flowchart म्हणजे काय || What is flowchart information in marathi

What is flowchart information in marathi (flowchart म्हणजे काय ) कॉम्प्युटरमध्ये कोणतेही सोफ्टवेअर किंवा ऍपलिकेशन जर तयार करायचे असेल तर आपल्याला त्या सॉफ्टवेअर साठी अगोदर एक प्रोग्राम तयार करावा लागतो. हा प्रोग्राम च त्या सॉफ्टवेअर ला निर्धारित करित असतो की त्याला कोणते कार्य करायचे आहे. त्या software चे पूर्ण लॉजिक या program मध्ये लिहिलेले असते.

प्रोग्राम तयार करण्यापूर्वी algorithm तयार केला जातो. Algorithm मध्ये या प्रोग्राम चे सर्व लॉजिक प्रोग्रामर ला सहज समजावेत म्हणून ते क्रमवार या algirithm मध्ये मांडलेले असतात.

पण प्रत्येक वेळेस प्रोग्राम सोपाच असेल असे नाही. बहुतेक वेळेस या software किंवा application चे लॉजिक फार जटिल असते. ते सहजा सहज समजायला फार कठीण असते. त्यासाठी algorithm नंतर बहुतेक वेळा flowchart तयार करावा लागतो.

Flowchart मध्ये विविध चिन्हांचा वापर करून अगदी सोप्या भाषेत प्रोग्राम चे लॉजिक मांडले जाते. Flowchart ची विशेष बाब म्हणजे यात program control दाखवण्यासाठी arrow वापरले जातात. जेणेकरून प्रोग्रामर च्या लगेच लक्षात येते की प्रोग्राम चा कंट्रोल कोणत्या दिशेने flow करत आहे. Program समजून घेण्यासाठी या flowchart चा खूप मोठा वाटा असतो.

या पोस्टमध्ये तुम्हाला flowchart बद्दल पूर्ण माहिती मिळणार आहे जसे की flowchart म्हणजे काय (what is flowchart in marathi) , flowchart कसा तयार करावा, flowchart चे फायदे – नुकसान इत्यादी. म्हणून या पोस्ट ला शेवट पर्यंत नक्की वाचा.

Flowchart म्हणजे काय ( what is flowchart in marathi )

ज्याप्रमाणे algorithm मध्ये प्रोग्रामच्या लॉजिक ची अगदी सोप्या भाषेत क्रमवार मांडणी केलेली असते. त्याचेच graph version हे flowchart असतात. थोडक्यात flowchart हे algorithm चे graphical representation असतात.

Flowchart हे कोड समजून घेण्यासाठी खूप मोठा रोल निभावतात. यापासून program तयार करणे खूप सोपे होते. यामध्ये algorithm मध्ये जे लॉजिक आहे तेच flowchart मध्ये दाखवले जाते फक्त यामध्ये त्याला मांडण्याची पद्धत वेगळी असते.

Program logic समजायला सोपा जावा म्हणून यात काही diagram आणि चिन्हांचा वापर केला जातो. या चीनांच्या मदतीने सर्व माहिती मांडली जाते. यामध्ये प्रोग्राम लॉजिक start आणि end करण्यासाठी एक अंडाकृती आकृती वापरली जाते ज्याला की terminal असे म्हणतात. तसेच इतर गोष्टी जसे की input, output, process, यासाठी देखील वेगवेगळी चिन्हे वापरली जातात.

Flowchart यासाठी लवकर समजतो की यामध्ये arrow वापरले जातात. यामुळे लगेच लक्षात येते की program control कोणत्या दिशेने flow होत आहे. त्यामुळे तुम्हाला flowchart म्हणजे काय (what is flowchart in marathi) व्यवस्थित समजून घ्यायचे असेल तर अगोदर flowchart मध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व चिन्ह (diagram) बद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

तर चला मग पाहूया flowchart मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हांची माहिती आणि त्यांचे कार्य…

Flowchart मधील चिन्हांची माहिती (symbols in flowchart )

Flowchart मध्ये वेगवेगळ्या कृती साठी वेगवेगळी चिन्हे, आकृत्या वापरल्या जातात आणि प्रत्येक आकृती एक विशेष कार्य दर्शवते.

