पाणी || अकबर बिरबल कथा

एक दिवस, अकबरने सर्व दरबाऱ्यांना एक प्रश्न विचारला – ‘कोणत्या नदीचे पाणी हे सर्वात उत्तम आहे?’

दरबारातील जास्तीत जास्त लोकांनी एकमताने उत्तर दिले, ‘महाराज! इतर सर्व नदयांच्या पाण्याच्या तुलनेत गंगा नदीचे पाणी हे सर्वोत्तम पाणी आहे.’

परंतु बिरबल शांत होता. हे अकबरने बघितले आणि विचारले, ‘तू शांत का बसला आहे बिरबल? तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.’

बिरबल बोलला, ‘महाराज सर्व नदयांमध्ये यमुना नदीचे पाणी सर्वोत्तम आहे.’

बिरबलचे हे उत्तर ऐकून अकबर चकित झाला. तो बोलला, ‘बिरबल हे तू काय बोलतो आहे? तुमच्या धार्मिक पुस्तकात गंगा नदी ही शुध्द व पवित्र म्हटले आहे, आणि तू यमुनेचे पाणी उत्तम म्हणत आहेस!’

बिरबल म्हणाला, ‘महाराज! मी गंगा नदीच्या पाण्याला अमृत मानतो. त्यामुळे तुम्ही कृपया इतर कोणत्याही पाण्याबरोबर त्याची तुलना करू नका. ते तर अमृत आहे. राहिला प्रश्न नदीच्या पाण्याचा, तर आपल्या राज्याची यमुना नदीच स्वच्छ आहे व त्याचेच पाणी सर्वोत्तम आहे.’

सर्व दरबारी व अकबर अनुत्तरीत झाले व बिरबलच्या उत्तराशी सहमत झाले.

Leave a Comment