Gurucharitra Parayan | गुरुचरित्र पारायण कसे करावे? पारायणाचे नियम, मांडणी 2025

Gurucharitra Parayan | गुरुचरित्र पारायण:-14 डिसेंबर 2024 रोजी दत्त जयंती आहे. दत्त जयंती निमित्त, आपल्याला 8 डिसेंबर 2024 ते 14 डिसेंबर 2024 पर्यंत गुरुचरित्र पारायण म्हणजे महाराजांची उच्च कोटीची सेवा करायचा आहे. हे पारायण घरच्या घरी कसं करायचे, पूजा मांडणी, नियम व अटी काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये मी शेअर करणार आहे.

दत्त संप्रदायातील करोडो लोकांचा विश्वास आणि पवित्र वेद म्हणजे गुरुचरित्र. या ग्रंथाचे पारायण सात दिवसात केले जाते. जेव्हा एखादे गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते, सगळेच रस्ते बंद झालेत असे वाटायला लागते, त्यावेळेस या ग्रंथाच्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथांमध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे. त्यामुळेच तुमच्या कुठल्याही प्रकारच्या आजार याच्या वाचनाने नष्ट होतात. गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होतो.

स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचन केल्याने घरातील नको तेव्हा दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळावेगळा आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. प्रखर पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लवकर प्रभावी अनुभव येतात.

गुरुचरित्र पारायण जर तुम्ही घरी केले तर त्याचे दहा पटीने फळ मिळते, पण जर ते तुम्ही केंद्रामध्ये केले तर त्याचे शंभर पटीने तुम्हाला फळ मिळत असतात.

गुरुचरित्र पारायणाचे नियम

गुरुचरित्र पारायण Gurucharitra Parayan करण्यापूर्वी आपण त्याचे नियम जाणून घेऊयात. तर सगळ्यात आधी गुरुचरित्राच्या नियमांमध्ये हे पारायण कोणी करावे? स्त्रीनी करावी की पुरुषांनी? तर दिंडोरी प्रणितचे गुरुचरित्र आहे यामध्ये काही ओव्याच्या स्त्रीने वाचू नये त्या ओव्या काढून टाकलेल्या आहेत. त्यामुळे गुरुचरित्र पारायण स्त्री-पुरुष कोणीही करू शकतो.

गुरुचरित्र पारायण हे सात किंवा तीन दिवसांमध्ये पूर्ण करावे. हे पारायण करत असताना तुमचा मासिक धर्म असेल तर या पर्यायाला बसू नये. आणि जर तुम्हाला मध्ये सुतक वगैरे पडला तर अशा वेळेस ते पारायण तुम्ही शेजाऱ्यांकडून किंवा ब्राह्मणाकडून पूर्ण करून घ्यायचे असते. गुरुचरित्र पारायण हे कधीच अर्धवट सोडायचे नसते.

गुरुचरित्र पारायण Gurucharitra Parayan याच्या काळामध्ये तुम्हाला मांसाहार वर्ज आहे. गुरुचरित्र पारायण करणारी व्यक्तीला तर आहेच पण कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी मांसाहार टाळायचा आहे. त्याचबरोबर पारायण करणाऱ्या व्यक्तीला द्विदल धान्य खायचे नाहीये, म्हणजेच डाळी खायचे नाहीयेत आणि एक धान्याचा उपवास करायचा आहे. म्हणजे जर तुम्ही गव्हाची पोळी खाणार असाल तर गव्हाचीच पोळी आणि भाजी खायची आहे किंवा ज्वारी किंवा बाजरी असे एकाच प्रकारचे धान्य सात दिवस खायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला कांदा आणि लसूण सुद्धा टाळायचा आहे.

गुरुचरित्र पारायणाच्या काळात तुम्हाला उपवास करायचा नाहीये, पण एक धान्याचा हा नियम तुम्हाला पाळायचे आहे. त्याचबरोबर भाज्या अशा निवडा की ज्यामुळे तुम्हाला पित्त होणार नाही, म्हणजेच ऍसिडिटी होणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला ढेकर सुद्धा आला नाही पाहिजे अशी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजेच तुम्हाला मेथी, शेपू या भाज्यांमुळे ऍसिडिटी वाढते त्या भाज्या टाळायच्या आहेत. तुम्हाला तांदूळ खायचे नाहीत म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे गहू, ज्वारी, बाजरी यापैकी एकच धान्य तुम्ही निवडायचे.

