Irrfan Khan Biography in Marathi:-अभिनेता इरफान खानने हिंदी भाषेसह अनेक इंग्रजी भाषेच्या चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांच्या चाहत्यांची संख्या लाखांमध्ये आहे. भारताव्यतिरिक्त, इरफानचे लाखो चाहते जगभरात पसरलेले आहेत. इरफान खान हा दिसण्यामध्ये एवढा काही सुंदर नाही, परंतु आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर आज तो एक लोकप्रिय अभिनेता बनला आहे आणि जगातील सर्वोत्कृष्ट कलाकारांमध्ये त्याचे नाव समाविष्ठ झालेले आहे.सध्या प्रत्येकाला इरफानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे आहे आणि आज आम्ही त्याचे आयुष्य तुमच्यासमोर आणणार आहोत.
पुर्ण नाव (Name) | शाहबजादे इरफान अली खान |
जन्म (Birthday) | 7 जानेवारी , 1967 |
वडिल (Father Name) | यासीन अली खान |
आई (Mother Name) | सईदा बेगम |
विवाह (Wife Name) | सुतापा सिकदर |
मृत्यु (Death) | 28 एप्रिल, 2020 |
इरफान खान यांचा जन्म || Birth
Table of Contents
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी राजस्थानच्या जयपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव साहबजादे यासीन अली खान आणि आईचे नाव सैदा बेगम आहे. इरफानचे एकूण तीन भावंडे आहेत, त्यापैकी दोन भाऊ आणि एक बहिण आहे.
इरफान खान जेव्हा एम.ए. चा अभ्यास करत होते तेव्हा त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. इरफान खानला लहानपणापासूनच क्रिकेटचे खूप वेड होते आणि त्यांना लहानपणी एक क्रिकेटपटू व्हायचे होते. पण कुटूंबाकडून परवानगी न मिळाल्याने त्याला आपली लाईफ लाइन बदलावी लागली. तो बालपणात एक चांगला क्रिकेटपटू देखील होता.सीके नायडू ट्रॉफीमध्ये त्यांची निवड झाली होती.पण चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर इरफानने बरीच सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
Irrfan khan Information in Marathi
इरफान खान चित्रपट करिअर: –
इरफान खानने आपल्या कारकिर्दीची सुरुवात दूरदर्शन मालिकांमधून केली. त्याच्या सुरुवातीच्या काळात तो चाणक्य, भारत एक खोज, चंद्रकांत सारख्या मालिकांमध्ये दिसला आणि त्यांच्या फिल्मी करिअरची सुरूवात ‘सलाम बांबे’ या चित्रपटातून एका छोट्या भूमिकेतून झाली.
यानंतर त्याने बर्याच चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या, इरफान खानने 1988 साली आलेल्या सलाम बॉम्बेमध्ये छोटी भूमिका साकारली होती, परंतु इरफानची ही भूमिका चित्रपटातून काढून टाकण्यात आली होती.
या चित्रपटा नंतर इरफानने बर्याच चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या पण 2001 मध्ये आलेल्या ‘द वॉरियर’ या चित्रपटाने त्याचे आयुष्य बदलून टाकले आणि या चित्रपटापासून त्यांना ओळख मिळाली, हा आसिफ कपाडिया दिग्दर्शित एक ब्रिटिश चित्रपट होता ( आसिफ कापडिया).
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही हा चित्रपट दाखविला गेला होता.या चित्रपटा नंतर इरफान 2004 मध्ये आलेल्या ‘हाशील ’ चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसला होता आणि त्याने हे पात्र उत्कृष्टपणे बजावले होते. या चित्रपटातून इरफान खान याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्याने काम केलेल्या काही मालिका खालीलप्रमाणे आहेत
- चाणक्य
- भरत एक खोज
- साराजहां हमारा
- बनेगी अपनी बात
- चंद्रकांत
- श्रीकांत
- स्टार बेस्टसेलर्स
- मानो या ना मानो
इरफान खान यांचे विवाहित जीवन || Marriage Life
इरफानने त्याची मैत्रीण सुतापा सिकदारशी लग्न केले, त्यांना दोन मुले आहेत ज्यांचे नाव बाबिल आणि आर्याना आहे.असे म्हणतात की इरफान आपल्या पत्नीला drama स्कूल मध्ये भेटला. इरफानप्रमाणे सुतापासुद्धा या drama स्कूलची विद्यार्थिनी होती आणि येथून सुरु झालेली त्यांची मैत्री प्रेमात बदलली होती.
