marathi bodh katha || मराठी बोधकथा :-मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आम्ही काही marathi bodh katha मराठी बोधकथा देत आहोत आशा आहे कि हे तुम्हाला नक्कीच आवडतील आणि उपयुक्त ठरतील.
एक गरुड आणि एक घुबड
एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले.
घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’
घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’ पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला!
आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे.
तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’
तात्पर्य – स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.
सवय || मराठी बोधकथा
एका माणसाने त्याूच्याा घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्याे पोपटाला चांगले खायलाप्याययला मिळत असे व पोपट बोलका असल्यालने घरातील लोकांकडून त्यातचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्यास मनात मात्र पारतंत्र्याचे शल्यल दाटून येई.
अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्यार माणसाने पोपटाला खाणे देण्याईसाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्या च्या.हातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्याघने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्यात बाहेर निघून गेला.
पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्याेने त्यांला फारसे नीट उडताच येत नव्हनते. एका झाडावर गेला असता त्याेला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्या ने त्याइला पोपटांची भाषा येत नव्हरती म्ह णून इतर पोपटही त्या.ला सहकारी मानत नव्ह ते.
पिंज-यात आयते खायची सवय असल्यााने त्या ला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याअने तो आजारी पडला व मरून गेला.
तात्पपर्य: जास्तल काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्यााने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्कृरतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वापतंत्र्य टिकवण्याहसाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्याग संस्कृटतीचे चांगले काही घेताना आपल्याम संस्कृयतीचे विस्म रण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.
हे पण वाचा
अकबर बिरबल मराठी कथा
तेनाली रामन मराठी कथा
पंचतंत्र मराठी कथा
दोन सापांची पंचतंत्र कथा
हत्ती आणि सशाची पंचतंत्र कथा
राजा आणि मूर्ख माकड पंचतंत्र कथा
लोभ || मराठी बोधकथा
एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की ‘तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल’. तो त्याप्रमाणे करतो. इंद्र प्रसन्न होतो.
इंद्र त्याला म्हणतो, की ‘तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईत. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो. त्यानंतर तो गावात येतो. चांगले कपडे घेतो, घर बांधतो.
त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास ? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जातो. इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते. सर्व पैसे खाली पडतात व त्यांची माती होते. त्याचबरोबर इंद्रही नाहीसा होतो. त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही.
तात्प्र्य: कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा.
सेवा हाच धर्म
एका पत्रकारांनी स्वा:मी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्वाचमी विवेकानंदांना भेटून त्यांतच्यााकडून चार ज्ञानाच्याी गोष्टीह शिकाव्याात अशी त्यांकची तीव्र इच्छाक होती.
त्यां पत्रकारांचे दोन मित्र त्यां्ना भेटावयास आले व बोलता-बोलता स्वायमी विवेकानंदांचा उल्लेतख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याटचे ठरविले. तिघेही मिळून स्वावमीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेिने विचारपूस केली.
यादरम्यादन स्वाआमीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्याा काळात पंजाबात दुष्कातळ पडलेला होता. त्यां नी त्याासंदर्भात चर्चा केली. दुष्कांळग्रस्तांडसाठी चाललेल्याा मदतकार्याची माहिती घेतली. त्याहनंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. ब-याच वेळ चर्चा झाल्या.नंतर तिघेही निघाले.
निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हंणाले,”स्वा मीजी, आम्हीच तुमच्यांकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो. पण तुम्हीण मात्र सामान्य अशा बाबींवरच चर्चा केलीत. आम्हाबला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.” या स्वारमी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते असे की,” मित्रवर्य, जोपर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्या पेक्षा त्यावची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्तउ महत्वारचे आहे. ज्याआचे पोट भरलेले नाही त्यााला धर्मोपदेश देण्याभपेक्षा भाकरी देणे हे महत्वााचे आहे. रिकाम्या. पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.