जोगीण | कुसुमाग्रज कविता March 19, 2020January 4, 2020 by मराठीभाऊ टीम जोगीण | कुसुमाग्रज कविता साद घालशील तेव्हाच येईन जितकं मागशील तितकच देईन. दिल्यानंतर देहावेगळ्या सावली सारखी निघुन जाईन. तुझा मुगूट मागणार नाही सभेत नातं सांगणार नाही. माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनून जगत राहीन. कवी – कुसुमाग्रज 0share Pinterest WhatsApp Facebook