How To Make a Website In Marathi || वेबसाइट कशी तयार करावी Step by Step

How To Make a Website In Marathi:-मित्रानो तुम्हाला जर आपली स्वतःची वेबसाईट किव्हा ब्लॉग सुरु करायचा असेल किव्हा तुमचा व्यवसाय वेबसाईटद्वारे ऑनलाईन आणायचा असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने वेबसाइट किव्हा ब्लॉग कशा बनवायचा याबद्दल माहिती देणार आहोत. आम्ही या पोस्ट मध्ये काही स्टेप्स देणार आहोत ज्याद्वारे तुम्ही स्वतः कोणाच्याही मदतीशिवाय तुमची वेबसाईट बनवू शकाल .या साठी तुम्हाला Website developing वेब साईट डेवेलोपिंग चा क्लास करावा लागणार नाही ना कोणती प्रोग्रामिंग language शिकावी लागणार नाही. फक्त तुम्हाला या स्टेप्स व्यवस्थित follow कराव्या लागेल. चला तर मग

Learn How To Make a Website In Marathi || वेबसाइट कशी तयार करावी

Step 1:- ब्लॉग म्हणजे काय

Step 2:- सर्वप्रथम आपल्या ब्लॉगसाठी एक niche निवडा

Step 3:- डोमेन नाव आणि वेब होस्टिंग खरेदी करा.

Step 4:-CMS प्लॅटफॉर्म निवडा आणि इन्स्टॉल करा.

Step 5:-वर्डप्रेस वर आपला ब्लॉग तयार करा.

Step 6:-ब्लॉगला design करा आणि स्वतःच्या आवडीप्रमाणे customised करा.

Step 7:-ब्लॉग वर सामग्री प्रकाशित करा म्हणजेच कन्टेन्ट टाका.

Step 8:-तुमच्या ब्लॉगला लोकांपर्यंत पोहचवा म्हणजेच तुमच्या ब्लॉगची ट्रॅफिक वाढवा

Step 9:- आपल्या ब्लॉगद्वारे पैसे कमवा.

मित्रानो आता प्रत्येक स्टेप बद्दल माहिती पाहणार आहोत .

Step 1:- ब्लॉग म्हणजे काय || What is blog in Marathi

मित्रांनो blog म्हणजे एक प्रकारची वेबसाईट जिथे आपण आपले विचार व्यक्त करू शकतो, लोकांपर्यंत माहिती, ज्ञान पोहचाऊ शकतो. लोकांसोबत विचारविनिमय करू शकतो. Marathibhau.com हा सुद्धा एक ब्लॉग आहे ज्याद्वारे आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या विषयासंबंधी माहिती देतो आणि या द्वारे आम्ही पैसे सुद्धा कमवतो. काही लोकांसाठी वेबसाइट त्यांचे व्यवसाय ऑनलाइन आणण्याचे साधन आहे, तर काहींसाठी वेबसाइट ऑनलाइन पैसे कमवण्याचा मार्ग आहे. वेबसाईट द्वारे पैसे कसे कमवायचे ते सुद्धा आपण बघणारा आहोत.वेबसाईट बनवायला जवळपास 3000 ते 4000 रुपये खर्च येईल.परंतु या वेबसाईट पासून तुम्ही महिन्याला 10000 ते 1 लाखापर्यंत कमाई करू शकता. तुमचं वेबसाइट वरील कन्टेन्ट । सामग्री चांगली असेल आणि भरपूर प्रमाणात users तुमच्या वेबसाइट ला जर भेट देत असेल तर तुम्ही याचा पेक्षाही जास्त पैसे कमावू शकता.तुमची वेबसाईट किंवा ब्लॉग यशस्वीच होईल याची काही खात्री नाही आहे परंतु तुम्ही वेबसाईट बनवायला प्रयत्नच नाही केला तर नक्कीचं मात्र तुम्ही अयशश्वी व्हाल.


Step 2:-सर्वप्रथम आपल्या ब्लॉगसाठी एक niche निवडा || Choosing Niches

मित्रानो ब्लॉग बनवण्याअगोदर आपल्याला एक niche म्हणजेच topic विषय निवडावा लागेल.तुम्हाला अशा विषय निवडावा लागेल ज्याच्याविषयी तुम्हाला चांगली माहिती आहे व त्या मध्ये तुम्हाला रस आहे. सोबतच हे हि पहा लागेल कि लोकांना सुद्धा त्या विषयासंबंधी रस आहे कि नाही. एखाद्या विषयासंबंधी जर तुम्ही तुमच्या ब्लॉग वर लिहीत असाल पण त्या विषयासंबंधी लोकं google वर search करत नसेल तर त्या विषयासंबंधी लिहिण्यात काहीच अर्थ नाही आहे.त्यामुळे ब्लॉग बनवताना आपण त्या ब्लॉगवर कोणत्या विषयाबद्दल लिहिणार आहोत हे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे ब्लॉग ची niche टॉपिक संपूर्ण अभ्यास करूनच select करा.


Step 3:- डोमेन नेम आणि वेब होस्टिंग खरेदी करा || Buying Domain Name and Web Hosting

आपल्या ब्लॉगचा विषय select झाल्यावर आपल्या ब्लॉगला नाव द्यावे लागेल म्हणजेच domain name खरेदी करावा लागेल.वेबसाईट च नाव हे लक्षात राहण्यास सोपे व unique असावे. आमच्या ब्लॉग च नाव Marathibhau.com आहे म्हणजेच marathibhau.com हे एक domain name आहे . मित्रानो domain name तुम्हाला 100 रुपयापासून 800 रुपयापर्यंत खरेदी करता येतो. domain name ची extension ची वेगवेगळी भाव असतात. .com ,.in ,.shop ,.us अशी वेगवेगळी एक्स्टेंशन असतात . .in हे भारतासाठी वापरला जातो. व .com हा globally वापरला जातो. तुम्ही तुमच्या नुसार extension select करू शकता. आमच्या ब्लॉग वर आम्ही .com हे extension खरेदी केलेले आहे हे तुम्ही पाहू शकता.

How To Make a Website In Marathi

मित्रांनो ब्लॉग चा विषय निवडून झालेला आहे ब्लॉग ला काय नाव द्यायचं हे हि ठरवलेलं आहे आता आपल्याला होस्टिंग खरेदी करावी लागेल
सर्वप्रथम hosting म्हणजे काय हे पाहू . मित्रांनो तुमच्या ब्लॉग ला इंटरनेट वर आणायचं असेल तर होस्टिंग ची आवश्यकता असते . सर्व वेबसाइट ची माहिती इंटरनेटवर साठून ठेवण्याची सेवा प्रदान करते त्यास वेब होस्टिंग असे म्हणतात. यामुळे कोणत्याही व्यक्तीला एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची वेबसाईट इंटरनेटच्या माध्यमातून उघडता येते. आणि त्या मधील माहिती उदा: वेबसाइटच्या फाईल्स, प्रतिमा, व्हिडिओ इत्यादी बघता येतात. हिच माहिती जेथे साठवली जाते अश्या विशेष संगणकास आपण वेब होस्टिंग असे म्हणतो.

मित्रांनो मार्केट मध्ये domain name आणि वेब होस्टिंगच्या खूप कंपन्या आहेत परंतु आम्ही तुम्हाला Hostinger हि कंपनी domain name आणि वेब होस्टिंग खरेदी करण्यासाठी सुचवत आहोत.

Hostinger हि स्वस्त आणि वापरण्यास खुप सोपी आहे.Hostinger आपल्या वार्षिक होस्टिंग प्लॅनसोबत एक डोमेन नेम मोफत देते.

जर तुम्ही तुमची पाहली वेबसाईट बनवत असाल तर Hostinger हि स्वस्त असल्याकारणाने तुम्हाला ती फायदेशीर ठरू शकते.

Learn How To Make a Website In Marathi

hostinger वरील premium web hosting किंवा business web hosting हे plan चांगले आहे. तुम्ही हे 1 महिन्यापासून ते 4 वर्षापर्यंत तुम्ही हे प्लॅन विकत घेऊ शकता परंतु आम्ही तुम्हाला 1 वर्षासाठी प्लॅन घेण्याचं सुचवीत आहोत. हे तुम्हाला 2000 ते 4000 हजारापर्यंत पडतील. या प्लॅन सोबत तुम्हाला एक डोमेन मोफत मिळेल आणि 30 days money back guarantee मिळेल म्हणजे जर 30 दिवसापर्यंत जर तुम्हाला होस्टिंग जर आवडली नाही तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील त्यामुळे आम्ही तुम्हाला होस्टींगर होस्टिंग खरेदी करण्यासाठी सुचवीत आहोत.

 

तुम्ही जर domain name आणि वेब होस्टिंग Hostinger या एकाच कंपनी वरून खरेदी करत असाल तर तुम्हाला domain name चा Nameserver बदलावा नाही लागत. परंतु तुम्ही जर domain name हे दुसऱ्या कंपनीवरून खरेदी करत असाल आणि वेब होस्टिंग दुसऱ्या कंपनीवरून खरेदी करत असाल तर तुम्हाला domain name चे Nameserver बदलावा लागेल.
समजा तुम्ही फक्त domain name हे Godaddy वरून खरेदी करत असाल आणि वेब होस्टिंग हि Hostinger वर खरेदी करत असाल तर तुम्हाला godaddy च्या admin panel ओपन करून जो domain name तुम्हाला वेब होस्टींगसी कनेक्ट करायचा असेल ते domain name सेलेक्ट करून त्याचे  Nameserver बदलून तिथं Hostinger चे खालील नेमसर्व्हर अपडेट करा.

ns1.dns-parking.com
ns2.dns-parking.com

साधारण DNS रेकॉर्ड अपडेट होण्यासाठी 48 तासांपर्यंतचा वेळ लागू शकतो

Domain name आणि Web Hosting साठी येथे क्लिक करा.


Step 4:-CMS प्लॅटफॉर्म निवडा आणि इन्स्टॉल करा || Choosing WordPress as CMS and Installation in Marathi

वेब होस्टिंग खरेदी केल्यानंतर आपल्याला CMS प्लॅटफॉर्म निवडावा लागेल.CMS प्लॅटफॉर्म हे खूप प्रकारचे असतात
WordPress
joomla
Hubspot
Drupal

असे विविध CMS प्लॅटफॉर्म आहेत पण आपण WordPress हे CMS प्लॅटफॉर्म वापरणार आहोत. जगातील ९०% वेबसाईट या wordpress वर बनवलेल्या आहेत. वर्डप्रेस हे वापरण्यास खुप सोपे आहेत.

आम्ही येथे तुम्हाला hostinger या वेब होस्टिंग वर wordpress कसे install करावे याबद्दल माहिती देत आहोत. होस्टींगर वर वेब होस्टिंग खरेदी केल्यानंतर

Hostinger control panel ला लॉगिन करा

ADD website करा

तिथे तुम्हाला Auto Installer दिसेल ते open करा

Auto Installer मध्ये wordpress शोधा आणि त्यावर क्लिक करा


url :- तुमचा डोमेन name टाका उदा. Example.com
Language :- भाषा इंग्लिश निवडा
Administrator Username: तुमचा Username टाका. Username शक्यतो admin असा असतो.
Administrator password: कठीण password टाका.
Administrator Email: तुमचा Email टाका
Website Title: तुमच्या वेबसाईट चे नाव टाका.

आणि Install button वरती क्लिक करा

मित्रांनो आता आपले wordpress install झालेले आहे.

dashboard वरती क्लिक करून. wordpress चे username आणि password टाकून लॉगिन करा.


Step 5:-वर्डप्रेस वर आपला ब्लॉग तयार करा || Choosing Theme in WordPress Information in Marathi

WordPress admin area ला लॉगिन करा.

Appearance -> Themes -> Add New theme क्लिक करा

जे तुम्हाला आवडेल ते Theme सिलेक्ट करा.


Step 6:- ब्लॉगला design करा आणि स्वतःच्या आवडीप्रमाणे customised करा || Design and Customisation

pages बनवण्यासाठी page >add new page क्लिक करा
menu बनवण्यासाठी Appearance >Menu >Create new Menu क्लिक करा

वेगवेगळ्या categories बनवा
categories बनवण्यासाठी post>categories >Add new categories क्लिक करा

plugin add करा
plugin> add new plugin

मित्रांनो ब्लॉग design करण्यासाठी तुम्हाला youtube वरती भरपूर प्रमाणात सामग्री मिळेल.ते तुम्ही पाहू शकता …


Step 7:-ब्लॉग वर सामग्री प्रकाशित करा म्हणजेच कन्टेन्ट टाका || Adding content In website

तुमची पहिली पोस्ट प्रकाशित करा पोस्ट तयार करण्यासाठी
post >add new post क्लिक करा

पोस्ट वरती कन्टेन्ट लिहा आणि publish वरती क्लिक करा अश्याप्रकारे तुम्ही तुमची पोस्ट पब्लिश करू शकता.


Step 8:-तुमच्या ब्लॉगला लोकांपर्यंत पोहचवा म्हणजेच तुमच्या ब्लॉगची ट्रॅफिक वाढवा || SEo of website

मित्रांनो तुम्ही आता आपल्या ब्लॉग वर कन्टेन्ट कशा टाकायचं ते पाहिलं परंतु हा कन्टेन्ट लोकांपर्यंत पोचलाच नाहीतर काहीच फायदा होणार नाही आणि तुम्ही पब्लिश केलेली पोस्ट Google च्या पहिल्या page वर आणण्यासाठी तुम्हाला तुमच्या वेबसाईट च seo करावा लागेल. SEO करण्यासाठी आम्ही तुम्हाला yoast seo हे plugin सुचवित आहोत
plugin add करण्यासाठी तुम्हाला

plugin> add new plugin>yoast seo वरती क्लिक करा.हे plugin तुम्हाला SEO साठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

हळू हळू तुम्ही प्रकाशित केलेल्या पोस्ट गूगल वरती Rank व्हायला लागतील. आणि तेथून तुमच्या वेबसाईट वरती लोक येतील.तुम्ही जर नेहमी चांगले कन्टेन्ट टाकत राहिल्यास आणि लोकांकडून तुमच्या वेबसाइट ला चांगला प्रतिसाद जर मिळत राहिलास तर तुमच्या वेबसाइट ला प्रसिद्ध होण्यास जास्त वेळ लागणार नाही.


Step 9:-आपल्या ब्लॉगद्वारे पैसे कमवा || Earning Money Through Blogging

ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचे 2 उत्तम मार्ग आहेत.

गूगल अ‍ॅडसेन्स | Google adsense:-गूगल अ‍ॅडसेन्स हा पैसे कमावण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. ही एक गुगल ची advertisement placement service आहे.ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या वेबसाईट किव्हा तुमच्या ब्लॉग वर ads place करू शकता आणि जेव्हा कोणी user तुमच्या ब्लॉग वर येऊन तिथे असलेल्या ads वर क्लिक करतो तेव्हा तुम्हाला त्या click चे पैसे भेटतात.

अफिलिएट मार्केटिंग | Affiliate Marketing:- यामध्ये तुम्ही ऑनलाईन एखादा प्रॉडक्ट कोणाला खरेदी करण्याचा सल्ला देता आणि जर का त्या व्यक्ती ने तुम्ही दिलेल्या लिंक चा वापर करून जर का तो प्रॉडक्ट विकत घेतला तर तुम्हाला त्या मागे 3-10% कमिशन भेटते.Affiliate Marketing साठी तुम्ही amazon affiliate program आणि flipkart affiliate program वर register करू शकता. आज मोठे मोठे ब्लॉगर Google Adsense पेक्षा Affiliate Marketing अधून जास्त कमाई करत आहेत.

अश्या प्रकारे मित्रांनो आपण आपली स्वतःची वेबसाईट तयार करू शकतो. वेबसाईट बनवायला जवळपास 3000 ते 4000 रुपये खर्च येईल.परंतु या वेबसाईट पासून तुम्ही महिन्याला 10000 ते 1 लाखापर्यंत कमाई करू शकता. तुमचं वेबसाइट वरील कन्टेन्ट । सामग्री चांगली असेल आणि भरपूर प्रमाणात users तुमच्या वेबसाइट ला जर भेट देत असेल तर तुम्ही याचा पेक्षाही जास्त पैसे कमावू शकता.तुमची वेबसाईट किंवा ब्लॉग यशस्वीच होईल याची काही खात्री नाही आहे परंतु तुम्ही वेबसाईट बनवायला प्रयत्नच नाही केला तर नक्कीचं मात्र तुम्ही अयशश्वी व्हाल. मित्रांनो आज आमच्या कडे 10 वेगवेगळ्या टॉपिकस वरती वेबसाइट्स आहे आणि या वेबसाईट मधून google adsense चा उपयोग करून पैसे कमवतो.आम्ही पण जर आमची पहिली वेबसाईट तयार करण्यासाठी प्रयत्न नसता केला किंवा 4000 ते 5000 हजार खर्च येतो म्हणून वेबसाईट बनवण्याचं काम सोडून दिल असत तर आज आमच्या कडे 10 वेबसाइट नसत्या तर मित्रांनो Taking action is always important वेबसाईट यशस्वी होईल कि नाही होईल ते पाहू नंतर पण प्रयत्न करायला घाबरू नका.

so take action धन्यवाद …….

How To Make a Website In Marathi हि पोस्ट मित्रमंडळीमध्ये share करा

काही अडचणी आल्यास कंमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवू शकता नाहीतर youtube तर आहेच जिंदाबाद.

here we seee:-How To Make a Website In Marathi, Information on How To Make a Website In Marathi, how to do Blogging in Marathi, how to install WordPress information in the Marathi language

Leave a Comment