  1. Start/End : या symbol चा उपयोग flowchart ल शुरु व बंद करण्यासाठी केला जातो. Start symbol flowchart शुरू करण्यासाठी वापरतात आणि end symbol flowchart बंद करण्यासाठी वापरतात.
  2. Input/output : हा symbol युजर कडून इनपुट घेण्यासाठी वापरला जातो. तसेच इनपुट data वर प्रक्रिया करून निर्माण झालेला परिणाम दाखवण्यासाठी output symbol वापरला जातो.
  3. Process : हा symbol असे दर्शवितो की युजर कडून घेतलेल्या इनपुट वर प्रक्रिया होत आहे. हा सिम्बॉल inputs ची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि त्यांचा भागाकार यासारख्या क्रिया करण्यासाठी वापरला जातो.
  4. Decision : कोणतेही decision घेण्यासाठी हा सिम्बॉल वापरला जातो. प्रोग्राम लॉजिक मध्ये कित्येक वेळा आपल्याला विवध कंडीशन चेक करायचे असतात त्यातील decision घेण्यासाठी हा सिम्बॉल वापरला जातो.
  5. Arrow : हा symbol flowchart मध्ये प्रोग्राम कंट्रोल ची direction ठरवत असतो. या सिम्बॉल पासून प्रोग्रामर ला लगेच लक्षात येते की program control कोणत्या दिशेने flow होत आहे.
  6. Connector : हा सिम्बॉल विविध actions ला एकत्रित जोडण्यासाठी वापरला जातो.

हे पण वाचा
Mutual fund information in marathi
Share Market Information In Marathi
Cryptocurrency Information in Marathi
How To Make Website Information In Marathi
How to Become Amazon Seller Information In Marathi


Advantages and disadvantages of flowchart

Advantages of flowchart in marathi

  • Flowchart मुळे प्रोग्राम लॉजिक अगदी सहरीत्या समजते कारण यात विविध symbol वापरून प्रोग्राम लॉजिक मांडले जाते
  • प्रोग्रॅमर ला program control चा flow कोणत्या दिशेने आहे लगेच लक्षात येते
  • यामुळे प्रोग्रामिंग सहजपणे समजण्यास मदत होते
  • Algorithm मध्ये झालेल्या चुका देखील लवकर लक्षात येतात
  • तसेच कम्युनिकेशन साठी हा टूल बेस्ट आहे

Disadvantages of flowchart in marathi

  • Flowchart चा सर्वात मोठा drawback म्हणजे तो एखादा चुकल्या नंतर त्याला दुरुस्त करता येत नाही. त्यासाठी नवीन flowchart तयार करावा लागतो.
  • Flowchart तयार करण्यासाठी खूप वेळ देखील लागतो
  • Flowchart मध्ये प्रोग्राम कंट्रोल ची दिशा दर्शवण्यासाठी arrow चा वापर केला जातो. म्हणून flowchart जर खूप मोठा असेल तर समजण्यास फार कठीण असते

निष्कर्ष: What is flowchart information in marathi

मित्रांनो अतिशय जटिल प्रोग्राम लॉजिक समजून घेण्यासाठी flowchart खूप महत्वाचे आहेत. जवळपास सर्वच सॉफ्टवेअर व अँपलिकेशन तयार करण्यापूर्वी या algorithm आणि flowchart बनवले जातात.

तुम्हाला जर algorithm म्हणजे काय माहिती नसेल तर त्याची लिंक मी वरती दिली आहे तो लेख देखील अवश्य वाचा तुम्हाला तेथे algorithm बद्दल सविस्तर माहिती मिळेल.

तुम्ही जर कंप्युटर आणि प्रोग्रामिंग बद्दल माहिती मिळवत असाल तर तुम्हाला flowchart माहिती असणे महत्वाचे होते. म्हणूनच मला वाटले की तुम्हाला What is flowchart information in marathi ( flowchart म्हणजे काय) याबाबत माहिती द्यावी.

मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा, धन्यवाद…!!!

Leave a Comment