विविध धान्य तुम्हाला खायचे नाही, ज्यामध्ये तुम्हाला डाळी खायच्या नाहीत. मग तुम्हाला पोळी भाजीमध्ये तुम्ही भाज्या कोणत्याही खाऊ शकता, त्या भाज्यांमध्ये तुम्ही कांदा-लसूण वापरायचा नाही. त्याचबरोबर गुरुचरित्राच्या काळामध्ये तुम्हाला परअन्न वर्ज आहे. तुम्ही तुमच्या आई किंवा बहिणीच्या हातचा देऊ शकता, पण तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचे जेवण टाळायचा आहे. गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये दुसऱ्यांच्या घरी तुम्ही पाणी सुद्धा घ्यायचे नाही, एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे.

त्यानंतर गुरुचरित्र पारायण Gurucharitra Parayan काळातला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे कडकडीत ब्रह्मचर्य पालन तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला पलंगावर किंवा सोफ्यावर बसता येणार नाही, खाली जमिनीवरच बसावं लागेल. चटई किंवा सतरंजी हे तुम्ही वापरू शकता. आणि झोपण्यासाठी सुद्धा तुम्हाला चटईचा किंवा सतरंजीचा वापर करायचा आहे. जमिनीवर तीच तुम्हाला सात दिवस झोपायचा आहे.

गुरुचरित्र पारायण(Gurucharitra Parayan) याच्या आदल्या दिवशी तुम्हाला चार कुत्रे आणि एका गाईला तुपातल्या पोळ्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. कारण चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि गाय म्हणजे कामधेनु गाय, जी दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे हा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे.

गुरुचरित्राच्या काळामध्ये तुम्हाला क्रोधावर नियंत्रण ठेवायचे आहे. आणि त्यासाठी तुम्हाला अन्न जे आहे ते सात्विक ग्रहण करायचा आहे. कांदा-लसूण असलेलं, मसाले असलेलं अन्न जे आपण ग्रहण करतो, त्या अन्नामुळे आपला क्रोध वाढू शकतो. त्यासाठीच गुरुचरित्र पारायणाच्या दरम्यान तुम्हाला असं अन्न खायचं असतं ज्यामध्ये कांदा-लसूण, मांसाहार वर्ज्य आहे. आणि या काळामध्ये तुम्ही हे अन्न न खाल्ल्यामुळे तुमच्या मनावरती सुद्धा तुमचाच आभा राहतो. कारण गुरुचरित्र पारायण काळामध्ये तुमच्या घरामध्ये भांडण-क्लेश होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमचा आहार जो आहे तो सात्विक ठेवायचा आहे. जेणेकरून तुमच्या घरामध्ये भांडण-क्लेश होणार नाहीत.

गुरूचरित्र पारायण मांडणी कशी करावी

तुम्ही केंद्रात जाऊन जर गुरुचरित्र पारायण करणार असेल तर तुम्हाला मांडणी करण्याची गरज नाही. केंद्रात जाऊन तुम्हाला फक्त पारायण करायचा आहे.

गुरुचरित्र पारायण (Gurucharitra Parayan) तुम्ही तुमच्या घरी करणार असाल तर या पाराण्याची मांडणी तुम्हाला करावी लागेल. तर तुमच्या देवघराच्या बाजूला तुम्हाला ही मांडणी करायची असते. तर देवघराच्या तिथली जागा स्वच्छ पुसून घ्या. गोमूत्र शिंपडून घ्या. तिथे एक चौरंग ठेवा. त्यावरती कपडा अंथरा. त्यावर तिथे तुम्हाला गव्हाच्या राशीवरती कलश स्थापना करायची आहे. तांदळांनी स्वस्तिक काढून घ्या. आणि त्यावरती महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे.

मूर्ती असेल तर ज्या दिवशी तुम्ही मांडणी करणार आहात त्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. आणि शेवटच्या दिवशी अभिषेक करायचा आहे. रोज तुम्हाला अभिषेक करायची गरज नाही. रोज तुम्ही फक्त फुल बदलायचे आहेत. त्यानंतर तुम्ही जर फोटो ठेवला असेल तर फोटोला तुम्हाला फुलच वाहायचा आहे. पहिल्या दिवशी तुम्ही स्वच्छ फोटो फ्रेम पुसून घ्या. त्याला अष्टगंध वगैरे वाहून घ्या. आणि फुल वगैरे वाहवून घ्या. हार आणला असेल तर हार लावा.

त्यानंतर एक दिवस जो आहे तो अखंड चालला पाहिजे. रात्रंदिवस तुम्हाला हा दिवस आहे चालूच ठेवायचा आहे. त्यानंतर तांदळावरती एक सुपारीची स्थापना तुम्हाला करायची आहे. महाराजांची आवडीची घंटा तुम्हाला ठेवायचे. महाराजांसाठी पाणी भरून ठेवायचे. खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. त्यावरती तुळशीपत्र ठेवायचे. एक फळ तुम्हाला रोज ठेवायचा आहे. खडीसाखर रोजच्या रोज बदलायची. पाणी पण रोज बदलायचं. जपमाळ तिथे ठेवायचे. अशा प्रकारे तुम्हाला ही मांडणी करायची आहे. आणि हा दिवा अखंड चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे.

