Chandrashekhar Azad Information In Marathi || चंद्रशेखर आझाद मराठी माहिती

Chandrashekhar Azad Information In Marathi:- चंद्रशेखर आझाद हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर मिशांना ताव देणारा एक तरुण व्यक्ती उभा राहतो. चंद्रशेखर आझाद यांच्या उग्र देशभक्ती आणि साहसाने त्याकाळातील अनेक लोकांना स्वतंत्र युद्धात भाग घेण्यासाठी प्रेरित केले होते.

आजच्या या लेखात आपण चंद्रशेखर आझाद यांची मराठी माहिती प्राप्त करणार आहोत. देशासाठी हसत हसत आपले प्राण त्यागणाऱ्या या महान क्रांतिकारकाला कोणतेही सरकार कैद करू शकले नाही. ते नेहमी आजाद होते व आजादच राहिले.

Chandrashekhar Azad Information In Marathi || चंद्रशेखर आझाद यांची माहिती

बालपण व प्रारंभिक जीवन

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 ला मध्यप्रदेश च्या भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित सीताराम तिवारी आणि आईचे नाव जगरानी देवी होती. चंद्रशेखर आझाद यांचे खरे नाव चंद्रशेखर तिवारी होते परंतु त्यांनी स्वतःला स्वतंत्र समजीत आपले आडनाव आझाद ठेवले. चंद्रशेखर आझाद यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील बंदरका गावचे होते. परंतु गावात दुष्काळ पडल्याने त्यांना ते गाव सोडून मध्यप्रदेशात यावे लागले.

भावरा गाव भील बहुसंख्य गाव होते. म्हणून बालक चंद्रशेखर इतर भिल मुलांसोबत धनुर्विद्या आणि निशाणेबाजी चा सराव करीत असत. लहापणापासुन ते विद्रोही स्वभावाचे होते. जालियनवाला बाग हत्याकांड मुळे चंद्रशेखर आझाद स्थब्द झाले व त्यांनी याचे उत्तर देण्याचे ठरवले.

क्रांतिकारी जीवन

1919 साली झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणामुळे चंद्रशेखर आझाद आहत झाले. सन 1921 मध्ये जेव्हा महात्मा गांधींनी असहयोग आंदोलन सुरू केले तेव्हा चंद्रशेखर आझाद या क्रांतिकारी चळवळीत सक्रिय पद्धतीने सहभागी झाले. 15 वर्षाच्या वयात त्यांना पहिली चाबकाची शिक्षा झाली.

असहायोग आंदोलन स्थगित झाल्यावर चंद्रशेखर आझाद अधिक आक्रमक आणि क्रांतिकारी विचारांनी भरले. त्यांनी कोणत्याही किमतीवर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे सुरू केले. ते बनारस आले व येथे त्यांची भेट देशाचे महान क्रांतिकारी मन्मथनाथ गुप्त आणि प्रणवेश चटर्जी यांच्याशी झाली. या नेत्याद्वारे प्रभावीत होऊन ते हिंदुस्थान प्रजासत्ताक संघ चे सदस्य बनले. या दलाचा उद्देश सरकारी कार्यालयांना नुकसान पोहचवून आपले क्रांतिकारी लक्ष प्राप्त करणे होते.

काकोरी कांड

काकोरी कांड या घटनेविषयी सर्वच भारतीय परिचित आहेत. या देशसेवेच्या कार्यामुळे महान क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल, अश्फाकउल्ला खान, राजेंद्रनाथ लाहिडी आणि ठाकूर रोशन सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हिंदुस्तान प्रजासत्ताक संघाच्या दहा सदस्यांनी या काकोरी कांड च्या कार्याला केले होते. या कार्यात इंग्रजांच्या खजिना लुटून इंग्रजांसमोर आव्हान उभे केले. या घटनेनंतर संघाचे अधिकतर क्रांतिकारी पकडण्यात आले. परंतु अनेक प्रयत्नांनंतरही चंद्रशेखर आझाद यांना पकडण्यात यश आले नाही.

चंद्रशेखर आझाद यांच्यासमोर पुन्हा एकदा नवीन संघ तयार करण्याचे संकट उभे होते. लपत लपत ते दिल्ली पोहोचले. दिल्लीमधील फिरोजशहा कोटला मैदानात क्रांतिकार्याची गुप्त सभा आयोजित करण्यात आली. या सभेत महान क्रांतिकारी भगतसिंग देखील सामील होते. सभेत एका नवीन दलाला स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या दलाचे नाव हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ठेवण्यात आले. चंद्रशेखर आजाद या दलाचे कमांडर होते.

सॉंडर्स ची हत्या आणि विधानसभेत बॉम्ब फेकण्याची योजना

देशात सायमन कमिशनच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात लाला लजपत राय यांच्यावर जबरदस्त लाठीचार्ज झाला, ज्यात त्यांची मृत्यू झाली. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा दोषी ब्रिटिश अधिकारी स्कॉट याला समजून भगतसिंग यांनी त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. या कार्यात चंद्रशेखर आझाद यांनीही त्यांना समर्थन केले. परंतु चुकीने त्यांनी पोलिस अधिकारी जेम्स स्कॉट ऐवजी त्याचा सहाय्यक पोलीस सॉंडर्स याची गोळी मारून हत्या केली.

या घटनेनंतर फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी त्यांनी लाहोर सोडले. यानंतर इंग्रजांचे भारतीयांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत होते. इंग्रजांना भारतीयांची शक्ती दाखवून देशातील लोकांना जागृत करण्यासाठी भगतसिंग यांनी विधानसभेच्या सत्रादरम्यान बॉम्ब फेकला. या घटनेत कोणीही ठार होऊ नये याचीही त्यांनी काळजी घेतली. या घटनांनंतर इंग्रजांनी क्रांतिकारकांना पकडण्यासाठी संपूर्ण शक्ती लावली. भगतसिंग व इतर क्रांतिकारी इंग्रजांच्या तावडीत सापडले होते. परंतु पुन्हा एकदा चंद्रशेखर आझाद तेथून निसटले.

चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू

इंग्रजांच्या तावडीतून पळालेले चंद्रशेखर आझाद यांनी भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांची फाशी रद्द करण्यात यावी म्हणून अनेक प्रयत्न केले. असाच एक प्रयत्न करण्यासाठी ते अलाहाबाद येथे पोहोचले. अलाबादमधील एका इंग्रज पोलिसाची दृष्टी त्यांच्यावर पडली. यानंतर हजारो पोलिसांनी त्यांना आल्फ्रेड पार्क मध्ये चारही बाजूंनी वेढले आणि त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. परंतु चंद्रशेखर आजाद यांनी आत्मसमर्पण न करता इंग्रजांना तोंड देत शहीद होणे स्वीकारले.

स्वतःचा बचाव करीत असतांना ते पूर्णपणे घायाळ झाले. याशिवाय त्यांनी अनेक इंग्रज पोलिसांना यमसदनी पाठवले. इंग्रजांशी लढत असताना जेव्हा त्यांच्या बंदुकीतील गोळ्या संपल्या तेव्हा शेवटची उरलेली गोळी स्वतःला मारून त्यांनी मृत्यूला कवटाळले. चंद्रशेखर आझाद यांची ही पिस्तुल आजही अलाहाबाद म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहे.

तर मित्रांनो ही होती Chandrashekhar Azad Marathi Information  आशा करतो की ही चंद्रशेखर आझाद यांची माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरली असेल. या महितील्या आपल्या मित्रांसोबतही नक्की शेयर करा. धन्यवाद.


Leave a Comment