marathi suvichar || मराठी सुविचार :-
ज्यांच्या कडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात!
अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार
म्हणजे
स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत
तुमच्या कानात प्रेमाणे सांगत असतो
सगळं व्यवस्थित होईल.”
कोट्यवधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण
होतो,
लक्षावधी हरीण शोधल्यावर
कस्तुरीमृग सापडतो,
हजारो मोती उघडल्यावर
एक मोती सापडतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात
पण तुमच्या सारखा एकदाच भेटतो.”
माझी नरकात जायची
सुद्धा तयारी आहे
पण मात्र
त्याला कारण मात्र स्वर्गीय हवं,,,,
स्वतःची वाट स्वताच बनवा
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”
क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”
नेहमीच लहान बनून राहा
प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो,
आणि इतके मोठे व्हा की
जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसललेे नसेल.”
Best Marathi suvichar With Images
आज आराम करून
आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा
शैक्षणिक जीवनात कष्ट करून
आयुष्यभर आरामात जगणं
कधीही चांगलं”👍
एक महिन्याचं जर तुम्हाला महत्व जाणून घ्यायचं असेल तर अशा आईला विचारा जिने आठव्या महिन्यात आपल्या बाळाला जन्म दिला,
एक आठवड्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा,
एका दिवसाच महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराला विचारा ,
एक मिनिटाचे महत्व जाणून घ्यायचं असेल तर ज्याची ट्रेन चुकली आहे अशा माणसाला विचारा ,
आणि एका सेकंदाचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर जो नुकताच अपघातातून वाचला आहे त्याला विचारा .
सेकंदाच्या दहाव्या भागच महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल मिळवणाऱ्या खेळाडूला विचारा.
विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.
जगातील सर्वात सुदंर जोडी
तुम्हाला माहिती आहे का
अश्रू आणि हास्य
कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही
पण ते जेव्हा दिसतात
तो आयुषातला अत्यंत सूंदर क्षण असतो.”👌
शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे
माळी असतात,ते बदलून गेले तरी
आठवणींचे फुल आणि मूल त्यांना
जीवन प्रवासात कधीच विसरत नाही…..👌
हे पण वाचा
Funny Marathi Birthday wishes
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर
खर्चावर आणि
माहिती जास्त नसेल तर
शब्दावर नियंत्रण पाहिजे.”
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
तुमची फसवणूक झाली यात तुमची
काहीही चूक नाही
चूक त्या लोकांनाची आहेत
ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही.”
आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका
कारण त्या शून्या समोर किती
आकडे लिहायचे
ती ताकद तुमच्या हातात आहे.”
मोठा माणूस तोच
जो आपल्या सोबतच्याना
छोटा समजत नाही.”
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !
चुका आणि अपयश
आणि नकार
हा प्रगतीचा भाग असतो
जी काही ऊँची मोठी माणसे गाठत असतात
ति काही एका झेपेत मिळवलेली
नसते
जेव्हा त्यांच्या बरोबर चे जेव्हा झोपा
काढत असतात ना
त्यावेळी ति उंची गठण्यासाठी एक -एक पाउल
टाकलेले असते.
ज्यानी स्वप्न पाहिले आहे
त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे
मनामधे उस्ताह आहे
बुद्धि मधे विवेक आहे
मनामधे करुणा आहे
ज्याच्या मनगटात ताकत आहे
ज्याचे मातृभूमि वर प्रेम आहे
ज्याचे आई-वडीला वर श्रद्धा आहे
चरित्र शुध असेंन
त्याला कोणीही रोखु शकत नाही।
आपल्या प्रतिमेची काळजी घ्या
कारण ते तुमच्या वयापेक्षा जास्त वय तुमच्या प्रतिमेचे आहे.”
संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही
आणि प्रामाणिकणा पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.”
ज्यांना स्वप्न पाहायची असतात
त्यांना रात्र मोठी हवी असते
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात
त्यांना दिवस मोठा हवा असतो.
विपरीत परीस्थितीत काही लोक
तुटून जातात
परंतु काही लोक रेकॉर्ड तोडून
काढतात.
एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा
हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा
हेही समजायला हवे.
शांततेच्या काळात जर जास्त
घाम गाळला तर
युद्धाच्या काळात कमी
रक्त सांडावे लागते.
आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते
पण
वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.
आणखी Marathi suvichar वाचण्यासाठी पुढच्या Page वर जा…
suvichar in marathi