Anna bhau sathe jayanti wishes in marathi || अण्णा भाऊ साठे जयंती शुभेच्छा:-जगात देखनी माझ्या अण्णा भाऊ ची लेखनी शब्दाला ही आपलंस करूण शब्दाला वाचा देणारे शब्दाची खान , मातंगाची शान , बहुजनाची आण साहित्याची मान यानाचं म्हणतात वारनेचा वाघ वाटेला कुणी येऊ नका? नायतरं लाऊन टाकीन आग.. आज (१ ऑगस्ट) साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने आजच्या पोस्ट मध्ये आपण anna bhau sathe jayanti wishes in marathi ,anna bhau sathe jayanti shubhechha marathi, anna bhau sathe jayanti message-sms marathi,anna bhau sathe jayanti banner-images marathi,anna bhau sathe jayanti status in marathi,anna bhau sathe suvichar -quotes- kavita-shayari-song marathi, इत्यादी घेऊन आलो आहोत.👌
Anna bhau sathe jayanti wishes in marathi | अण्णा भाऊ साठे जयंती शुभेच्छा
Table of Contents
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
अण्णाभाऊ तुमची आठवण
कधी मिटणार नाही.
💐अण्णाभाऊ साठे जयंती
निमित्त विनम्र अभिवादन!💐
समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी
अभिमानाचे स्थान, लोककलेतून केले
त्यांनी जनमनाचे पुर्ननिर्माण
💐अण्णाभाऊ साठे जयंती
निमित्त विनम्र अभिवादन!💐
निळ्या रक्ताची धमक बघ,
स्वाभिमानाची आग आहे..
घाबरू नकोस कुणाच्या बापाला,
तु भीमाचा वाघ 🐯आहेस…
🙏जय अण्णाभाऊ साठे ! जय भीम!🙏
प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून
वंचिताच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर,
लेखक,🙏 समाजसुधारक अण्णाभाऊ साठे
जयंती निमित्त विनम्र अभिवादन!🙏
स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र
चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, विचारवंत, साहित्यिक, कवी, प्रबोधनकार व समाजसुधारक
🌷अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!🌷
मानवमुक्तीचा शिलेदार,
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन.🌷
आपले विचार, कार्य आणि प्रतिमेतून
लोक कलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांना आधार देणारे
🙏लोक शाहीर अण्णाभाई साठेच्या
जयंती निमित्त विनम्र अभिवादन.🙏
जनवादी साहित्यिक
अण्णाभाऊ साठे यांच्या
जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!💐
साहित्य रत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती
निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.💐
अण्णाभाऊ साठे सुविचार मराठी / anna bhau sathe suvichar in marathi.👌
नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या
धुळीसारखे असते. धुळ झटकली की
ती तलवार पुन्हा धारदार बनते.
– अण्णाभाऊ साठे.
हे मानवा तू गुलाम नाहीस,
तू या वास्तव
जगाचा निर्माता आहेस.
– अण्णाभाऊ साठे.
अनिष्ठ धर्माच्या आचरणाने माणसांना
हीन समजणे हा धर्म नसून
तो एक रोग आहे- अण्णाभाऊ साठे.
अण्णाभाऊ साठे कोट्स मराठी / anna bhau sathe quotes in marathi.👌
कला ही नेहमी गरिबाच्या झोपडीत
जन्माला येते, महालात जन्माला येतात
ती गरिबाचे रक्त पिणारी ढेकणं.
– अण्णाभाऊ साठे.
जात हे वास्तव आहे, गरिबी ही कृत्रिम आहे.
गरिबी नष्ट करता येऊ शकते.
अण्णा भाऊ साठे शायरी मराठी / Anna bhau sathe shayari in marathi.👌
महाराष्ट्र मायभू अमुची, मराठी भाषिकांची, संत मंहताची, ज्ञानवंताना जन्म देणार
नररत्नांचे दिव्य भांडार, समरधिर घेत जिथे अवतार|| जी ||
शौर्याची अजरामर महती, आजही नांदती, सह्याचलावरती, मावळा दख्खनचा राहणार, स्वाभिमानार्थ जिणे जगणार, मराठा मानी आणि दिलदार || जी ||
ही अवनी आदिवाशांची, कोळी भिल्लांची, मांग रामोळाची
कैक जातीची प्राणाहुनि प्यार, परंपरा ज्यांची असे अपार
पुढे शाहीर तीच गाणार || जी ||
आम्हाला चीड दास्यांची, जुलमी सत्तेची, परचक्राची
इतिहास साक्ष देत याला, करुनि आम्ही जबरदस्त हल्ला
अन्यायाचा कडेलोट केला ||जी||
संस्कृत भाषेची मानी, विद्येचे धनी, एकदा त्यांनी
एक अन्याय केला अति घोर, मराठी असुन आमची थोर
दडपून केले तिला कमजोर ||जी||
माणुसकी पळाली पार, होऊनी बेजार, पंजाबातून
सूडाची निशा चढून, लोक पशुहून, बनले हैवान
द्या फेकून जातीयतेला, करा बंद, रक्तपाताला, आवोरोनि हात आपुला, भारतीयांनो इभ्रत तुमची इर्षेला पडली, काढा बाहेर नौका देशाची वादळात शिरली, धरा सावरून एकजुटीने दुभंगली दिल्ली, काढा बाहेर राष्ट्रनौका ही वादळात गेली
तू उठ आता सत्वर, हे तुडवून दंगेखोर, म्हणे अण्णा साठे शाहीर, सावरून धर, तुझी तू शांतिध्वजा सत्वर
सुख शांतीचा पोवाडा, गांजल्यांना ऐकवा,
जाऊ द्या ती खोल खाली दामिनीसम शाहिरी
प्रथम मायभूच्या चरणा, छत्रपती शिवबा चरणा, स्मरोनि गातो, कवना || धृ ||
स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क करूनिया गर्जना, लोक उठविला जागाल केला त्या लोकमान्यांना
कठिण काळि राष्ट्र नोकांना
मार्ग दाखविला तयांना
देशा दिली ज्यांनी प्रेरणा || 1 ||
ज्ञानाच्या मक्त्तेदारांनी कट पहा केला
ती ठेकेदारी तगवून पुढे नेण्याला
मानून हीन मराठीला, संस्कृतीचा पगडा बसवला
प्रगतिचा मार्ग रोखिला, महाराष्ट्र दीन जाहला
अंतरला मायबोलिला, इतिहास, पुराणे, वेद दिसेना त्याला
महाराष्ट्र संस्कृतीला, हा राहु ग्रासु लागला
अंधार पूर्ण दाटला, परि त्याहि कठिण समयाला
ज्ञानेश्वर संत पैठणी आले उदयाला.
हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
🙏अण्णा भाऊ साठे कविता-गाणी मराठी / anna bhau sathe kavita-song in marathi.🙏
घनघोर महाराष्ट्राची | ज्ञानेश्वरांची गर्जना | झाली ||
संस्कृत भाषेची भिंत | करुनि आघात | त्यांनी फोडली ||
की माय मराठी बोली | बाहेर काढिली | स्वैर सोडीली ||
अज्ञाना, दीन दलिता | भगवद् गीता | त्यांनी वदवीली ||
माझी मैना गावावर राहिली, माझी मैना गावावर राहिली
माझ्या जीवाची होतिया काहिली || 1 ||
ओतीव बांधा, रंग गव्हाळा
कोर चंद्राची, उदात्त गुणांची
मोठ्या मनाची , सीता ती माझी रामाची
हसून बोलायची, मंद चालायची
सुंगध केतकी, सतेज कांती
घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची
काडी दवन्याची, रेखीव भुवया
कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिरयाची
काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची
मैना रत्नांची खाण, माझा जिव की प्राण
नसे सुखाला वाण
तिच्या गुणांची छक्कड मी गायिली
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
गरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची
वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधाबाध झाली भाकर तुकड्याची
घालवित निघाली मला, माझील मैना चांदनी शुक्राची
गावदरिला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची
शिकस्त केली मी तिला हसविण्याची
खैरात केली पत्रांची, वचनाची
दागिन्यांनी मडवून काढण्याची
बोली केली शिंदेशाही तोड्याची
साज कोल्हापुरी, वज्रटिक
गळ्यात माळ पुतळ्याची
कानात गोखरे, पायात मासोळ्या
दंडात इला आणि नाकात नथ सर्जाची
परी उमलली नाही कळी तिच्या अंतरिची
आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरिली मी मुंबईची
मैना खचली मनात, ती हो रूसली डोळ्यात
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
या मुंबई गर्दी बेकरांची
त्यात भर झाली माझी एकाची
मढेंवर पडावी मुठभर माती
तशी गत झाली आमची
ही मुंबई यंत्राची, तंत्राची. जागरणाची, मरनारांची, शेदिंची, दाढींची, हडसनच्या गाडीची. नायलोनच्या आणि जॉर्जेटच्या तलम साडीची, बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडी, हिरव्या माडीची
पैदास इथे भवतीच चोरांची
एतखाऊची, शिर्जोरांची
हरामखोरांची, भांडवलदारांची
पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची
पर्वा केलि नाही उन्हाची, थंडीची, पावसाची
पाण्यान भरलं खीस माझं
वाण मला एका छत्रीची
त्याच दरम्यान उठली चळवळ
संयुक्त महाराष्ट्राची ||
जग बदल घालूनी घाव, सांगूनी गेले मज भीमराव
गुलामगिरीच्या या चिखलात, रूतून बसला का ऐरावत
अंग झाडूनी निघ बाहेरी, घे बिनीवरती घाव
धनवंतानी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले
मगराने जणू माणिक गिळले, चोर जहाले साव
ठरवून आम्हा हीन अवमानीत, जन्मोजन्मी करूनि अंकित
जिणे लादून वर अवमानित, निर्मुन हा भेदभाव
एकजूटीच्या या रथावरती, आरूढ होऊनी चलबा पुढती
नव महाराष्ट्रा निर्मुन जगती, करी प्रगट निज नाव || 1 ||
तुमच्या जवळ अण्णाभाऊ साठे जयंती शुभेच्छा | anna bhau sathe jayanti wishes in marathi | anna bhau sathe quotes-shayari-poem in marathi.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏..
Please :- आम्हाला आशा आहे की अण्णाभाऊ साठे जयंती शुभेच्छा | anna bhau sathe jayanti wishes in marathi | anna bhau sathe quotes-shayari-poem in marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…….👍
मराठी भाऊ facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा
अण्णाभाऊ साठे जयंती शुभेच्छा | anna bhau sathe jayanti wishes in marathi | anna bhau sathe quotes-shayari-poem in marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले अण्णाभाऊ साठे जयंती शुभेच्छा, अण्णाभाऊ साठे जयंती शुभेच्छा फोटो, अण्णाभाऊ साठे जयंती बॅनर,अण्णाभाऊ साठे जयंती मेसेज,अण्णाभाऊ साठे जयंती स्टेटस, अण्णाभाऊ साठे जयंती कोट्स ,इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..