Algorithm म्हणजे काय || what is algorithm information in marathi

what is algorithm information in marathi || Algorithm म्हणजे काय – तुम्ही कंप्युटर प्रोग्रामिंग बद्दल किंवा मग प्रोग्राम बद्दल माहिती वाचत असताना algorithm हा शब्द नक्कीच वाचला असेल. कारण algorithm हा कंप्युटर प्रोग्राम चा पाया आहे. कोणताही प्रोग्राम लिहिण्यागोदर एक त्याबद्दल algorithm तयार केला जातो जो की आपल्याला त्या प्रोग्राम बद्दल स्टेप बाय स्टेप माहिती देत असतो.

कंप्युटर तर आपली बोली भाषा समजत नाही आणि कॉम्प्युटरमध्ये स्वतःची बुद्धिमत्ता ही नाही. मग कंप्युटर सर्व कामे अचूक व अती जलद कसे करतो? कंप्युटर एक निर्जीव वस्तू आहे तो कुठलेही कार्य स्वतः हुन करत नाही. त्यासाठी प्रोग्रामर प्रोग्राम तयार करून त्या कामाबद्दल सूचना देत असतो आणि हा प्रोग्राम तयार करण्यासाठी आवश्यक असतो तो म्हणजे “algorithm”.

आजच्या या पोस्टमध्ये आपण algorithm बद्दल सर्व आवश्यक माहिती जाणून घेणार आहोत जसे की algorithm म्हणजे काय (what is algorithm information in marathi ) , algorithm चे कार्य, कसा तयार करावा, प्रकार, इत्यादी.

तुम्ही जर algorithm बद्दल माहिती शोधात असाल तर ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा कारण या पोस्टमध्ये तुम्हाला algorithm म्हणजे काय असतो याबद्दल सविस्तर माहिती मिळणार आहे.

Algorithm म्हणजे नेमके काय असतो ( what is algorithm in marathi )

मित्रांनो मी येथे तुम्हाला सविस्तर अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की algorithm mhanje kay ?

मित्रांनो इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ” failing to plan is to planning to fail ” या म्हणीचा असा सरळ अर्थ निघतो की कोणतेही कार्य तुम्ही जर plan करण्याशिवाय केले तर ते जवळपास असफल होते.

कोणतेही कार्य सफल व अचूक होण्यासाठी पूर्वनियोजित प्लॅनिंग करणे फार महत्वाचे असते.

तुम्ही जर कधी सहलीला गेला असाल तर जाण्याअगोदर तुम्ही नक्कीच प्लॅनिंग केले असेल की कुठे जायचे , कश्याने जायचे म्हणजे रेल्वेने , बसणे की प्रायव्हेट वाहन करून जायचे , कोण कोणती पिकनिक स्पॉट पाहायचे, परत यायला किती दिवस लागतील, किती पैसे लागतील, इत्यादी. या प्लॅन मुळेच तुमची सहल सोयीस्कर होते आणि तुम्ही ठरलेल्या वेळात घरी पण परत येता.

त्याचप्रमाणे कॉम्प्युटरमध्ये देखील प्रोग्राम तयार करण्याअगोदर त्याचा सविस्तर आराखडा (स्टेप बाय स्टेप माहिती) तयार केला जातो. त्यानुसारच नंतर प्रोग्राम बनवला जातो. यामुळे प्रोग्राम देखील खूप कमी वेळात तयार होतो आणि तयार करताना चुका पण फार कमी होतात.

  • Program म्हणजे काय ?
  • Programming म्हणजे काय ?
  • Software म्हणजे काय व त्याचे प्रकार
  • Algorithm मध्ये ज्या समस्येसाठी प्रोग्राम तयार करायचा आहे त्या समस्येच्या स्टेप बाय स्टेप solution दिलेले असते. प्रत्येक स्टेपमध्ये त्याठिकाणी करावयाच्या कृतीचे सविस्तर वर्णन केलेले असते.

Algorithm मध्ये प्रॉब्लेम चे solution हे अगदी सरळ आणि सोप्या इंग्रजी भाषेत लिहिलेले असते जे की आपल्याला सांगत असते की समस्येचे निराकरण करण्यासाठी काय करावे.

Algorithm मध्ये लिहिलेल्या सर्व सूचना क्रमवार पद्धतीने कोडिंग मध्ये रुपांतरीत करून एका फाइलमध्ये store केल्या जातात. त्यालाच आपण program असे म्हणतो.

उदाहरणात खाली एक algorithm दिलेला आहे जो की तुम्हाला सांगेल चहा कसा बनवावा

स्टेप १ : एका पातेल्यात पाणी घ्या
स्टेप २: ते पातेले गॅसवर ठेवून पाणी गरम करा
स्टेप ३: त्या गरम पाण्यात पत्ति, साखर, दूध टाका
स्टेप ४: पाण्याला व्यवस्थित उखळी येऊ द्या
स्टेप ५: आता तुमचा चहा तयार आहे
स्टेप ६: चहाला कपामध्ये चाळणीने चाळून घ्या आणि कडक चहाचा आस्वाद घ्या…

मित्रांनो वरील agorithm वरून तुम्हाला चहा कसा बनवावा या तुमच्या समस्येवर स्टेप बाय स्टेप solution मिळाले असेल. या स्टेप वापरून तुम्ही चहा बनवू शकता. मित्रांनो तुम्हाला आता algorithm ही संकल्पना निश्चितच स्पष्ट झाली असेल.

