Sant Dnyaneshwar Information In Marathi:-संत ज्ञानेश्वर महाराज महाराष्ट्रात जन्मलेले तेराव्या शतकातील एक महान संत होते. त्यांनी ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची रचना केली. त्यांची गणना भारताच्या महान संत व कवी मध्ये केली जाते. आजच्या लेखात आपण संत ज्ञानेश्वर यांची मराठी माहिती Sant Dnyaneshwar Maharaj Information In Marathi प्राप्त करणार आहोत. तर चला सुरू करूया…
संत ज्ञानेश्वर यांचे बालपण व प्रारंभिक जीवन
Table of Contents
ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275 साली भाद्रपद महिन्याच्या कृष्ण अष्टमीला महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण जवळ असलेल्या आपेगाव या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई होते. विठ्ठल पंत हे भगवान विठ्ठलाचे अनन्य उपासक होते.
विठ्ठल पंत व रुक्मिणीबाई यांना विवाहाच्या अनेक वर्षांनंतरही अपत्य झाले नाही. शेवटी कंटाळून विठ्ठलपंतांनी आपल्या पत्नीस सांगितले की, काशी जाऊन संन्यास घ्यावासा वाटतो. तेव्हा रखुमाई ने संतती वाचून संन्यास घेऊ नये ही गोष्ट पतीनां सांगा असे आपल्या पित्यास सांगितले. परंतु विठ्ठल पंतांचे मन वळले नाही. पत्नी निद्रेत असताना त्यांनी गृहत्याग केला. विठ्ठल पंत काशीला गेले. तेथे एका प्रसिद्ध संन्यासी गुरूंकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली.
परंतु जेव्हा त्यांच्या गुरूंना कळले की विठ्ठल पंत गृहस्थाश्रम सोडून संन्यासात आले आहेत तेव्हा त्यांनी विठ्ठल पंत यांना पुन्हा गृहस्थाश्रमात पाठवले. पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. या चारही मुलांची नावे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई असे होते. मुक्ताबाई ह्या तीनही भावंडांच्या लहान बहिण होत्या.
घरात मुलांना जन्म दिल्यावर विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांच्या समस्या आणखीनच वाढल्या. कट्टरपंथी पंडितांनी त्यांना संन्यासातून गृहस्थात आल्यामुळे धर्मभ्रष्ट व कलंकीत म्हणून समाजातून बहिष्कृत केले. समाजाकडून होत असलेल्या या अत्याचारामुळे संत ज्ञानेश्वरांसोबत त्यांचे आई वडील आणि भावंडांना सुरुवाती जीवनात खूप कष्ट सोसावे लागले.
निवृत्तीनाथ यांच्या उपनयन संस्कारासाठी जेव्हा कोणीही ब्राह्मण पुढे आले नाही, तेव्हा ते संपूर्ण कुटुंबाला घेऊन त्र्यंबकेश्वर गेले. त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध योगी गाहणीनाथ यांच्याकडून निवृत्तीनाथांनी दीक्षा घेतली. पंडितांनी चारही मुलांचे उपनयन संस्कार विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांच्या देहदंडाच्या शिक्षेनंतर स्वीकारले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी त्रिवेणी मध्ये बुडून प्राण त्यागीले.
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर संत ज्ञानेश्वर (gyaneshwar) व त्यांचे भाऊ-बहीण अनाथ झाले. भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करू लागले. भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींची कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी होत असत. त्यांनी विचार केला की “आईवडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्याय पूर्ण आहे.” शेवटी 1288 साली पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुनः समाजात सम्मिलित केले.
ज्ञानेश्वर महाराजांची कथा
विसोबा चे गर्वहरण
त्या काळी विसोबा नावाचा एक कर्मठ ब्राह्मण या चारही भावंडांचा द्वेष करीत असे. यांच्यावर बहिष्कार टाकावा अशी त्यांची इच्छा होती. गावातील लोकांना तो असे सांगून धमकावित असे की, ‘जो कोणी या भाऊ-बहिणीची मदत करील त्याला मी समाजातुन बहिष्कृत करेल.’ एकदा मुक्ताबाई ची ईच्छा गरम पराठे खाण्याची झाली. म्हणून त्या तवा घेण्यासाठी कुंभारा जवळ गेल्या. परंतु विसोबाने कुंभाराला रोखले.
ज्ञानेश्वरांना (gyaneshwar) जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांनी आपल्या प्राणायामाच्या बळावर आपली पाठ पोळी शेकण्या एवढी गरम केली. आणि या तापलेल्या पाठीवर मुक्ताबाईंनी तिचे पराठे शेकले. विसोबा हे पाहून अवाक झाला. पश्चाताप करण्यासाठी तो ज्ञानेश्वरांच्या चरणांवर पडला.
संत ज्ञानेश्वरांचे प्रसिद्ध ग्रंथ
संत ज्ञानेश्वर (dnyaneshwar in marathi) 15 वर्षाच्या कमी वयात श्रीकृष्णाचे खूप मोठे उपासक बनले होते. त्यांनी आपल्या भाऊ-बहीण कडून दीक्षा प्राप्त करून. एका वर्षातच सनातन धर्मातील सर्वात मोठ्या महाकाव्यापैकी एक गीतेवर टीका लिहिली. या ग्रंथाला त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे नाव दिले. ज्ञानेश्वरी हा त्यांचा सर्वाधिक प्रसिद्ध ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाला मराठी भाषेत लिहिलेल्या अप्रतिम ग्रंथांमधून एक मानले जाते.
याशिवाय ज्ञानेश्वरांनी 800 ओव्यांचा समावेश असलेला अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला. हरिपाठ, योगवशिष्ठ टीका व चांगदेव-पासष्टी हे त्यांचे प्रमुख ग्रंथ आहेत.
संत ज्ञानेश्वरांचा मृत्यू (ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी)
मात्र 21 वर्षाच्या कमी वयात संत ज्ञानेश्वरांनी संसारीक मोहमाया त्यागून इंद्रायणीच्या तीरावर सिद्धेश्वराचे पुरातन स्थान असलेल्या मंदिरात समाधी घेण्याचा निर्णय केला. ज्ञानदेवांच्या समाधीच्या अवघ्या एका वर्षातच त्यांच्या भावंडांनी ही आपला देह त्यागला.
‘जो जे वांछील, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. ज्ञानेश्वरांनी च वारकरी समुदायाचा पाया रोवीला.
तर मित्रांनो ही होती ज्ञानेश्वर यांची मराठी माहिती आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली असेल. Sant Dnyaneshwar Information In Marathi माहिती इतरांसोबतही नक्की शेअर. धन्यवाद…