शिपाही झाला मौलवी:-अकबर बादशहाच्या दरबारात एक करीम नावाचा सेवक काम करत होता. त्या करीमला खूप इच्छा होती की सगळ्यांनी आपल्याला मौलवी म्हणाले. पण हां ठरला एक मूर्ख शिपाई. याला कोण मौलवी म्हणणार? म्हणून करीम एकदा बिरबलाकडे गेला आणि बिरबलाला म्हणाला. बिरबल साहेब, तुम्हाला लोक हुशार म्हणून समजतात. तुम्ही अशी काही तरी जादू करा की ज्याच्यामुळे सगळे लोक मला मौलवी साहेब, मौलवी साहेब असं म्हणतीत.
बिरबल स्वतःशीच हसला आणि म्हणाला, अरे करीम तुला काय अशी इच्छा झाली मौलवी म्हणून घ्यायची? त्यावेळी तो म्हणाला. म्हणजे काय? दरबारातला शिपाई म्हणून मला काही मान आहे का? अजिबात नाही. मौलवीसाहेब म्हटलं की कस मला मान मिळेल? त्यावर बिरबल म्हणाला अरे. काहीतरी शिकला आणि खरोखरीच मौलवी झाला तर लोक आपोआप मौलवीसाहेब म्हणावे लागतील.
त्याच्यावर करीम म्हणाला. छे छे महाराज. मला आता शिक्षण वैगरे काही करायला सांगू नका. पण हा तजवीज मात्र करा कीं लोकांनी मला कुठल्याही परिस्थितीत मौलवीसाहेब म्हटलेच पाहिजे. बिरबलाने थोडा विचार केला आणि त्यांनी त्या करीमला सांगितलं. बरं. मी सांगतो ते जर केलं तर मात्र नक्की काही दिवसात लोक तुला मौलवीसाहेब म्हणू लागतील.
करीम म्हणाला, हो हो तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. पण मला काही दिवसात लोकांनी मौलवीसाहेब म्हणायलाच पाहिजे. बिरबल म्हणाला ठीक आहे. तू एक काम करायचं. आता आजपासून पुढे तुला कोणीही मौलवीसाहेब म्हटलं की त्याच्या मागे दंडा घेऊन लागायचं मारायला. काबूल. करीमला काही कळेचना. तो म्हणाला. बिरबल महाराज असं का उल्टा सांगताय मला लोकांनी मौलवीसाहेब म्हणावे अशी माझी इच्छा आहे आणि लोकांनी मौलवीं साहेब म्हटलं की त्यांच्या मागे मी काठी घेऊन मारायला हा काही उपाय सांगता?
बिरबल म्हणाला. हे बघ करीम मी जे सांगेन ते तू करणार असशील तरच मी तुला उपाय सांगेन. त्यावर करीम म्हणाला बर बर महाराज तुम्ही सांगाल तस मी करेन. असे म्हणून करीम बाहेर निघून गेले. त्याच्यानंतर बिरबलाने दिल्लीमधल्या सगळ्या पोरा सोराना एकत्र केलं आणि त्याला सांगितलं. अरे तो दरबारातला करीम आहे ना तो तुम्हाला दिसला की तुम्ही त्याला मौलवीसाहेब म्हणून चिडवायचं का? आणि एकदा त्याला का मौलवीसाहेब तुम्ही चिडवलं की बघा कसा तो चिडून तुमच्या मागे लागतो.
तुम्हाला खूप मजा येईल. मग काय मुलांना तर आयतीच मजा करायला मिळणार होती. दुसऱ्या दिवशी करीम जेव्हा दिल्लीच्या रस्त्यावरून जायला लागला तेवढ्या सगळ्या पोरांनी ओ हो हो मौलवीसाहेब ओ हो मौलवीसाहेब काय म्हणता असं करून त्याला चिडवायला सुरुवात केली आणि करीमनी बिरबलाने सांगितलं होतं त्याप्रमाणे हातात सोटा घेऊन त्या मुलांच्या मागे लागायला सुरुवात केली. तो त्यांना मारायला उठवायला लागला. असं बरेच दिवस हा खेळ चालू होता. आणि प्रत्येक वेळेला कोणीतरी मौलवी साहेब असं म्हटलं की हा करीम सोटा घेऊन त्या माणसाला मारायला निघायचा.
असं करत करत 2-3 महिने गेले. मुलांनी जशी त्याला मौलवी बोलायला सुरुवात केली तशी हळूहळू मोठ्या माणसांनीसुद्धा करीमला मौलवीसाहेब मौलवीसाहेब काय म्हणताय ….. अशी त्याची गम्मत सुरू केली. आणि बघता बघता तीन महिन्यांमध्ये लोकं करीमचे मूळ नाव विसरले आणि सगळे जण संपूर्ण दिल्लीतले लोक करीमला मौलवीसाहेब म्हणूनच ओळखायला लागले.
हे झाल्यानंतर एकदा बिरबलानी. करीमला परत बोलावलं आणि बिरबल करीमला म्हणाला. आता एक काम करायचं. उद्यापासून कोणीही मौलवीसाहेब म्हंटल की काठी घेऊन त्यांना अंगावर मारायला न धावता. अगदी रुबाबात. धन्यवाद. शुक्रिया. असं म्हणाय. करीमला काही कळेचना. आताही असं का सांगत आहे तुम्ही? त्यावर बिरबल म्हणाला, उद्यापासून बघ म्हणजे कळेल. दुसर् या दिवशीपासून जेव्हा करीम रस्त्याने जायला लागला त्याला सगळे दिल्लीकर त्याला बघून हसून काय? मौलवी साहेब आज इकडे कुठे काय? मौलवीसाहेब काय मौलवीसाहेब असे करून त्याला चिडवण्याचा प्रयत्न करायला. पण आज मात्र झालं उलटंच आज या नवीन मौलवीसाहेबांनी सगळ्यांना हसून शुक्रिया द्यायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे झालं काय त्या दिवसापासून करीम मौलवीसाहेब जो झाला तो कायमसा?