गुरूचरित्र पारायणाची वेळ | Gurucharitra Parayan Time

आता गुरुचरित्राचा परायणाला तुम्ही बसल्यानंतर म्हणजे गुरुचरित्राचा पारायण सकाळी ४ ते संध्याकाळी ४ च्या दरम्यानच करायचा आहे. रात्री गुरुचरित्र पारायण चालत नाही. पाळणाच्या काळामध्ये रोज सकाळी देवपूजा करून मग पाराण्याला बसावे. जर तुम्ही केंद्रात जाऊन हे पारायण करणार असाल तर घरातली देवपूजा करूनच मग त्या पाण्याला तुम्ही जा. पारायण सुरू करण्याआधी तुपाचा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे. आणि धूप लावायचा आहे. तुपाचा दिवा आणि धूप जे आहे ते पाराण्याच्या काळामध्ये संपूर्ण चालत राहिले पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे.

गुरुचरित्र पोथीमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्या माहितीप्रमाणे तुम्हाला रोज गुरुचरित्राचे तेवढेच अध्याय वाचायचेत. त्याप्रमाणेच तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचा आहे. सकाळ संध्याकाळ तुम्हाला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. जे तुम्ही घरात बनवलेले आहे त्याचा तुम्हाला सकाळ संध्याकाळ निमित्त दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला सकाळ संध्याकाळ महाराजांची आरती सुद्धा करायची आहे.

गुरूचरित्र पारायणा दरम्यान घ्यायची विशेष काळजी

पारायण करणाऱ्या व्यक्तींनी पारायणाच्या काळाच्या दरम्यान म्हणजे स्त्री असेल तर स्त्रियांनी साडी नेसावी. हातात बांगड्या असावेत. कपाळी कुंकू असावे. आणि पुरुष असतील तर पुरुषांनी सोळं नेसूनच हे पारायण करावे. मुळात गुरुचरित्र करणारी ही व्यक्ती भाग्यवान असते. आणि कोणाच्याही नशिबात गुरुचरित्राचा पारायण नसतं. तुम्ही कितीही ठरवलं मी गुरुचरित्राचा पारायण करणार पण स्वामींच्या मनात आल्याशिवाय तुमच्याकडून हे पारायण होणारच नाही.

त्यामुळे तुम्ही गुरुचरित्राचा पारायण करत आहात याचा अर्थ तुम्ही खूप भाग्यवान व्यक्ती आहात. गुरुचरित्राचा पारायण सुरू करायच्या आधी संकल्प करायचा असतो. कोणतीही सेवा संकल्प वशिवाय पूर्ण होत नाही.

संकल्प करून, त्यानंतर तुम्ही केंद्रात करणार असाल तर, केंद्रात तुम्हाला नारळ स्वामी महाराजांचे वस्त्र ठेवायचा आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे. आणि घरी जर तुम्ही पारायण करणार असाल तर, जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये नारळ घेऊन जा, आणि घरी येऊन या सेवेला सुरुवात करा.

पारायण काळामध्ये नित्यसेवा सुद्धा तुम्हाला सुरूच ठेवायचे आहे. घरी जर तुम्ही हे पारायण करत असाल तर, आपण ज्यांनी ते सेवेमध्ये महाराजांचे रोज तीन अध्याय वाचत असतो ती सेवा तुम्हाला सुरूच ठेवायचे आहे. त्याचबरोबर अकरा माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा तुम्हाला रोज करायचा आहे. तारक मंत्र सुद्धा तुम्हाला रोज म्हणायचा आहे. तर हे काही गुरुचरित्राच्या बाबतीतले नियम आहेत. या नियमांचे पालन करूनच तुम्हाला गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करायची आहे.

तर 8 डिसेंबर २०२4 रोजी आपल्याला गुरुचरित्र पारायण याला सुरुवात करायची आहे. आदल्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर रोजी आपल्याला नारळ आणि खडीसाखर घेऊन जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रात जायचं आहे. आणि महाराजांना ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्यावी यासाठी विनंती करायची आहे. त्याच बरोबर गाईला आणि चार कुत्र्यांना आपल्याला तुपातल्या पोळ्या खाऊ घालायचे आहेत.

8 डिसेंबर 2024 ते 14 डिसेंबर 2024 या सात दिवसाच्या सप्ताहाच्या काळामध्ये गुरुचरित्र पारायण Gurucharitra Parayan आपल्याला पूर्ण करायचा आहे.


हे पण वाचा
Mutual fund information in marathi
Share Market Information In Marathi
Cryptocurrency Information in Marathi
How To Make Website Information In Marathi
How to Become Amazon Seller Information In Marathi


Leave a Comment