[BEST] राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा संदेश || Rajmata Jijau Jayanti Wishes In Marathi

Rajmata Jijau Jayanti Wishes In Marathi:-मित्रांनो आपण या लेखांमध्ये महाराष्ट्रातील शूर पराक्रमी छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त काही जयंती शुभेच्छा संदेश या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. 12 जानेवारी हा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. या थोर मातेस प्रथम माझा मानाचा मुजरा.
हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि हिंदू धर्माचे रक्षण करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापवीर संभाजी राज दोन छत्रपतींना घडविणाऱ्या आदर्श राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जाधव घराण्यात झाला.

Rajmata Jijau Jayanti Wishes In Marathi

 

जिजाऊ ची गौरव गाथा
तिच्या चरणी माझा माथा..
स्वराज्यप्रेरिक राजमाता
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ
यांच्या जयंती निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🏻


तुम्ही नसता तर नसते झाले
शिवराय अन शंभू छावा
तुमच्या शिवाय नसता मिळाला
आम्हांला स्वराज्याचा ठेवा
जय जिजाऊ
जिजाऊ यांच्या
जयंती निमित्त मानाचा मुजरा!🙏🏻


महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला
त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’
मानाचा मुजरा !
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ
यांच्या जयंती निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🏻


स्वराज्याचा जिने घडविला
विधाता….
धन्य ती स्वराज्य जननी
जिजामाता …
🙏🏻जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ…🙏🏻
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ
यांच्या जयंती निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा …


मुजरा त्या मातेला,
जिने घडविला राजा रयतेचा ।।
गनिमांस तिने नमविला,
वसा स्वराज्याचा चालविला।।
जन्माला तिच्या पोटी,
गुणगान असे रयतेच्या ओठी ।।
तिने दिले शिव आणि छावा,
मिळाला महाराष्ट्रास स्वराज्याचा ठेवा ।।
रचली स्वराज्याची गाथा,
दैवत असे ती राजमाता ।।
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ
यांच्या जयंती निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा …🙏🏻


आपलं आयुष्य जीने स्वराज्याची स्वप्न
पाहण्यात
आणि साकारण्यात खर्च केलं.
जिने ह्या रयतेला एक न्हवे दोन
छत्रपती दिलें
अशा राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊंच्या
जयंती निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा …🙏🏻


जिजाऊ ची गौरव गाथा
तिच्या चरणी माझा माथा..
स्वराज्यप्रेरिक राजमाता
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ
यांच्या जयंती निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा …🙏🏻


जननी मराठा साम्राज्याची,
सारूनी बाजूस राजघराणी.
जनतेच्या साऱ्या न्यायाखातर,
लढा लढविली ही रणरागिणी.
जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ.
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ
यांच्या जयंती निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा …🙏🏻


थोर तुमचे कर्म जिजाऊ,
उपकार कधी ना फिटणार चंद्र
सूर्य असे पर्यंत
नाव तुमचे न मिटणार.
जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ.
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ
यांच्या जयंती निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा …🙏🏻


Rajmata Jijau Jayanti Wishes In Marathi

जिजाऊ…
ज्यांच्या प्रेरणेने उजळली
स्वराज्यज्योती
याच माऊली ज्यांनी घडवले
श्री शिवछत्रपती
🙏🏻राजमाता जिजाबाईं यांच्या जयंती निमीत्त,
लक्ष लक्ष प्रणाम🙏🏻


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांना
घडवणार्‍या राजमाता
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ
यांच्या जयंती निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा …🙏🏻


स्वराज्यप्रेरिका राजमाता
जिजाऊ
यांच्या जयंती निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…🙏🏻


हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी
Life Status In Marathi


जिजाऊ ची गौरव गाथा
तिच्या चरणी माझा माथा..
स्वराज्यप्रेरिक
🙏🏻राजमाता जिजाबाईं यांच्या जयंती निमीत्त,
लक्ष लक्ष प्रणाम🙏🏻


हिंदवी स्वराज्याची संकल्पना
प्रत्यक्षात साकारण्यासाठी
छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य,
चारित्र्य, संघटन व पराक्रम
अशा राजस आणि सत्त्व
गुणांचे बाळकडू देणाऱ्या
राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमीत्त
विनम्र अभिवादन!🙏🏻


जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ.
राजमाता जिजाबाई
यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!🙏🏻

Rajmata Jijau Jayanti Wishes In Marathi


॥जिजाऊ वंदना जिजा माऊली
गे तुला वंदितो मी,
जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥
तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी॥
तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,
तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥
तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुःख कोणास काही नसू दे;
नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥
तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा ,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;
घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥
जय जय जिजाऊ – जय जिजाऊ .
थोर मातेस विनम्र अभिवंदन.🙏🏻


“तुम्ही नसते तर शिवराय नसते शिवराय नसते तर स्वराज्य नसते,
माँ जिजाऊ साहेब जयंती निमित्त त्यास मानाचा मुजरा.”🙏🏻


युगपुरुषाला घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ साहेब यांची आज जयंती.
या दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन…🙏🏻


एक उडाली ठिणगी आणि
लाख पेटल्या मशाली
स्वराज्याच्या
संकल्पाची नवी पहाट ही झाली…
राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमीत्त
विनम्र अभिवादन!🙏🏻

 

Jijau Jayanti Wishes In Marathi


आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी,
जिजाऊ महान माता होती, जगातील प्रत्येक स्त्री ने आदर्श घ्यावा,
अशी आदर्श माता होती.
🙏🏻राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमीत्त
विनम्र अभिवादन!🙏🏻


एका स्त्रीची जबरदस्त इच्छाशक्ती
जगातल्या ५-५ महाकाय साम्राज्य
उद्वस्थ करू शकते हे
आई जिजाऊंनी
अख्या जगाला दाखवले.
🙏🏻राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमीत्त
विनम्र अभिवादन!🙏🏻


स्वराज्याचा जिने घडविला विधाता….
धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता …
जय भवानी ! जय शिवाजी ! जय जिजाऊ
🙏🏻राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमीत्त
विनम्र अभिवादन!🙏🏻


तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी.
जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ.
🙏🏻राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमीत्त
विनम्र अभिवादन!🙏🏻


आम्हाला आशा आहे कि तुम्हाला Rajmata Jijau Jayanti Wishes In Marathi || राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा संदेश नक्कीच आवडले असतील. तुमच्याकडे सुद्धा असे काही Jijau Jayanti Wishes In Marathi images असतील तर आम्हाला खालील कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आम्ही ते या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद…

Leave a Comment