इरफान खान हॉलिवूडमध्ये || Career in Hollywood
इरफान खान हा असा भारतीय कलाकार ज्याने भारतीय चित्रपटासोबतच परदेशी चित्रपट म्हणजे हॉलिवूडमध्येही काम केलेले आहे. इरफानने बॉलिवूडसह अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही उत्तम अभिनय केला आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन्ही सिनेमांमध्ये आपला ठसा उमटविणारा इरफान खान हा चित्रपटसृष्टीतील एक तारा आहे.काही हॉलीवूड चित्रपटांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
- सच अ लॉन्ग जर्नी(1988)
- द नेमसेक (2006)
- ए माइटी हार्ट (2007)
- दार्जीलिंग लिमिटेड (2007)
- स्लमडॉग मिलियनेयर (2008)
- लाइफ ऑफ पाई (2012)
- द अमेजिंग स्पाइडर मैन (2012)
- जुरासिक वर्ल्ड (2015)
- इन्फर्नो (2016)
गंभीर आजाराने ग्रस्त || Suffered From Cancer
मार्च २०१८ मध्ये इरफानला त्याच्या आजारपणाविषयी कळालं होतं. त्याने स्वतः त्याच्या चाहत्यांना ही बातमी सोशल मिडीयाद्वारे दिली होती. इरफानने ट्वीट करत लिहिलं होतं, ”आयुष्यात अचानक असं काही होतं जो तुम्हाला खुप पुढे घेऊन जातं. माझ्या आयुष्यात गेले काही दिवस असंच काहीसं सुरु आहे. मला न्युरो इंडोक्राईन ट्युमर नावाचा आजार झाला आहे. मात्र माझ्याजवळ असलेल्या लोकांचं प्रेम आणि ताकदीने माझ्यात नवी उमेद जागी केली आहे.”
इरफानला त्याच्या आजारपणाचं कारण कळताच तो त्यावर उपचार घेण्यासाठी लंडनला गेला होता. तिथे त्याने एक वर्ष उपचार केल्यानंतर २०१९मध्ये तो भारतात परत आला होता.
हे पण वाचा
सचिन तेंडुलकर जीवन चरित्र
महात्मा गांधी माहिती
लोकमान्य टिळक यांची माहिती
शिवाजी महाराज यांची माहिती
इरफान खान निधन || Death
लंडनवरुन उपचार करुन आल्यानंतर इरफान अंग्रेजी मिडीयम सिनेमाच्या शूटसाठी राजस्थानमध्ये गेला होता आणि त्याच्या पुढच्या शेड्युलसाठी लंडनला गेला आणि तिथे गेल्यानंतर तो डॉक्टरांच्या संपर्कात देखील होता.
Irrfan khan Information in Marathi
इरफान खानचं वयाच्या ५४ व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं. २८ एप्रिल 2020 रोजी अचानक प्रकृती खालावल्याने तो मुंबईतील कोकिला बेन रुग्णालयात दाखल झाला होता. इरफानची तब्येत अधिकंच खालावल्याने त्याला आयसीयुमध्ये ठेवण्यात आलं होतं.मात्र अखेर कॅन्सरशी लढता लढता त्याचं निधन झालं.
इरफान खानला मिळालेले पुरस्कार || Awards
- पद्मश्री पुरस्कार २०११,
- फिल्मफेअर अवॉर्ड 2003,
- फिल्मफेअर पुरस्कार 2007,
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१२,
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आम्ही ते update करू धन्यवाद
मित्रांनो हि Irrfan Khan Biography in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद