यात आणि नीती शाश्त्रात पारंगत केले.शिवाजी महाराज यांच्या यशस्वी वाटचालीत आई जिजाऊ यांचे मोलाचे श्रेय असून प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन केले.
Shivaji Maharaj First War – पहिली स्वारी तोरणगडावर विजय
इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.
यामुळे आदिलशाही साम्राज्याला हादरे बसु लागले . महाराजांवर लगाम लावण्याकरता त्यांच्या वडिलांना बंदी बनविण्यात आले . पुढे जवळ जवळ 7 वर्ष महाराजांनी आदिलशहावर थेट आक्रमण केले नाही.
Story Of Afzal khan- अफझल खानाची गोष्ट
आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला.शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्याकरता अफजलखान विजापुर वरून 10000 सैन्य घेऊन निघाला. अफजलखान धाडधिप्पाड शरिरयष्टीचा होता, महाराजांना डिवचण्याकरता त्याने रस्त्यात अनेक मंदिरे उध्वस्त केली, अनेक निरपराध लोकांचा बळी घेतला.तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता.
shivaji maharaj history in marathi
शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधानी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली.अफजलखानाने महाराजांना मारून टाकण्याच्या इराद्याने भेटीचे आमंत्रण पाठवले. प्रतापगडाच्या पायथ्याशी एका आलिशान शामियान्यात ही भेट ठरली. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. बलदंड अफझलाखानने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले.
अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच “होता जिवा म्हणून वाचला शिवा” ही म्हण प्रचलित झाली. आणि त्याच वेळी महाराजांपेक्षा दुप्पट शरीरयष्टीचा अफजलखान क्षणात जमिनीवर कोसळला. शिवाजी महाराज यांनी अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली.
Story of Pawankhind war-पावनखिंड युद्ध
अफझल खानाच्या वधामुळे आदिलशहा चिडला आणि त्याने सिद्धी जोहार ला सैन्या सोबत शिवरायांचा नाश करण्यासाठी पाठवले.सिद्धी जोहार ने पन्हाळगड ला चौफेर वेढा घातला.त्या वेढ्यातून सिद्धीला तुरी देत राजे सैनिकांसहित सुटत विशालगडाकडे रवाना झाले. शिवाजी राजेंचा पाठलाग करणाऱ्या सिद्धीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू सरदार बाजीप्रभु देशपांडे यांनी शिवाजीराजांना तिथून निसटून जाण्याची विनंती केली.
“लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे” म्हणून बाजीप्रभु देशपांडे यांनी राजेंना विशालगडाकडे पुढे कूच करायची विनंती केली.बाजीप्रभु देशपांडे यांनी आपल्या शौर्याची सीमा गाठत सिद्दीच्या सैन्याला रोखून धरले. संख्येने अधिक असलेल्या सैन्याला बाजीप्रभु आणि त्यांच्या सहकार्यांनी आपली प्राणांची बाजी लावत झुलवत ठेवले. शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा संदेश समजल्यावरच बाजी प्रभु देशपांडे यांनी आपले प्राण सोडले. शिवाजी राजांनी असे साथीदार तयार करून स्वराज्य स्थापन केले आणि त्याच्या वाढीस अशा अनेक सरदारांनी आपल्या राजासाठी प्राणांची आहुती दिली. शिवाजीराजांनी या घोडखिंडीचे नाव ‘पावनखिंड’ असे बदलून बाजीप्रभु देशपांडे यांच्या बलिदानाची आठवण जागवत ठेवली.
हे पण वाचा
<—-लोकमान्य टिळक यांची माहिती—->
<—-स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती—–>
Story of Agra – आग्रा ची गोष्ट
1664 साली शिवाजी महाराजांनी मुघलांचे व्यवसायी केंद्र सुरतेवर आक्रमण करून त्याला नेस्तनाबुत केले यामुळे औरंगजेब प्रचंड चिडला.औरंगजेबाने राजा जयसिंग याला शिवरायांचा खात्मा करण्यासाठी पाठवले.राजा जयसिंग दीडलाख सैन्यासोबत महाराजांवर चालून गेला.मात्र या लढाईमध्ये महाराजांना हार पत्करावी लागली.आणि त्यांना आपले 23 किल्ले आणि 4 लाख मुद्रा नुकसान भरपाई म्हणुन द्यावी लागली.
मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर झालेल्या तहानुसार इ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी बोलाविले. त्यानुसार शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पोहचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचे राजपुत्र शंभूराजे देखील होते. तेथे पोहोचल्यानंतर महाराजांना मोगलांच्या दरबारी नजरकैद करण्यात आले.शिवाजी महाराज यांनी सुटकेचे केलेले प्रयत्न फोल ठरत होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. मिठाईच्या पेटा.यात बसुन त्यांनी आपली आणि बाळ संभाजीची सुटका करून घेतली आणि विजापुर मार्गे ते रायगढावर पोहोचले . . . . .
पुढे महाराजांनी अनेक युध्द करत आपला बराच भाग मुघलांच्या ताब्यातुन परत मिळवला 1671 ते 1674 या काळात औरंगजेबाने शिवाजी महाराजांना परास्त करण्याचे बरेच प्रयत्ने केलेत पण तो पुर्णतः असफल ठरला.
Shivaji Maharaj Rajyabhishek- शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
shivaji Maharaj in marathi
6 जुन 1674 ला गागाभट्ठ यांनी हिंदु परंपरेनुसार अनेक ज्येष्ठांच्या आणि श्रेष्ठांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केला . अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.रायरीचे नाव रायगड असे बदलले आणि शिवराई हे चलन सुरु केले.
Shivaji Maharaj Death- शिवाजी महाराजांचा मृत्यू
शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रील 1680 मधे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची तब्येत खालावत गेली आणि रायगढावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराणी पुतळाबाई या महाराजांच्या चितेवर सती गेल्या.एक उत्तम शासक, एक उत्तम राजा, मराठा साम्राज्याचा संस्थापक , छत्रपती शिवाजी महाराज कायम प्रत्येक भारतियाच्या मनात आहेत.
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला !
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एक “मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.”…………………………………………!!
Frequently asked questions on Shivaji Maharaj -शिवाजी महाराजांवर नेहमी विचारलेले जाणारे प्रश्न
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ……….रोजी झाला…?
उत्तर: १९ फेब्रुवारी, १६३०
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता?
उत्तर : शिवनेरी (19 फेब्रुवारी 1630)
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक …….. किल्ल्यावर झाला.
उत्तर: रायगड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी ……. हा इंग्रज वकील हजर होता.
उत्तर: हेन्री ऑक्झिडन
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर : जुन्नर
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते?
उत्तर : आदिलशहा
कोंढाणा किल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?
उत्तर : सिंहगड
पावन खिंड चे पूर्वीचे किंवा जुने नाव काय होते ?
उत्तर: पन्हाळ खिंड
छत्रपती शिवाजी महाराजांनी……..हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले.
उत्तर: तोरणा
शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले गेले?
उत्तर : प्रचंडगड
छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर …… हा बुलंद किल्ला बांधला.
उत्तर: प्रतापगड
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स…….मध्ये दाभोळ बंदरावर ताबा मिळविला.
उत्तर: १६६९
चाकण च्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता ?
उत्तर: फिरंगोजी नरसाळा
पुरंदर चा किल्लेदार कोण होता ?
उत्तर: मुरारबाजी
कोंढाणा गड कोणी सर केला होता?
उत्तर : तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ………. रोजी झाला.
उत्तर: ६ जून, १६७४
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
उत्तर : राजगड
शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती?
उत्तर : रायरेश्वराचे मंदिर
छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती?
उत्तर : शिवराई
‘राज्याभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ………. यांनी लिहिला.
उत्तर: गागाभट्ट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित ………होते.
उत्तर: गागाभट्ट
मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते?
उत्तर : कांहोजी आंग्रे
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त ……….. नाणे पाडले.
उत्तर: होन
शिवकालीन शिवराई नाणे ……..धातूचे होते.
उत्तर: तांबा
शाहिस्तेखानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी……. रोजी हल्ला केला.
उत्तर: ५ एप्रिल, १६६३
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स………मध्ये सुरतवर स्वारी केली.
उत्तर: १६६४
अफजलखानाचा वध कोठे झाला होता?
उत्तर : प्रतापगड
अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते?
उत्तर : पंताजी गोपीनाथ
जय सिंह पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणता तह झाला होता?
उत्तर : पुरंदरचा तह
छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घालून कोणाची बोटे तोडली होती?
उत्तर : शाहिस्तेखान
युरोपियनांनी…….किल्ल्याला ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे संबोधले.
उत्तर: रायगड
………रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले.
उत्तर: १७ ऑगस्ट १६६६
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार केला जात असे?
उत्तर : अष्टप्रधान मंडळ
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते?
उत्तर : हंबीरराव मोहिते
स्वराज्या मध्ये कोण मुख्य प्रधान होते?
उत्तर : मोरो त्रिंबक पिंगळे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्य पदी कोण होते?
उत्तर : रामचंद्र नीलकंठ मुजुमदार
स्वराज्यात सचिवपदी कोण होते?
उत्तर : अण्णाजी दत्तो
स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पहात होते?
उत्तर : दत्ताजी त्रिंबक वाकणीस
स्वराज्यात सुमंत कोण होते?
उत्तर : रामचंद्र त्रिंबक डबिर
स्वराज्यात न्यायाधीशपदी कोण होते?
उत्तर : निराजी रावजी
स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम कोण पाहत होते?
उत्तर : मोरेश्वर पंडितराव
छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता?
उत्तर : बहिर्जी नाईक
स्वराज्य मध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणता अधिकारी असे?
उत्तर : कारखानीस
स्वराज्य मध्ये जवळपास किती किल्ले होते?
उत्तर : 370
छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर : श्री शैलम (आंध्र प्रदेश)
चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या…….होय.
उत्तर: ३६१
तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते?
उत्तर : व्यंकोजी महाराज
कर्नाटक मोहिमेवरून…….. मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले.
उत्तर: एप्रिल,१६७८
छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन ……. वजनाचे होते.
उत्तर: ३२ मण
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसले?
उत्तर : छत्रपती संभाजी महाराज
शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता?
उत्तर : मध्ययुगाचा काळ
छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर……. घाट बांधला.
उत्तर: श्री गणेश
शिवाजी महाराज यांचा मृत्यू कधी झाला
उत्तर: 3 एप्रिल 1680 रायगढ़
वाचा शिवजयंती शुभेच्छा संदेश
आम्हाला आशा आहे की shivaji maharaj history in marathi | शिवाजी महाराजांची संपुर्ण माहिती तुम्हाला आवडली असेलच …. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका…