Sant Eknath Information In Marathi: संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक महान संत होते. एकनाथांनी अभंग रचना, भारूड, जोगवा, गवळण, गोंधळ इत्यादींच्या साहाय्याने समाजात जनजागृती घडवून आणली. ब्राह्मण कुळात जन्मलेल्या नाथांनी कधीही जाती भेदभाव केला नाही. उलट लोकांमध्ये असलेल्या कट्टरतेच्या भावनेला काढण्यासाठी प्रयत्न केले. आजच्या या लेखात आपण Sant Eknath Information In Marathi प्राप्त करणार आहोत तर चला सुरू करुया…
Sant Eknath Information In Marathi
Table of Contents
जन्म व बालपण (संत एकनाथ महाराजांची कथा)
संत एकनाथांचा जन्म इ.स. 1533 मध्ये पुण्यातील पैठण येथे झाला. त्यांचा जन्म संत ज्ञानेश्वरांच्या 250 वर्षांनंतर झाला. संत एकनाथांबद्दल अधिक माहिती लिखित स्वरूपात उपलब्ध नसल्याने त्यांच्या जीवन विषयी ची जास्त माहिती सांगू शकणे कठीण आहे.
त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण तर आईचे नाव रुक्मिणीबाई होते. संत एकनाथांचे कुटुंब सूर्याची उपासना करीत असे. संत भानुदास हे त्यांचे पणजोबा होते.
एकनाथांना आईवडिलांचा सहवास जास्त वेळ लाभला नाही. लहान असताना त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजोबां आणि आजी ने केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांच्या आजी-आजोबांचे नाव होते.
संत एकनाथ विवाह
12 वर्षाच्या वयात आपल्या गुरूंच्या आज्ञने संत एकनाथांनी पैठण जवळ असलेल्या वैजापूर येथील गिरजाबाई यांच्याशी विवाह केला. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली तर हरी नावाचा एक मुलगा झाला.
त्यांचा मुलगा हरी हा पुढे चालून हरीपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करून, एकनाथांच्या समाधीनंतर त्यांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.
संत एकनाथ चमत्कारी जीवन
सहा वर्षाच्या कमी वयापासूनच एकनाथांची बुद्धी आणि तर्कशक्ती पाहून मोठमोठे विद्वान चकित होत असत. 12 वर्षाच्या वयात ते वैदिक शास्त्रामध्ये पारंगत झाले. एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी हे भगवान दत्ताचे उपासक होते. एकनाथांनी आपल्या गुरूंची खूप सेवा केली. असे म्हटले जाते की साक्षात भगवान दत्तात्रेय यांनी प्रसन्न होऊन एकनाथांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून भगवान दत्तात्रेय त्यांच्या द्वारी उभे राहत असत असे म्हणतात.
संत एकनाथांनी समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी अनेक कार्य केले. त्यांनी भगवत पुराण या ग्रंथाला आपल्या भाषेत लिहिले व एकनाथी भागवत हे नाव दिले. या ग्रंथात एकूण 1367 श्लोक आहेत. परंतु एकनाथांनी त्यावर भाष्य म्हणून 18,810 ओव्या लिहिल्या. एकनाथांनी लिहिलेले भावार्थरामायण मध्ये सुमारे 40 हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हे ही प्रसिद्ध काव्य त्यांनीच लिहिलेले आहे. भगवान दत्ताची आरती त्यांनी लिहिली.
समाजात सुरू असलेल्या कुरिती संपवण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. आपल्या काळात त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. अस्पृश्य समजाविषयी त्यांच्या मनात प्रेम होते. त्यांनी अनेकदा अस्पृश्य लोकांना आपल्या घरी जेवायला दिले होते. याशिवाय ते देखील त्यांच्या घरी जेवले होते.
संत एकनाथांचे विचार होते की फक्त पूजापाठ केल्याने कोणी ब्राह्मण होत नाही. व्यक्तीचे सत्कर्म आणि त्याची शुद्ध आत्मा त्याला महान बनवते. जे लोक जातीच्या नावावर भेदभाव करतात ते अल्पज्ञानी, ढोंगी आणि पाखंडी असतात.
संत एकनाथ यांची समाधी
गृहस्थाश्रमात राहून दलित व गरिबांची सेवा करीत ईश्वर भक्तीचे कार्य करणाऱ्या संत एकनाथांनी सन 1656 साली गोदावरी च्या तटावर महासमाधी धारण केली.
एकनाथ महाराजांचे भारुड मराठी
असा कसा देवाचा देव ठगडा | Asa kasa devacha dev thakada lyrics in marathi
संत एकनाथ भारुड
असा कसा देवाचा देव बाई ठकडा
देव एका पायाने लंगडा ||१||
शिंकेची तोडीतो मडकेची फोडीतो
करी दही दुधाचा रबडा ||२||
वाळवंटी जातो कीर्तन करितो
घेतो साधुसंतांसि झगडा ||३||
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई
देव एकनाथांचा बछडा ||४||
माझे माहेर पंढरी भावगीत | maze maher pandhari lyrics
माझे माहेर पंढरी
आहे भिवरेच्या तीरी ||१||
बाप आणि आई
माझी विठ्ठल रखुमाई ||२||
पुंडलीक राहे बंधू
त्याची ख्याती काय सांगू ||३||
माझी बहीण चंद्रभागा
करीतसे पापभंगा ||४||
एका जनार्दनी शरण
करी माहेरची आठवण ||५||
एकनाथ महाराजांच्या गवळणी
माठात घेवूनी दही दूध लोणी बारा तेरा जणी भावगीत | mathat ghevuni dahi dudh loni bara tera jani lyrics
माठात भरुनी दही दूध लोणी बारा तेरा जनी
निघाल्या मथुरेला गौळणी ||१||
चढतांना तो मथुरा घाट
घाटामधली अवघड वाट ||२||
कसा अचानक आडवा येतो कान्हा झुडपातूनी
निघाल्या मथुरे ला गौळणी ||३||
खट्याळ भारी हा गिरिधारी
गोपिकांना दावी हुशारी ||४||
नको नको रे फोडू घागरी करिती त्या विनवणी
निघाल्या मथुरे ला गौळणी ||५||
नको रे कान्हा हे मधुसूधना
वाटेवरती घालू धिंगाणा ||६||
हात जोडूनी शरण आल्या एका जनार्दनी
निघाल्या मथुरेला गौळणी ||७||
आम्ही आशा करतो की ही माहिती Sant Eknath Information In Marathi तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरली असेल.धन्यवाद