Algorithm चे काही गुणधर्म ( properties of algorithm )

Unambiguous : प्रत्येक स्टेप मध्ये दिलेली कृती ही स्पष्ट आणि confusion विरहित असावी.
Executable : तुम्ही algorithm मध्ये दिलेल्या स्टेप या executable असाव्यात . म्हणजेच त्या स्टेप पासून अपेक्षित परिणाम मिळायला हवेत.
Ordered : algorithm मध्ये दिलेल्या सर्व सूचना या क्रमवार असाव्यात. Algorithm मध्ये सर्व स्टेप्स या योग्य क्रमात असणे फार गरजेचे असते. कारण यातील एखादी जरी स्टेप खाली वरी झाली तर त्यापासून आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.
Finiteness: algorithm कमीत कमी स्टेप्स मध्ये समाप्त व्हायला हवा. म्हणजे algorithm मध्ये केवळ आवश्यक तेवढ्याच स्टेप असाव्यात. अनावश्यक स्टेप्स algorithm मध्ये समाविष्ट नसाव्यात. कारण algorithm पासून कमीत कमी वेळात योग्य परिणाम मिळणे अपेक्षित असते.
Input : प्रोग्राम मध्ये आवश्यक असणारे सर्व इनपुट योग्य त्या स्टेप मध्ये समाविष्ट करणे आवश्यक असते.
Output : ज्याप्रमाणे प्रोग्राम मध्ये इनपुट देणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे प्रोग्रामच्या शेवटच्या स्टेप मध्ये जे अपेक्षित परिणाम (output) आहे ते लिहिणे देखील आवश्यक आहे.
Easily understand: algorithm हा अगदी सोप्या आणि सरळ भाषेत लिहिलेला असावा जेणेकरून तो प्रोग्रामर ला सहज समजू शकेल आणि तो लवकरात लवकर त्या algorithm पासून अपेक्षित परिणाम दाखवणारा प्रोग्राम तयार करू शकेल.
Algorithm तयार करण्याच्या पायऱ्या (phases of algorithm )
वरती दिलेले algorithm चे सर्व गुणधर्म हे एका यशस्वी algorithm ची लक्षणे आहेत. खाली दिलेल्या बेसिक स्टेप्स च्या मार्फत आपण एक अपेक्षित परिणाम देणारा यशस्वी algorithm तयार करु शकतो.

Understand the problem : ज्या समस्येवर आपल्याला algorithm तयार करायचा आहे ती समस्या अगोदर समजून घेणे गरजेचे आहे. कारण जर समस्या व्यवस्थित समजली तरच त्याचे योग्य समाधान मिळू शकेल.
Gather information: समस्या समजल्यानंतर आपल्याला त्या समस्येविषयी आवश्यक माहिती गोळा करायची आहे. ही माहिती आपल्याला समस्येचे निराकरण करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
Choose approprite solution : नंतर समस्येवर वेगवेगळी उत्तरे शोधायची आहेत. ज्या कोणत्या पद्धतीने आपण सोडवू शकतो त्या सर्व पद्धती आपल्याला शोधायच्या आहेत. नंतर यातील जी पद्धत (solution) सर्वात प्रभावी आणि लवकरात लवकर योग्य उत्तर मिळवून देणारी ही ती निवडायची आहे.
Create algorithm : वरच्या स्टेप मध्ये जे solution आपण निवडले होते त्याचा एक algorithm तयार करायचा आहे.
Evaluate : algorithm तयार झाल्यानंतर तो cross check करायचा आहे की algorithm अपेक्षित व योग्य परिणाम देत आहे की नाही. यासाठी तुम्ही वेगवेगळी inputs वापरून algorithm चेक करू शकता. प्रत्येक इनपुट ला योग्य आऊटपुट मिळायला हवे.
Algorithm कसा तयार करावा ?
तुम्हाला algorithm म्हणजे काय ( what is algorithm in marathi ) तसेच algorithm तयार करण्याच्या पायऱ्या याबद्दल सर्व माहिती समजली असेल.

आता आपण प्रोग्रामिंग विश्वातील एक उदाहरण घेऊन पाहू की algorithm कसा तयार केला जातो.

Problem : addition of two numbers ( दोन संख्यांची बेरीज )

Algorithm :
Step 1: start
Step 2: declare variables num1 and num2
Step 3: take inputs for num1 and num2
Step 4: add num1 and num2
Sum = num1 + num2
Step 5: print sum
Step 6: stop
Explanation of algorithm :
वरील उदाहरणात आपण दोन संख्यांची बेरीज करणारा algorithm लिहिला आहे. त्यात आपण सुरूवातीला num 1 आणि num 2 हे दोन variables declare केले. नंतर त्या variables साठी युजर्स कडून दोन संख्या (input) घेतले. नंतर त्या संख्यांची बेरजेच्या सूत्रानुसार बेरीज केली आणि आलेले उत्तर स्क्रीनवर प्रिंट केले.

निष्कर्ष :

मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला algorithm म्हणजे काय (what is algorithm information in marathi ) याबद्दल सविस्तर माहिती घेतली.

मित्रानो तुम्हाला ही पोस्ट what is algorithm information in marathi  आवडली असेल तर सोशल मीडियावर नक्की शेयर करा त्यामुळे इतरांना देखील ही माहिती वाचायला मिळेल, धन्यवाद…!!!


हे पण वाचा
Mutual fund information in marathi
Share Market Information In Marathi
Cryptocurrency Information in Marathi
How To Make Website Information In Marathi
How to Become Amazon Seller Information In Marathi


Leave a Comment