लक्ष्मणरेषा-सध्द परिस्थिती बाबतचा लेख

                      हरि ओम, मी दिपक भिकाजी सावंत. ( Rtd.A.S.I.) सध्या मी माझ्या परिवारासह वरळी येथे राहतो. आज माझ्या महाराष्ट्रावर, माझ्या भारतावर आलेल्या कोरोना नावाच्या संकटामुळे मा.मुख्यमंत्र्यांनी, मा.पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनांचे पालन दिनांक: 22/03/20 पासून मी व माझे कुटुंब अगदी काटेकोरपणे करत आहोत. काही दिवसांपूर्वीच घरातल दुध संपल,भाजीपाला संपला, त्यावेळीच आमच्या घरातील गृहमंत्र्यांनी बजावले की महिनाभर आपण कोरी चहा पिऊ,घरात भाजीपाला संपला तरी घरात कडधान्ये आहे.आपण भाज्यांची हौस त्याच्यावर भागवू. मा.मुख्यमंत्री, मा.पंतप्रधान देशाला हात जोडून सांगत आहेत की घरातच रहा आपल घरट अजिबात सोडू नका. आपण सर्वांनी आप-आपल्या घरात राहूनच या कोरोना नावाच्या बलाढ्य शञुवर मात करू शकतो. कोरोनाला हरवू शकतो, तरी जोपर्यंत हे वादळ थांबत नाही,संपत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर आखलेली लक्ष्मणरेषा अजिबात पार करायची नाही. आम्ही मा.चे सूचनांचे पालन प्रामाणिकपणे करत आहोत. आपण सर्वांनीही सूचनांचे पालन कराव, ही सर्वांना हात जोडून कळकळीची प्रार्थना.
                          आज सकाळी आंघोळ करून झाल्यावर नेहमी प्रमाणे देव्हारातील देवांसमोर नतमस्तक झालो. देवांना अगरबत्ती ओवाळताना,देवांना म्हणालो आज तुमच्या चरणी वाहायला माझ्याकडे फुले नाहीत,ऊद्यापासून ही अगरबत्तीही नसेल, त्याचवेळी  देवघरात लख्ख प्रकाश पडला, व देवघरातील विठू माऊली माझ्यासोबत चक्क हसली,क्षणात माझ्याशी बोलूही लागली. माऊली म्हणाली अरे बाळा आज तु माझ्यासमोर ऊभा राहून मला ओवाळत आहेस, हिच माझ्यासाठी खुप, खूप आनंदाची बाब आहे. अरे वस्ता तू माझ्यासाठी सजवलेल्या देवघरात मी मुर्तीरूपाने  राहात असलो तरी , प्रत्यक्षमाञ मी तुझ्या हृदयरूपी मनमंदीरातच राहतो. आताच्या परिस्थितीत तुझ्याकडे मला वाहायला फुले नाहीत, ऊद्या अगरबत्तीही नसेल,परंतु माझ्यासाठी तु माझ्या नजरेसमोर असणे हेच अती महत्त्वाचे व अती आनंदाचे आहे.सकाळ,संध्याकाळी सतत माझ नाम घेतोस. म्हणून मी सतत तुझ्या बरोबरच असतो.तु माझा लाडका आहेस.माझा तुझ्यावर खुप, खुपच जिव आहे आणि म्हणूनच मला तू सतत माझ्याबरोबर हवा आहेस, म्हणून तुला आज मी एकच सांगतो तू घराबाहेर आखलेल्या लक्ष्मणरेषेच्या बाहेर अजून काही दिवस अजिबात जायचे नाही,कारण त्या लक्ष्मणरेषेच्या बाहेर सध्यातरी कोरोनारूपी राक्षस दबा धरून बसलेला आहे.
                   त्यावर मी देवाला म्हणालो, माऊली माझ्या वर असलेल्या काळजीपोटी तु हे मला सांगत आहेस.मी तुझ्या आज्ञेबाहेर अजिबात नाही, परंतु माझ्या घराच्या बाहेर माझे शेजारी राहतात, माझा मित्र परिवार, माझे नातेवाईक, माझे आप्तेष्ट, माझा समाज, माझा गाव, माझी मुंबई, माझा महाराष्ट्र, माझ्या भारताच काय, त्यावर माऊली म्हणाली त्यांची काळजी तु अजिबात करू नकोस, त्यांच्यासाठी मी माझे देवदूत संपूर्ण देशात अगोदरच पाठविलेले आहेत. ते आपल काम चोख पार पाडतील ही मला पुर्णपणे खाञी आहे. ते देवदूत म्हणजेच आपले सर्वांचे मोदी साहेब व त्यांचे सहकारी, आपले ठाकरे साहेब व त्यांचे सहकारी, सर्व डॉक्टर त्यांचे सहकारी, आपले सर्व पोलिस बांधव, आपले सर्व बी.एम.सी.बांधव, आपले सर्व टी.व्ही.चॅनेलवाले व ईतर सर्व कोरोना राक्षसांच्या विरुद्ध लढणारे आपले देश बांधव. हे सगळे माझ्या माऊलीने पाठविलेले देवदूतच आहेत. ते देवदूत सर्वांना मोठ्या कळकळीने व हात जोडून सांगत आहेत,की कृपया घराबाहेर पडू नका, तरच तुम्ही या महाभयंकर कोरोना राक्षसापासून स्वताला वाचवू शकतो.तरी कृपया त्यांच्या सूचनांचे पालन प्रामाणिकपणे कराच,तरच तुम्ही स्वतःला वाचवू शकाल, तुमच्यामुळे तुमचा परिवार वाचेल व तुम्हा सर्वांनमुळे आपला देशही वाचेल. त्यावर परत एकदा मी माऊलीला विचारले.

 

                   माऊली, आमचे काही बांधव अजुनही हे कोरोनारूपी आलेल संकट गांभीर्याने घेत नाही आहेत.तु पाठविलेल्या देवदूतांच ऐकत नाहीत. बिंधास्त अजुनही घराच्या बाहेर भटकत असतात, जसे तु आज मला आईच्या मायेने समजावलंस , तसेच तु त्यानाही समजावून सांगू शकत नाही का ? त्यावर माऊली बोलली  की का नाही. भारतीयांच्या प्रत्येकाच्या घरात देव्हारा  आहे.त्यांच्या देवघरातही मी राहतोच आहे. आज तु जसा माझ्याशी बोलायचा प्रयत्न केलास, म्हणूनच आता मी तुझ्याशी बोलत आहे.तसेच त्यांनीही जर माझ्याशी बोलायच प्रयत्न केला तर त्यांच्याशिही मी नक्कीच बोलीनच, आणि सध्याच्या परिस्थितीत सर्वांना एकच सांगेन, की बाळांनो कृपा करून अजूनही थोडे दिवस आप-आपल्या घरातच रहा, आपल्या गोड कुटुंबा सोबतच रहा. सरकारी सूचनांचे पालन करा. मला तुम्ही सर्वजण हवे आहात. मी सदैव तुमच्या बरोबरच आहे.
                      आपण सर्वांनी खरोखरच आपल्या अंतर्मनाला विचारा,आपला अंतरात्मा आपल्याला हेच सांगेल की, माझ्या कुटुंबियांना, माझ्या शेजारच्यांना, माझ्या नातेवाईकांना, माझ्या आप्तेष्टांना, माझ्या समाजाला, माझ्या मुंबईला, माझ्या गावाला, माझ्या महाराष्ट्राला,माझ्या भारताला. माझी अत्यंत गरज आहे, आणि त्याकरिता मला माझ्या घरीच राहण हाच सर्वतोपरी एकच उपाय आहे. म्हणुनच मी सुद्धा माझ्या घराच्या बाहेर अजिबात जाणार नाहीच.
                        शेवटी त्या सर्वव्यापी परमेश्वराकडे एकच विश्व प्रार्थना केली की,
*”हे ईश्वरा,”*
*सर्वांना  चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,*
*सर्वांना  सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,*
*सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर*
*आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.*
!! हरि ओम !!
( ऊपरोक्त कथा ही जरी थोडीशी काल्पनिक असली,तरी कथेतील भावना या संपूर्णपणे माझ्या देशबांधवांसाठी अगदी तळमळीची आहे. आपणा सर्वांना परत परत हात जोडून एकच विनंती कृपा करून आपल घरट सोडून अजिबात बाहेर जाऊ नका. शेवटी एक सांगेन कि भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास सांगीतलेल ते वाक्य नेहमी लक्षात ठेवा, की हि वेळ ही निघून जाईल.  )

 
           लेखक
दिपक भिकाजी सावंत.


1 thought on “लक्ष्मणरेषा-सध्द परिस्थिती बाबतचा लेख”

Leave a Comment